Sunday, 8 May 2016

Movie Review : सैराट

सैराट बद्दल खूप reviews वाचल्याने स्टोरीबद्दलच्या अपेक्षा जमिनीवर आल्या होत्या त्यामुळे प्रत्येक फ्रेम मध्ये काय मेसेज आहे हे आम्ही शोधत होतो...किंवा प्रतिष्ठित लोक ज्याला अंडरकरंट्स म्हणतात ते शोधत होतो.. मुलगी पळून गेल्याने पाटलाचे आमदार व्हायचे स्वप्न भंगते हा one of the अंडर करंट असावा असे वाटते...


तालुक्याच्या युवा नेतृत्वाच्या वाढदिवसाची पार्टी अरेंज करायला शाळेच्या "स्टॉफ" कडून खंडणी (म्हणजेच वर्गणी) गोळा करतांना त्या प्रसंगाच्या बॅकग्राउंडला शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही पहिला...

"पाटलाला तहान नाही लागत होय??" हा प्रश्न आम्ही नोट केला... बाकी पाटलाची शान आणि कॉलेजची मस्ती अगदीच पठडीमधली असली तरी टाईमपास/दुनियादारी सारख्या भिकार सिनेमांपेक्षा भरपूर सेन्सिबल वाटते..

शेवटचे 15 मिनिट सिनेमा अपेक्षित वळण घेतो... मात्र नागराज मंजुळेंच्या जब्याने मारलेला दगड जितका घायाळ करून गेला तितकी त्या बालकाची पावले अस्वस्थ करत नाहीत... असे दुःखाने म्हणावे वाटते..

क्रिकेट मध्ये धोनी आणि सिनेमा मेकिंग मध्ये नागराज मंजुळे यांनी सवर्णांची मक्तेदारी संपवली (निदान कमी केली) याचा आम्हाला आनंद आहे आणि मराठी सिनेमाला रात्री 10च्या शो ला तुडुंब भरलेले थेटर पाहून फार अभिमान वाटला...

बाकी ज्यांनी QSQT, NH10, LSD (लव सेक्स धोका) सारखे सिनेमे पाहिले आहेत... त्यांना फार धक्का बसावा असावं यात काहीच नाही...फक्त या सगळ्यांचे थोडे सेन्सिबल मिश्रण बघायला मिळेल.. आणि काही लोक म्हणाले तसे तरुण पिढी बिघडेल असे तर अजिबातच काही नाही... उलट तरुणांना हा सिनेमा पाहून डोळस व्हायला हरकत नाही..

#जब्या- You are still closest to my heart...

#Nagraj_Manjule - Best wishes for 100 Crores Club... #सैराट

No comments:

Post a Comment