जीएंची "सूड" नावाची गोष्ट वाचून आमची अकरावी मधली एक क्लासमेट आठवली... सुरवातीचे काही महीने मी पहिल्या बेंचवर बसत असे आणि ती मुलींच्या रो मध्ये पहिल्या बेंचवर असायची...
सर मध्यभागी उभे राहून शिकवत असल्याने मी डावीकडे वळून पाहत असे आणि वर्गाच्या दुसऱ्या टोकाला असल्याने ती उजवीकडे बघत असे...आमची बरेचदा नजरानजर व्हायची आणि त्या वयानुसार तिच्या मनात कदाचित माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झाला असेल असे वाटायचे...पण मला ती अजिबात आवडत नसे...कारण ती दिसायला कुरूप होती...खरं तर कोणाला कुरूप म्हणतांना आतून तुटल्यासारखं होतं पण तेव्हा विचार हेच किंवा याहून वाईट होते...
ती सतत पाहते हे मित्रांनी ओळखले आणि चिडवणे चालू केले आणि मग मात्र मी तिचा द्वेष करायला लागलो..तिच्याबद्दल वाईटसाईट बोलायला लागलो.. आमचा कंपू influential असल्याने माझ्या हेटाळणीची इन्टेन्सिटी तीव्र झाली होती..
तिने काही दिवस हे सहन केले आणि नंतर जागा बदलली.. नंतर कधीच माझ्याकडे वळून पहिले नाही.. आधी मी सुटकेचा निश्वास टाकला आणि नंतर मात्र बराच काळ इतर मित्रांशी तिचे नाव जोडून निर्लज्जासारखा तिची मजा उडवतच होतो...तिला हे कळत होते आणि तरीही ती शांत असायची..मुकाट सहन करायची...
तिने मला एकदाही खडसावून विचारले असते तर मी शांत बसलो असतो पण तिने हे केले नाही आणि माझा माज वाढतच गेला... पुढे फिजिक्स-1 चा पेपर दिला आणि सगळी नशा एका झटक्यात उतरली...नंतर पुढची 10-12 वर्षे आपणच बनवलेले खड्डे बुजवणे चालू होते..अनेकांना अपेक्षित नसतांनाही माफ करा म्हणालो काही परत आले आणि काही नेहमीसाठी सोडून गेले..
आता आपण जुने हिशोब संपवले असे वाटत असतांना आज ही गोष्ट वाचली आणि ती आठवली... तिला पूर्णच विसरलो होतो...
बाई गं.. आता 15 वर्ष झाले या गोष्टीला...तुला आता परत कधीच भेटेल असे वाटत नाही... पण मी तुझ्या लक्षात असेल तर त्या नक्कीच चांगल्या आठवणी नसतील..
I am really sorry for everything... vibes वर माझा विश्वास आहे त्या नक्की तुझ्यापर्यंत पोचतील... तू जशी आहेस तशी खूप छान आहेस...
तुला आयुष्यात जे हवे ते मिळो ही सदिच्छा..

No comments:
Post a Comment