अझहर सिनेमा पाहतांना विनोद कांबळी ने सचिनबद्दल सांगितलेला एक किस्सा आठवला...सचिनला लताबाईंकडून बक्षीस मिळणार होते आणि तिकडे विनोद सुद्धा उपस्थित होता...
1987-88 साली ते शाळेच्या टिमकडून खेळत होते... विनोद स्ट्रायकर एन्ड ला आणि सचिन नॉन स्ट्रायकर एन्ड ला...जानेवारी महिन्याचे दिवस असल्याने आकाशात पतंग उडत होते. असाच एक पतंग कटून उडत उडत ग्राउंडवर आला आणि विनोद ने बॅट सोडून पळत पळत जाऊन तो पतंग पकडला... 10-15 मिनिटे त्या मुलांसोबत उडवला आणि क्रिजवर परत आला.
त्याचे खेळामुळे वजन इतके होते की कोणी त्याला काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता... ही मधली 15-20 मिनिटे सचिन पॅड आणि हेल्मेट न काढता नॉन स्ट्रायकर एन्ड ला बॅट टेकवून उभा होता..त्याने विनोद ला एक चकार शब्दाने टोकले नाही... आपला खेळ चालू केला...
यावर विनोद त्या कार्यक्रमात म्हणाला की सचिन माझ्याच वयाचा होता, त्याला पतंग उडवायला आवडत सुद्धा होते पण त्याने खेळाला महत्व दिले... असे अनेक मोहाचे प्रसंग आले पण सचिनचे प्रेफेरेन्सेस क्लिअर होते. म्हणून आज तो तिथे आहे आणि मी इथे...
सगळ्या जगसमोर आपला पराभव मान्य करणारा विनोद कांबळी जितका विलक्षण मनाला भिडला तितकाच सचिन बद्दल आदर दाटून आला...
टॅलेंट विनोदकडे काकणभर जास्तच होते पण घरातल्या लोकांचे मार्गदर्शन त्याला लाभले नाही आणि वयाच्या फक्त 23व्या वर्षी कर्टली अँब्रोजच्या एका बाऊंसर चेंडूने कसोटी क्रिकेटमधून त्याला बाहेर फेकले ते कायमचेच....

No comments:
Post a Comment