करिअर मध्ये स्टेबीलिटी असते तशी फेसबुकवर लिहिण्यात पण आहे असे वाटते. सुरवातीला तुम्ही लिहू लागलात की लोक थोडे आश्चर्य व्यक्त करतात. काही कौतुक करतात आणि काही लांबलचक "हुँ" करतात..
मग हळूहळू 2 गट पडू लागतात... तुमचे वेलविशर आणि टपून बसलेले सायलेंट फॉलोअर.. सायलेंट वाल्यांना वाटते की हा कोण लागून गेलाय हे लिहायला? भैनचोद पत्रकार आहे की नेता? की सिनेमा क्रिटिक... याच्या *** ** आपल्या सोबत असतांना तर वट्ट औकातीत राहत होता..आता का इतका उचकतोय...
मग तुम्ही प्रसिद्धीसाठी व्यक्त होता असे काही म्हणतात.. काहींना वाटते तुम्ही लोकांना इम्प्रेस करायला बघताय.. इथल्या लाइक शेअर कमेंटच्या गणितात तुम्हीपण थोडेफार गुरफटत जाता... मग हजारो लोक जोडले गेले तरी चाळणी लावल्यावर मोजून दहा पाच चांगले हाताला येतात.. बाकीचे आलटून पालटून दंश करण्यात आणि पापी घेण्यात दंग असतात..
मग आणखी काही काळ जातो आणि तुम्ही नवीन रूप घेता... यावेळी जास्त कोणाला आत घेत नाही..जे चांगले आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवू लागता... एव्हाना तुम्हाला होणारा विरोधसुद्धा फारच कमी झालेला असतो... तुम्ही किंवा लोक कोणीतरी एक कंटाळलेले असते...
इथून पुढे.... काय होईल ते माहित नाही... ते जोतो ठरवतो... मंदार काळेंसारखे काही hibernate मोड वर जातात तर काही उदय जोशी/मंडलीक यांच्यासारखे स्वच्छ प्रतिमेत टिकून राहतात... (तेंडुलकर सारखे) हाहाहा
काही लोक कंपू बनवून त्याला वाढवत असतात आणि आपल्या वाट्याला आलेले विष जगाला दाखवत असतात... हे करत असतांना काही सकारात्मक दृष्टिकोन अभावानेच आढळतो...
बाकीचे आमच्यासारखे ना इकडे ना तिकडे टाईप लोक काय करतात ते माहित नाही... कधी कोणाचा उठतो आणि अकाउंट बंद करून पळून जातो आणि परत सुद्धा येतो.., कोणी पुस्तक वाचू लागतो, कोणी नवीन नोकरीच्या तयारीत लागतो तर कोणी फोटो काढत फिरतो...
"इथे प्रत्येक जण फेसबुकच्या प्रेमात आणि डोळे कीपॅड वर आहेत...
पण FB addiction वर बोलणे हा प्रत्येकाचा छंद आहे..."
(मूळ चारोळी - चंद्रशेखर गोखलेंच्या मी।माझा मधली आहे...
इकडे प्रत्येक जण आपल्या घरात
दार लावलेले आहे
पण एकोप्यावर बोलणे हा
प्रत्येकाचा छंद आहे)
चुकली आहे माहितीय... परत नका सांगू... हाहाहा
No comments:
Post a Comment