Sunday, 29 May 2016

तत्वज्ञान - जी.ए.कुलकर्णी

झाडावरच्या फुलाचा वास जमिनीचे सर्व थर पार करून  जमिनीखालील मुळांपर्यंत पोचला. तिकडे नव्या-जुन्या मुळांचा समुदाय सुखाने नांदत होता. जुन्या मुळांना समाधान वाटले कारण त्यांनीच जमिनीतून आयुष्य शोषून वर झाडाला पाठवले होते. आपल्या रोपट्याचे झाड झाल्याची जाणीव आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना एकाच वेळी सुखावून गेली आणि आपण आता फार दिवस नसणार या भावनेने ते विषण्ण झाले..
,
एका तरुण जिज्ञासू मुळाने विचारले " पण कशावरून हा वास आपलाच आहे? कदाचित हे वेगळेच झाड असेल किंवा फुल नसून पानाचा वास असेल"
,
"आपण इतके कष्ट केले पण आपल्याला झाड बघायला मिळत नाही.. मग काय उपयोग आपल्या कष्टांचा?" इतर तरुण मुळे म्हणाली... आपण याचा शोध घ्यायलाच हवा असे त्यांचे ठरले व त्यांनी सर्व शक्ती लावून वरच्या दिशेने प्रवास चालू केला...
अंधारातून उजेडाकडे जाणार हा प्रवास सोपा नव्हता..पण सर्वांचा निश्चय पक्का होता...
,
म्हाताऱ्या मुळाने त्यांना परोपरीने सांगितले की फुलांचा सुगंध अनुभवला हे पुरेसे नाही का? फुल प्रत्यक्ष का बघायला हवे?
पण त्याचे कोणीच ऐकले नाही... आणि त्याने शेवटचे डोळे मिटले..
,
अथक प्रयत्नांनंतर बाकीची सर्व मुळे जमिनीवर आली आणि त्यांचे झाड जमिनीवर उन्मळून पडले... सूर्याच्या किरणांनी कित्येक मुळांनी प्राण सोडले.. बाकीच्यांच्या अंगाला सुरकुत्या पडल्या...
,
ज्या फुलाच्या गंधामुळे यांना ही प्रेरणा मिळाली ते फुल निस्तेज होऊन जमिनीवर पडले होते आणि त्याचा रंग सुद्धा आता ओळखू येईना...
,
तरुण मूळ म्हणाले "हेच आपले फुल का? ना याला गंध आहे ना रंग... आपला भ्रमनिरास झाला पण याने जगाचा फायदा होईल"
त्याचे हे तत्वज्ञान ऐकायला कोणीही जिवंत नव्हते आणि त्यानेही क्षणार्धात डोळे मिटले......󾌹
,

तात्पर्य : जीएंच्या इतर गोष्टींप्रमाणे याचे एकच तात्पर्य असू शकत नाही; अनंताच्या शोधात निघालेल्या माणसाने वर्तमानाकडे डोळसपणे बघायला हवे असे मला जाणवले.  काही गोष्टींची अनुभुती सुखद असली तरी त्यांच्या जास्त खोलात जास्त जाऊ नये...

मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी नेहमीच इररेलॅव्हेंट नसतात आणि आपण आपला रॅशनल अप्रोच कधीकधी आवरता घ्यावा असेही वाटले.
,
आपण आयुष्यभर केलेल्या कष्टाचे फलस्वरूप असलेला आपला नातवंडांनी भरलेला संसार सोडून जातांना आजीआजोबांचा जीव किती अडकत असेल याची कल्पना आली.... 󾌹󾌹󾌹
.
जाणकारांनी आपले तात्पर्य (विचार) जरूर इकडे सांगा... मी नवखा असल्याने ते जाणून घ्यायला मला आवडेल....

Sunday, 22 May 2016

परफेक्ट मिसमॅच..मराठी नाटक 😊

काही गोष्टी आपल्यासाठी नसतात असे आपण स्वतःशी ठरवून ठेवलेले असते त्यामुळे आपण सहसा त्यांच्या वाट्याला जातच नाही. आमच्यासाठी संगीत आणि नाटक हा असाच विषय होता. संगीत फक्त मुलींसाठी आहे आणि मुलींबद्दल राग असल्याने त्यात आम्ही नेहमी काठावर पास व्हायचो...

तसेच "नाटक फक्त शरीफ लोकांसाठी आहे" असे वाटल्याने आम्ही नाटक पण कधी बघितले नाहीत. औरंगाबादला एकनाथ नाट्यमंदिरासमोर आमचा #KGMS ग्रुपचा कट्टा होता इतकाच आमचा नाटकांशी संबंध.

इकडे नवीनच ओळख झालेला मित्र किरण माने एका नाटकाचा मुख्य अभिनेता आहे असे कळले आणि त्याच्यासोबत आपली फेवरेट अमृता सुभाष आहे आणि या नाटकाला खूप अवॉर्ड पण मिळाले आहेत असे पहिले आणि काल दादरला शिवाजी मंदिराला नाटक पहायला गेलो.

मुख्य अभिनेता आपला 'दोस्तं' आहे आणि त्याने आपल्यासाठी पास ठेवला आहे असे तिकीट खिडकीवर सांगितले की लोक फारच रिस्पेक्टने पाहतात असा अनुभव आला... हाहा....

आधी नाटके जास्त  पाहिली नसल्याने आणि 'तुझे आहे तुजपाशी' सारख्या भयंकर आठवणी सोबत असल्याने हे नाटक आवडले नाही तर किरण ला फेस कसे करणार ही भीती वाटत होती.

नाटकाचा विषय आहे matrimony आणि आपली त्यातली गती जुन्या मित्रांना चांगलीच माहित आहे.. (संदर्भ शादी.कॉम आणि रिलेटेड पोस्ट) त्यामुळे नाटक पहिल्या मिनीटापासून पकड घेत गेले. पस्तिशीची unmarried मुलगी आणि नुकताच चाळीशीत आलेला हिरो यांचे भावविश्व या दोघांनी अगदी सुंदर समोर आणले.

आपण जगाची अजिबात पर्वा करत नाही असे सतत सांगणारे लोक आतून खूप संवेदनशील आणि केअरिंग असतात आणि बाहेरून रफ आणि गावंढळ वाटणारी व्यक्ती मनाने प्रचंड सुंदर असू शकते..... या मिसमॅच मधली जोडी अशीच आहे.... एकटेपणामुळे थोडी विक्षिप्त वागणारी गोड मुलगी आणि सातारचा रांगडा मुलगा जो आतून अगदी निर्मळ आणि लवेबल आहे.

Forced Bachelorship लादली गेलेली मुले आणि काही मुली जवळून पाहिल्याने हे दोघे कधी अभिनेते वाटलेच नाहीत..असे वाटले अरे हा तर आपला हा आहे आणि ती तर अशीच बोलते, आपल्या हिच्यासारखी...

परस्परविरुद्ध स्वभाव असणारे दोन लोक एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात आणि बाकी कसलाही विचार न करता ते एकत्र आल्यास आयुष्य किती सुंदर आणि फुलफिलिंग होऊ शकते हे आम्हाला चांगलेच माहित आहे. यातले दोघेही असेच असतात... पण यांच्या शास्त्रीय संगीतासारख्या समान आवडीनिवडी यांना एकत्र बांधून ठेवतात.

इतरांना काहीच त्रास होणार नाही असे काम फक्त साधूसंन्याशी लोक करतात असे अभिनेता म्हणतो आणि काही वेळाने त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांबद्दल आदर व्यक्त करतो... या दोन प्रसंगात एकाच माणसाची दोन भिन्न रूपे समोर येतात.

इंग्लिश गाणे म्हणणारी, बुलेट चालवणारी मॉडर्न मुलगी जेव्हा तिच्या पुरुषांबद्दल द्वेष बाळगण्याचे कारण सांगते तेव्हा आपणही तिच्यासोबत तिच्या कोल्हापूरच्या वाड्यात जातो..आणि तिच्या बाबांसोबतच तिच्या गल्लीतल्या टारगट मुलांचा द्वेष करू लागतो...
शेवटी हे एकत्र येतील असे वाटत असतांनाच नको ती फिलॉसॉफी ऐकून त्या मुलीचा आपल्याला राग सुद्धा येतो...

आपली इनवोलव्हमेंट सतत चढती ठेवण्यात हे नाटक यशस्वी होते. पहिला अंक संपल्यावरच किरणदादाला भेटायला मेकअप रूम मध्ये गेलो. जावे की नाही असे ही म्हणत होती पण म्हटलं चल गं.. आपला माणूस आहे...
आणि भेटल्यावर त्याच्या गळ्यातच पडलो... मनापासून नाटक आवडल्याने त्याला फेस करायची काळजी आता कुठेच नव्हती...

मागच्या वर्षी आमचा किल्ला बद्दल review वाचून अमृता सुभाष आमच्या वॉल वरून नाराज होऊन गेली होती..त्यामुळे तिला भेटायला भीती वाटत होती पण तसा काही संदर्भ न आल्याने प्रसंग छान फोटोसहित साजरा झाला

किरण भाऊ - जिंकलस बाबा... सल्लूबेबी आणि हिंदी सिनेमाचा फॅन आता मराठी नाटकसुद्धा आवडीने बघू लागला तर ही प्रगती फक्त तुझ्यामुळे आहे...

आणि सिनेमा पेक्षा थेटर का बेस्ट आहे ते काल कळले.... थेट प्रेक्षकांसमोर डिलिव्हर करण्यात जो थ्रिल आहे तो रिटेक वाल्या रिळांमध्ये कसा येईल? आणि आपला बेस्ट परफॉर्मन्स त्या दोन तासांत देणे तेही कुठेच न चुकता... मान गये भाई... ही नशा असल्यावर तुला दारूची काय गरज रे???

तुला भविष्यासाठी खूप खूप म्हणजे खूप जास्त शुभेच्छा...तुला अजून पुरस्कार मिळोत आणि आम्हाला तुला  भेटायला लंबी कतार मध्ये थांबावे लागो ही शुभेच्छा....

आणि अमृता ताई - तुझे एक उलट एक सुलट पासूनच तू माझी आवडती लेखिका झालीस... आता आवडती अभिनेत्री सुद्धा आहेस #परफेक्टमिसमॅच... #मराठी #नाटक

Friday, 20 May 2016

सचिन आणि विनोद..

अझहर सिनेमा पाहतांना विनोद कांबळी ने सचिनबद्दल सांगितलेला एक किस्सा आठवला...सचिनला लताबाईंकडून बक्षीस मिळणार होते आणि तिकडे विनोद सुद्धा उपस्थित होता...

1987-88 साली ते शाळेच्या टिमकडून खेळत होते... विनोद स्ट्रायकर एन्ड ला आणि सचिन नॉन स्ट्रायकर एन्ड ला...जानेवारी महिन्याचे दिवस असल्याने आकाशात पतंग उडत होते. असाच एक पतंग कटून उडत उडत ग्राउंडवर आला आणि विनोद ने बॅट सोडून पळत पळत जाऊन तो पतंग पकडला... 10-15 मिनिटे त्या मुलांसोबत उडवला आणि क्रिजवर परत आला.

त्याचे खेळामुळे वजन इतके होते की कोणी त्याला काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता... ही मधली 15-20 मिनिटे सचिन पॅड आणि हेल्मेट न काढता नॉन स्ट्रायकर एन्ड ला बॅट टेकवून उभा होता..त्याने विनोद ला एक चकार शब्दाने टोकले नाही... आपला खेळ चालू केला...

यावर विनोद त्या कार्यक्रमात म्हणाला की सचिन माझ्याच वयाचा होता, त्याला पतंग उडवायला आवडत सुद्धा होते पण त्याने खेळाला महत्व दिले... असे अनेक मोहाचे प्रसंग आले पण सचिनचे प्रेफेरेन्सेस क्लिअर होते. म्हणून आज तो तिथे आहे आणि मी इथे...

सगळ्या जगसमोर आपला पराभव मान्य करणारा विनोद कांबळी जितका विलक्षण मनाला भिडला तितकाच सचिन बद्दल आदर दाटून आला...

टॅलेंट विनोदकडे काकणभर जास्तच होते पण घरातल्या लोकांचे मार्गदर्शन त्याला लाभले नाही आणि वयाच्या फक्त  23व्या वर्षी कर्टली अँब्रोजच्या एका बाऊंसर चेंडूने कसोटी क्रिकेटमधून त्याला बाहेर फेकले ते कायमचेच....

बेस्ट फ्रेंड्स ते लाईफ पार्टनर....

कॉलेजवयीन मुला-मुलीच्या मैत्रीत मुलगा नेहमी दात्याच्या भूमिकेत असतो. तो आपल्या मैत्रिणीची काळजी घेतो, आपले काम सोडून तिला हवे नको ते पाहतो, तिचे मुड स्विंग सहन करतो, अशक्य पाणचट जोक वर हसतो, शॉपिंग ला सोबत जाऊन बॅगा सांभाळतो, ते सोबत असतांना मोस्टली आपणच जास्त खर्च करतो, तिच्या घरच्यांशी नेहमी बोलून त्यांना आश्वस्त करतो...

मोस्ट ऑफ द केसेस मध्ये त्याच्या हातात काहीच येत नाही. मुलगी स्वप्नातला रांगडा राजकुमार निवडते आणि सगळ्यात आधी त्यालाच सांगते... कोणी भेटले नाही की त्याच्यासोबतच वेळ घालवते आणि काही दिवसांनी संदर्भ बदलले की त्याला विसरून पण जाते.

अहो मुलं काय साधू सन्यासी नाहीत..उगीच कोणाशी चांगले वागायला... त्यांना मुलगी हवी असते म्हणून हे सगळे ते सहन करत असतात... मग विमान जमिनीवर आले की तिच्या *** ** असे म्हणणे असतेच... त्या वेळेस मित्रच लागतो... कोणासोबत राडा झाला तर मित्रच कामाला येतो... खिशात पैसे कमी असतील तर मैत्रिण देते पैसे की मित्र?? आणि मागता कोणाला??? करिअर च्या काळजीत कोणाचा आधार वाटतो?? मित्राचाच ना? जगात  कुठेही असले तरी "कारे भेंचोद विसरला का??" असे आपलेपणाने कोण म्हणते?? तुमची ती मैत्रीण का?? हाहाहा

हे सगळे आठवण्याचे कारण सचिन परांजपे यांची पोस्ट... मला तर वाटते 15 ते 25 या वयोगटातील मुलांनी ज्या मुलीशी लग्न करावे वाटते तिच्याशी मैत्री (बेस्ट फ्रेंड / pal / बेस्ट बडी वगैरे) अजिबात करू नये... थेट विचारावे... लग्न करणार असशील किंवा अजून काही तर आपण बोलू नाहीतर मला मित्र खूप आहेत... लोकांचे भांडे घासून आपले आयुष्य उजळणार नाही....हाहाहा

मलिक भाईचा डायलॉग लक्षात ठेवा -- "कोई कुछ भी कहे..दुनिया में हर काम फायदे के लिये होता है......"

टीप : असहमत असाल तर वैधानिक पद्धतीने सांगा... आमचे संस्कार काढले तर आम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांची आठवण येऊ शकते ;) हाहाहा

अझहर - Movie Review

इम्रान हाश्मी बद्दल आमचे सतत मत बदलत गेले आहे. सुरवातीला अतिशय निर्बुद्ध अभिनय करायचा म्हणून तो आवडला नाही. नंतर काही काळ मल्लिका सोबत टेरेसवर जे केले त्याबद्दल जेलसी होती. नंतर एकाहून एक टंच मुलींसोबत त्याने सिनेमे केले आणि आम्ही जळून खाक झालो. हाहाहा

दिल तो बच्चा है जी पासून तो सेन्सिबल वाटू लागला आणि डर्टी पिक्चर पासून तर त्याच्या प्रेमातच आहे...अझहर बघायचे कारण फक्त इम्रान हाश्मी होते कारण आम्हाला क्रिकेट कळेपर्यंत (1994) सचिन तेंडुलकर नावाचे वादळ घोंघावत होते आणि बाकी सर्व तारे त्यासमोर फिके वाटत होते.


एक लहानशी चूक आयुष्यभराची पुण्याई हिरावून नेऊ शकते तसे अझहरचे झाले. न्यायालयाने त्याला दोषमुक्त केलेले आहे पण क्रिकेटवेडे भक्त लोक माफ करतील असे वाटत नाही.

सिनेमा पाहतांना त्याच्यामुळे गाजलेल्या काही मॅच आणि त्याचे षटकार आठवले... भारताने 50 षटकात 300+ रन पहिल्यांदा त्याच्याच captainship मध्ये केले. 5 बाद 305 स्कोअर होता आणि अझहर चे शतक...
1996 साली एकदा लान्स क्लुसनर ला भाई ने एका ओवर मध्ये 5 चौके मारले होते...तेही टेस्ट मॅच मध्ये...

त्याचे मॅच नंतरचे टिपिकल " या...बॉयज प्लेड वेल" हे वाक्य पण आठवले... इम्रान ने त्याच्या अजागळ चालण्याची इतकी छान नक्कल केली आहे... कॉलर मागून वर, डोक्यावर पांढरे हेल्मेट... असे वाटते हाच आपला अजझर...

सिनेमात त्याच्या दोन्ही बायका खूप छान दाखवल्या आहेत... खऱ्या आयुष्यात तशाच असतील का ते माहित नाही...

त्याला आयुष्याने आपली प्रतिमा सुधारण्याची संधी दिली आणि इम्रान ने आपले काम चोख केलेय...

आणि या मॅच फिक्सिंगच्या चिखलात राहून ही कोणाचीही ज्याच्याकडे बघण्याची हिम्मत झाली नाही त्या सचिन तेंडुलकर या माणसाबद्दल आदर दाटून आलाय.... एका interview मध्ये तो म्हणाला होता...

"लोक म्हणतात यश मिळाल्यावर मूल्य जपणे अवघड असते. मला तर ते नेहमीच सोपे वाटले. आईबाबांनी जे शिकवले आहे त्याबाहेर जायचे नाही हे पक्के होते त्यामुळे कधीच confusion झाले नाही"

काय म्हणावे या साधेपणाला.... ___/\___

Sunday, 8 May 2016

आभारप्रदर्शन 2016

फेसबुक म्हणजे एक सुंदर दिसणारी चेटकीण आहे असे कधीकधी वाटते.. तुम्ही तिच्या इतके प्रेमात असता की ती आज ना उद्या आपला घास घेईल हे माहित असूनही तिची ओढ कमी होत नाही... यावरून एक vampires चा इंग्लिश सिनेमा आठवला... नाव लक्षात नाही पण त्यातली हिरोईन फारच गोडी आहे... 󾌧󾌧󾌬

तर मुद्दा हा की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी इकडे जे पोस्टर बनवले गेले आणि पोस्ट लिहिल्या गेल्या ते पाहून परत या हडळीच्या प्रेमात पडलो आहे.हा हा हा

मार्केटिंग मध्ये नॅचरल मार्केट नावाची संकल्पना आहे ज्या अंतर्गत आपले नातेवाईक आणि शाळा-कॉलेजमधले मित्र, कलिग्स येतात.. ज्यांना आपण सर्वात आधी कॉन्टॅक्ट करू शकतो...

या वर्तुळाबाहेरचे लोक जे कधीच आपल्याला भेटले नाहीत त्यांच्याशी फक्त पोस्ट मुळे मैत्र व्हावे... त्यांनी आपल्याला कठीण प्रसंगी आधार द्यावा आणि आपण त्यांच्यासोबत खिदळावे किंवा गंभीर व्हावे यासारखे सुख कशात नाही...

मी नेहमी म्हणतो देवाने आपल्याला या बाबतीत लौ श्रीमंत बनवले आहे... भौतिक अर्थाने तर होऊच पण असे श्रीमंत असण्याचा जास्त आनंद आहे.. 󾌵

माझे गळके, भगदाड पडलेले लोखंडी टमरेल लोकांना अजून लक्षात आहे याचाही आनंद झाला... हा हा हा... त्याची आजकाल गरज पडत नाही तो भाग निराळा...

सर्वांना मनापासून आभार आणि @vaishali patil - तुझे गिफ्ट सर्वात जास्त आवडले... 󾌵󾌵

संदर्भ : हडळ आणि कवटी मला खूप गोड गोष्टी वाटतात... टॉम अँड जेरी सारख्या... त्यामुळे त्या शब्दांच्या लौकिकार्थाने त्यांच्याकडे बघू नये...

आणि टमरेल मी दांभिक लोकांच्या डोक्यात हाणायला बनवले होते... पूर्वी (जुन्या अकाउंटवर) खूप वापर व्हायचा... आजकाल पडून आहे... हाहाहा

मदर्स डे...

माझ्या आईबद्दल काय लिहावे हा नेहमी प्रश्नच पडतो.. कारण आपल्या भावना सार्वजनिक करणे तिला अजिबात आवडत नाही आणि इतरांसारखा मी आईबद्दल निष्पाप पण नाही...
भूतकाळात तिच्याबाबतीत भरपूर चुका आणि दुर्लक्ष झाल्याने मनात गिल्ट आहे त्यामुळे प्रथा म्हणून खोटे गोडवे गाणे काही मनाला पटत नाही.. बाबांबद्दल absolute आदर होता आणि आहे पण तसे आईच्या बाबत नसल्याने घोळ होतो...

बायकोला किंवा आजकाल इन जनरल इतरांना माझ्यात ज्या गोष्टी आवडतात त्या मात्र बहुतांश आईकडून आलेल्या आहेत..

नशिबाने बायको (तेव्हाची मैत्रीण) वेगळ्या गावाला असल्याने तिला फक्त माझे विचार माहित होते... बाहेरच्या गोष्टी कधीच दिसल्या नाहीत...नाहीतर आमचे अरेंज मॅरेज नक्की होते.. हाहा

मनासारखी बायको मिळाली हे आईचे माझ्या आयुष्यातले छोटेसे (!!) कॉंट्रिब्युशन....☺

आणि त्या बायकोने मनासारखे काम निवडू दिले हे तिचे त्याहून छोटे (!!!) कॉंट्रिब्युशन...

फेसबुकवरचे एस्टॅब्लिश्ड आणि निर्वासित....


करिअर मध्ये स्टेबीलिटी असते तशी फेसबुकवर लिहिण्यात पण आहे असे वाटते. सुरवातीला तुम्ही लिहू लागलात की लोक थोडे आश्चर्य व्यक्त करतात. काही कौतुक करतात आणि काही लांबलचक "हुँ" करतात..

मग हळूहळू 2 गट पडू लागतात... तुमचे वेलविशर आणि टपून बसलेले सायलेंट फॉलोअर.. सायलेंट वाल्यांना वाटते की हा कोण लागून गेलाय हे लिहायला? भैनचोद पत्रकार आहे की नेता? की सिनेमा क्रिटिक... याच्या *** ** आपल्या सोबत असतांना तर वट्ट औकातीत राहत होता..आता का इतका उचकतोय...

मग तुम्ही प्रसिद्धीसाठी व्यक्त होता असे काही म्हणतात.. काहींना वाटते तुम्ही लोकांना इम्प्रेस करायला बघताय.. इथल्या लाइक शेअर कमेंटच्या गणितात तुम्हीपण थोडेफार गुरफटत जाता... मग हजारो लोक जोडले गेले तरी चाळणी लावल्यावर मोजून दहा पाच चांगले हाताला येतात.. बाकीचे आलटून पालटून दंश करण्यात आणि पापी घेण्यात दंग असतात..

मग आणखी काही काळ जातो आणि तुम्ही नवीन रूप घेता... यावेळी जास्त कोणाला आत घेत नाही..जे चांगले आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवू लागता...  एव्हाना तुम्हाला होणारा विरोधसुद्धा फारच कमी झालेला असतो... तुम्ही किंवा लोक कोणीतरी एक कंटाळलेले असते...

इथून पुढे.... काय होईल ते माहित नाही... ते जोतो ठरवतो... मंदार काळेंसारखे काही hibernate मोड वर जातात तर काही उदय जोशी/मंडलीक यांच्यासारखे स्वच्छ प्रतिमेत टिकून राहतात... (तेंडुलकर सारखे) हाहाहा

काही लोक कंपू बनवून त्याला वाढवत असतात आणि आपल्या वाट्याला आलेले विष जगाला दाखवत असतात... हे करत असतांना काही सकारात्मक दृष्टिकोन अभावानेच आढळतो...

बाकीचे आमच्यासारखे ना इकडे ना तिकडे टाईप लोक काय करतात ते माहित नाही... कधी कोणाचा उठतो आणि अकाउंट बंद करून पळून जातो आणि परत सुद्धा येतो.., कोणी पुस्तक वाचू लागतो, कोणी नवीन नोकरीच्या तयारीत लागतो तर कोणी फोटो काढत फिरतो...

"इथे प्रत्येक जण फेसबुकच्या प्रेमात आणि डोळे कीपॅड वर आहेत...
पण FB addiction वर बोलणे हा प्रत्येकाचा छंद आहे..."

(मूळ चारोळी - चंद्रशेखर गोखलेंच्या मी।माझा मधली आहे...
इकडे प्रत्येक जण आपल्या घरात
दार लावलेले आहे
पण एकोप्यावर बोलणे हा
प्रत्येकाचा छंद आहे)

चुकली आहे माहितीय... परत नका सांगू... 󾌵हाहाहा

सैराट बद्दल 😊

सैराट पाहतांना आमच्या FY मधल्या 2 गोष्टी आठवल्या.. वर्ष 2002...

किस्सा नंबर 1 : आमची एक गोड क्लासमेट होती जिचे सो कॉल्ड मागास प्रवर्गामधल्या पण श्रीमंत मुलाशी प्रकरण होते. त्याचे भाऊजी फार मोठ्या पोस्ट वर असल्याने हा वट मध्ये असायचा... मराठवाड्यात एका दिवंगत नेत्याच्या कृपेने त्यांचे असोसिएशन फार स्ट्रॉंग आहे...

मुलीच्या घरी हे कळल्यावर त्या मुलाने मुलीच्या वडिलांची कॉलर पकडली की लग्न करून दे वगैरे..अर्थात हे ऐकीव आहे.

नंतर मुलीच्या बापाने मुलीला फुल मारले आणि ती कॉलेजला आली ते थेट 3 दिवसांनी... चेहऱ्यावरच्या खपल्या झाकत आपला TC ती घेऊन गेली आणि नंतर पुण्याला गेली असे कळले आणि त्या मुलाने पण नंतर स्वजातीत लग्न केले..
जे झाले ते दोघांसाठी योग्य झाले असे सार्वमत होते..

गोष्ट दुसरी : आम्हाला मराठीत एक धडा होता... एका गावात एक पुढारी असतो. त्याच्या मुलीचे वर्गातल्या एका दलित नेत्यावर पिरेम बसते.. हा मुलगा म्हणजे जणू धगधगता ज्वालामुखी...त्याचे विचार आणि वक्तृत्व पंचक्रोशीत गाजलेले असते... त्याचा जनसंपर्क सुद्धा दांडगा असतो...

पोरीच्या वडिलांना हे प्रकरण समजते...ते कोणतीही खळखळ न करता पोरीचे लग्न लावून देतात.. दलिताशी पोरीचं लग्न लावून दिले म्हणून त्यांना राजकीय लाभ मिळतो आणि ते मंत्री होतात...

इकडे वाऱ्यावर हुकूमत असणारा त्यांचा जावई मात्र एका समारंभात सासर्यांच्या बंगल्यासमोर उभा राहून आलेल्या पाहुण्यांचे हात जोडून आणि वाकून स्वागत करत असतो.... आणि त्याचे सासरे त्याच्याकडे हसून पाहत असतात...

या गोष्टीवर एक सिनेमा सुद्धा आहे..ज्यात अविनाश नारकर दलित नेत्याच्या भूमिकेत आहे...

तात्पर्य : तुमि घेशाल ते...

Movie Review : सैराट

सैराट बद्दल खूप reviews वाचल्याने स्टोरीबद्दलच्या अपेक्षा जमिनीवर आल्या होत्या त्यामुळे प्रत्येक फ्रेम मध्ये काय मेसेज आहे हे आम्ही शोधत होतो...किंवा प्रतिष्ठित लोक ज्याला अंडरकरंट्स म्हणतात ते शोधत होतो.. मुलगी पळून गेल्याने पाटलाचे आमदार व्हायचे स्वप्न भंगते हा one of the अंडर करंट असावा असे वाटते...


तालुक्याच्या युवा नेतृत्वाच्या वाढदिवसाची पार्टी अरेंज करायला शाळेच्या "स्टॉफ" कडून खंडणी (म्हणजेच वर्गणी) गोळा करतांना त्या प्रसंगाच्या बॅकग्राउंडला शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही पहिला...

"पाटलाला तहान नाही लागत होय??" हा प्रश्न आम्ही नोट केला... बाकी पाटलाची शान आणि कॉलेजची मस्ती अगदीच पठडीमधली असली तरी टाईमपास/दुनियादारी सारख्या भिकार सिनेमांपेक्षा भरपूर सेन्सिबल वाटते..

शेवटचे 15 मिनिट सिनेमा अपेक्षित वळण घेतो... मात्र नागराज मंजुळेंच्या जब्याने मारलेला दगड जितका घायाळ करून गेला तितकी त्या बालकाची पावले अस्वस्थ करत नाहीत... असे दुःखाने म्हणावे वाटते..

क्रिकेट मध्ये धोनी आणि सिनेमा मेकिंग मध्ये नागराज मंजुळे यांनी सवर्णांची मक्तेदारी संपवली (निदान कमी केली) याचा आम्हाला आनंद आहे आणि मराठी सिनेमाला रात्री 10च्या शो ला तुडुंब भरलेले थेटर पाहून फार अभिमान वाटला...

बाकी ज्यांनी QSQT, NH10, LSD (लव सेक्स धोका) सारखे सिनेमे पाहिले आहेत... त्यांना फार धक्का बसावा असावं यात काहीच नाही...फक्त या सगळ्यांचे थोडे सेन्सिबल मिश्रण बघायला मिळेल.. आणि काही लोक म्हणाले तसे तरुण पिढी बिघडेल असे तर अजिबातच काही नाही... उलट तरुणांना हा सिनेमा पाहून डोळस व्हायला हरकत नाही..

#जब्या- You are still closest to my heart...

#Nagraj_Manjule - Best wishes for 100 Crores Club... #सैराट

सूड...

जीएंची "सूड" नावाची गोष्ट वाचून आमची अकरावी मधली एक क्लासमेट आठवली... सुरवातीचे काही महीने मी पहिल्या बेंचवर बसत असे आणि ती मुलींच्या रो मध्ये पहिल्या बेंचवर असायची...

सर मध्यभागी उभे राहून शिकवत असल्याने मी डावीकडे वळून पाहत असे आणि वर्गाच्या  दुसऱ्या टोकाला असल्याने ती उजवीकडे बघत असे...आमची बरेचदा नजरानजर व्हायची आणि त्या वयानुसार तिच्या मनात कदाचित माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झाला असेल असे वाटायचे...पण मला ती अजिबात आवडत नसे...कारण ती दिसायला कुरूप होती...खरं तर कोणाला कुरूप म्हणतांना आतून तुटल्यासारखं होतं पण तेव्हा विचार हेच किंवा याहून वाईट होते...

ती सतत पाहते हे मित्रांनी ओळखले आणि चिडवणे चालू केले आणि मग मात्र मी तिचा द्वेष करायला लागलो..तिच्याबद्दल वाईटसाईट बोलायला लागलो.. आमचा कंपू influential असल्याने माझ्या हेटाळणीची इन्टेन्सिटी तीव्र झाली होती..

तिने काही दिवस हे सहन केले आणि नंतर जागा बदलली.. नंतर कधीच माझ्याकडे वळून पहिले नाही.. आधी मी सुटकेचा निश्वास टाकला आणि नंतर मात्र बराच काळ इतर मित्रांशी तिचे नाव जोडून निर्लज्जासारखा तिची मजा उडवतच होतो...तिला हे कळत होते आणि तरीही ती शांत असायची..मुकाट सहन करायची...

तिने मला एकदाही खडसावून विचारले असते तर मी शांत बसलो असतो पण तिने हे केले नाही आणि माझा माज वाढतच गेला... पुढे फिजिक्स-1 चा पेपर दिला आणि सगळी नशा एका झटक्यात उतरली...नंतर पुढची 10-12 वर्षे आपणच बनवलेले खड्डे बुजवणे चालू होते..अनेकांना अपेक्षित नसतांनाही माफ करा म्हणालो काही परत आले आणि काही नेहमीसाठी सोडून गेले..

आता आपण जुने हिशोब संपवले असे वाटत असतांना आज ही गोष्ट वाचली आणि ती आठवली... तिला पूर्णच विसरलो होतो...󾌹

बाई गं.. आता 15 वर्ष झाले या गोष्टीला...तुला आता परत कधीच भेटेल असे वाटत नाही... पण मी तुझ्या लक्षात असेल तर त्या नक्कीच चांगल्या आठवणी नसतील..
I am really sorry for everything... vibes वर माझा विश्वास आहे त्या नक्की तुझ्यापर्यंत पोचतील... तू जशी आहेस तशी खूप छान आहेस...

तुला आयुष्यात जे हवे ते मिळो ही सदिच्छा.. 󾌹

Saturday, 23 April 2016

Nil Battey Sannata...😢

निल बटे सन्नाटा सिनेमा आपल्याला स्वप्न पहायला आणि ते पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करायला शिकवतो. एका प्रसंगात एक कामवाली बाई जेव्हा चपराशाची नोकरी चांगली नाही असे म्हणते तेव्हा तिचे वेगळेपण आपल्याला जाणवते.

स्वतः मोठे होणे दूर पण मोठे स्वप्नं बघायचीसुद्धा तुझी लायकी नाही असे सगळे जग ओरडून सांगत असतांना ते स्वप्न जिवंत ठेवणे किती अवघड असते हे ज्याने अनुभवले त्यालाच समजू शकेल..

यातली आई ते स्वप्न जगवते आणि त्यासाठी खस्ता खाऊन ते पूर्ण सुद्धा करते. हा सिनेमा पाहतांना अनेक गोष्टी भूतकाळात घेऊन गेल्या...


सेल्स प्रोफाइल मधल्या माणसाने incentives च्या बाहेर जास्त विचार करू नये असे आमचा बॉस म्हणायचा.. रिस्पेक्ट वगैरे हवा असेल तर इकडे कशाला आलात असेही ते म्हणायचे... तुमचा तो माज आणि आमचा तो अभिमान अशा वातावरणात कोणाच्या सेल्फ रिस्पेक्टच्या चिंधड्या उडाल्या तरी जगाला त्याचे सोयरसुतक नसते...

सिनेमा पाहतांना आमच्या घरी काम करणाऱ्या सगळ्या कामवाल्या बायका आठवल्या.. त्यांची आमच्या वयाची मुले आठवली, ज्यांनी लहानपणी आमच्यासोबत धिंगाणा केला पण दहावीनंतर शाळा सोडली ती कायमची...

आमचा शांत आणि सुस्वभावी वॉचमन दिनेश आठवला जो रात्री शाळेत जात असे.. माझ्यासोबत दहावीला होता आता कुठे असेल तो???

माझ्यासोबत डेटा एन्ट्रीचे डेली वेजेसवर काम करणारा मित्र विलास आठवला... शेवटचा भेटला तेव्हा तो एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये कामाला होता आणि मी मुंबईला स्वप्न गाठोड्यात बांधून घेऊन निघालो होतो..त्याने मला ओळख दिली नाही...आणि मलाही अवघडल्यासारखे वाटले...
माझे आयुष्य बदलले पण तो कुठे असेल????

स्वरा भास्कर ला ठिकठिकाणी काम करतांना पाहून आमचे बाबा आठवले ज्यांनी ढोरासारखी मेहनत करून आम्हाला मिडल क्लास मध्ये आणले... आईची कळकळ आणि आमची बेफिकीर वृत्ती सुद्धा आठवली...

स्वरा भास्कर च्या मुलीचे वर्तन पाहून आम्ही घेतलेले लोकांचे तळतळाट आठवले... आपल्याला सोडून गेलेली माणसे यशस्वी आयुष्य जगत असतांना 'आपण त्यांच्या लायक नाही म्हणून ते गेले' हा भाव आठवला...

आणि जे जे आपल्याला नाकारले गेले ते ते सगळे परत मिळवायचे ही जिद्द सुद्धा आठवली...

सिनेमा संपून 1 तास झाला........पण अजूनही गळ्याशी दुखत आहे... पुरुषाने रडू नये म्हणतात.....

असो. सिनेमा नक्की पहा आणि कसा वाटला तेही कळवा....

सुंदर लोक..😊

आता एका काळ्या सायकलवर लिहिलेले  वाचले... "सायकल सोडून बोला"
असे वाटले आपल्या कामावर आणि आयुष्यावर प्रचंड प्रेम असलेला माणूसच ही सायकल चालवत असेल...

सध्या बिल्डिंग मध्ये नवीन कन्स्ट्रक्शन चालू असल्याने बरेच मजूर आले आहेत, त्यांच्यातल्याच एकाची असावी ही सायकल...:)

आपल्या कामावर प्रेम असणारा एक बेस्ट बसचा कंडक्टर एकदा भेटला होता. परळ ते चेंबूर बस मध्ये दुपारी गर्दी नसल्याने तो गप्पा मारत होता.. मला म्हणाला आपल्या कामावर आपले फार प्रेम आहे... आणि त्याने आपण as a कंडक्टर लोकांसाठी जे करू शकतो ते संगीतले...फार छान वाटले त्याला भेटून आणि म्हटलं आपण तर या मानाने बरेच बेटर आहोत की

एका ट्रकवर लिहिले होते---
"मालिक का पैसा और ड्रायव्हर का पसीना,
बनके निकली हसीना....."

याचा अर्थ तो ड्रायव्हर आपल्या ट्रककडे प्रेयसी म्हणून पाहत असेल आणि तशी काळजी घेत असेल असे वाटले...

नवी मुंबईत गायकवाड नावाचा एक रिक्षावाला आहे. रिक्षात त्याने पेपर ठेवलेले असतात आणि व्यसनमुक्तीबद्दल लोकांना सांगत असतो, अपंग आणि गरिबांना फुकट पाहिजे तिकडे सोडतो. मी त्याला जास्तीचे पैसे देऊ केले तर त्याने ते नम्रपणे नाकारले आणि कणा कविता आठवली...

असे सुंदर लोक तुम्हालाही भेटोत ही शुभेच्छा... Have a great weekend

खरे हितचिंतक...😊

आपले जुने मित्र खरे वेलविशर (हितचिंतक) असतात.. नोकरीच्या निमित्ताने भेटणारे लोक मित्र म्हणवून घेतात पण अपवाद वगळता ते गोड भूभुचे कातडे पांघरलेले लांडगेच असतात..वेळ आली की लचका तोडणारे...

आमचा एक मित्र सध्या डेन्मार्कला महिनाभराच्या प्रोजेक्टसाठी गेला आहे.. सॉफ्टवेअरवाला असला तरी सेन्सिबल आहे म्हणून आमचा खास आहे... हाहा... बायकोमुलाना सोडून एकटा असल्याने आम्हाला आज आमच्या व्हाट्सअँप ग्रुपवर म्हणे या डेन्मार्कच्या *** **... खूप बोर झालोय...

त्यावर आमचा दुसरा मित्र आनल्या म्हणाला हो रे ***** मी पण एकटाच आहे...आणि xx xxच्या पण हिची हि... हाहाहा

काही वर्षांपूर्वी Reliance Capital आमच्या कॅम्पसला आली होती..काही दिवसांपूर्वी औरंगाबादला त्यांच्या कॅम्पसला पण ते गेले होते... त्याचे तेव्हा सिलेक्शन झाले नाही.

माझा interview चांगला झाला नाही आणि आनल्या तेव्हा मला म्हणे...जाऊदे रे..रिलायन्सच्या फुल्या फुल्या फुल्या...  फार फालतू लोक आहेत साले... बरे झाले नाही झाले ते..

दुसऱ्या दिवशी माझे ऑफर लेटर आले मग म्हणे ठीक आहे, पगार तर चांगला आहे ना... वर्षभरात बघ नवीन जॉब...

मित्र हवे तर असे... नेहमी सोबत असणारे... सोयीने वागणारे तर फेसबुकवर पण असतात... हाहाहा

love you #KGMS

टीप : इकडे सगळे तसे नाहीत हे विशेष नमूद करतो. I am thankful to fb for adding people from totally different spheres into our lives...

Friday, 8 April 2016

कपूर अँड सन्स... एक वेगळा प्रयत्न..

कपूर अँड सन्स... एक वेगळा प्रयत्न..

या घरातल्या प्रत्येकाला वाटत असते की समोरच्याने आपल्याला फसवले आहे किंवा आपल्यापासून काही लपवले आहे. मुलांच्या बाबांनी आपला बँकेचा जॉब सोडून घरासाठी मोठे काही करावे या हेतूने बिझनेस करायचा प्रयत्न केलेला असतो पण तो अयशस्वी झाल्याने घरात बिकट परिस्थिती उद्भवलेली असते.

ह्या सगळ्यात ज्या बायकोने साथ द्यावी तीच जर टोमणे मारणारी असेल आणि सतत माहेरचे गोडवे गाणारी असेल तर घराचा नरक होतो. एखादी व्यक्ती आयुष्यातून न जाणे हा  नरक आहे असे वपु म्हणतात पण या दोघांमध्ये नवीन व्यक्ती आल्याने त्यांचे घर नरक बनते.

त्यांचा मोठा मुलगा आदर्श आणि यशस्वी लेखक असतो आणि लहान मुलगा स्ट्रगलिंग लेखक आणि पार्ट टाईम बारटेंडर, आईबाबांचा नावडता आणि अयशस्वी माणूस... दोन भावांमध्ये असलेली लव हेट रिलेशनशिप, त्यांचे disturbed आईबाबा आणि हे सगळे लांबून पाहत असलेले त्यांचे जिंदादिल आजोबा ऋषी कपूर...

नवर्याला सतत टोचणारी रत्ना पाठक मला जगातली सर्वात कुरुप स्त्री वाटली पण हे अर्थातच तिच्या अभिनयाचे यश आहे. रजत कपूरचा सतत काळजीत असणारा बाबा सुद्धा आपल्याला अगदी जवळचा वाटतो. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ने मोठ्या भावाचे काम अगदी सुंदर केले आहे, truely impressive.. सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयातील  मर्यादा वेळोवेळी स्पष्ट होतात पण तो असह्य होत नाही.

आणि या सगळ्यात एक गोड फुल आहे आलिया भट.. वरवर पाहता अवखळ पण गंभीर व्यक्तिमत्व तिने फार छान सादर केले आहे.

करण जोहर या सिनेमाचा निर्माता असल्याने यात एक 'गे' पात्र अपेक्षितच होते; पण या वेळी ते पात्र लाऊड नसून मनाला भिडणारे आहे. गे असण्यातली शारीरिक बाजू न दाखवता मानसिक बाजू दाखवल्याने हे पात्र आपल्यावर छाप सोडून जाते.

इतर फॅमिली सिनेमांसारखा हा सिनेमा रिफ्रेशिंग नाही उलट आपल्याला अस्वस्थ करून जातो... But still I loved it and could correlate real persons with on screen characters..

Friday, 1 April 2016

ईकॉमर्स आणि आऊटसोर्सिंग...दोन भयंकर राक्षस...

ईकॉमर्स आणि आऊटसोर्सिंग...दोन भयंकर राक्षस... 󾆬󾆲󾆬😈󾆰

कुत्र्याच्या छत्रीसारख्या उगवलेल्या ईकॉमर्स आणि मोबाईल अँप कंपन्यांमुळे बऱ्यापैकी कॉलेजेस मध्ये शिकलेल्या लोकांचे करिअर आणि ऊमेदीची काही वर्षे वाया जात आहेत.

मोठ्या कॉलेज मध्ये शिकलेले अतिहुशार मुलं किंवा आमीरजादे 2,3 वर्षाच्या अनुभवावर असले धंदे चालू करतात आणि Venture Capital कडून फंडिंग मिळवतात.. त्या जोरावर चांगल्या पगारावर मुलांना मार्केटिंगला ठेऊन 6 महिने--वर्ष,2वर्ष काढतात आणि जमले तर ठीक नाहीतर गाजराची पुंगीच ती... नाही वाजली तर मोडून खातात... त्यांनी आपले खिसे आधीच गरम केले असल्याने पुढची 10 वर्षे मजेत जगू इतके पैसे बाजूला काढतात आणि नवीन आयडिया काढून लोकांना मूर्ख बनवायच्या कामाला लागतात...

अशाच एका 43 देशात operational presence असलेल्या वल्ड फेमस ई-कॉमर्स कंपनीमध्ये (Groupon) आम्ही साडेतीन वर्ष काम केले आहे... सुरवातीला वाटायचे अरे आपणच मागास आहोत, जग फार बदलतेय... इतक्या कमी वयात लोक हे सगळे करतात आणि आपण नुसतेच झाडं मोजत बसलोय...

सुरवातीची उत्सुकता संपली की मग एकेक गोष्टी खटकत जातात आणि प्रश्न पडतो की अरे हे सगळे सध्या चांगले आहे..पण sustainable वाटत नाही... पुढे काय??? कंपनीच्या बेसिक्स मध्येच प्रॉब्लेम असेल तर ही अस्वस्थता वाढत जाते...

पुढे काय??? या प्रश्नाचे उत्तर डायरेक्टर लोकांकडेही नसते म्हणून ते आपल्याला महिन्याला 40% रेट ने होणारी राक्षसी ग्रोथ दाखवून इम्प्रेस करायला बघतात... सोबतची आमीरजाद्यांची निर्बुद्ध गर्दी आपल्याला मूर्ख ठरवते... आपण जास्त विचार करू नये हे ते ओरडून सांगत असतात...

काही काळ गेल्यावर मोजकेच अपवाद वगळता या कामात मिळवलेल्या स्किल्स बाहेरच्या जगात अगदीच कुचकामी आहेत हे सगळ्यांना समजते... बाहेर आपली किंमत शून्य होते... आणि या फेज मध्ये कंपनी आपले वर्चस्व प्रस्थापित करते..

कंपनीच्या बेसिक्स मध्येच घोळ असल्याने मग हळूहळू फॉरेन फंडिंग आटत जाते आणि लोकांना जॉबवरून कमी केले जाते... मोठ्या (डायरेक्टर) लोकांना हे वादळ 6 महिने आधीच दिसत असल्याने जहाज बुडायच्या आधीच ते सुरक्षित बेटावर उंदरासारख्या उड्या मारतात...आणि बाकीचे  loyalty च्या नावाखाली हात हलवत बसतात...

हे बाकीचे ना इकडचे ना तिकडचे असतात.. मुंबईतल्या वेश्याव्यवसायतुन अनेक मुली पळून जाण्यात यशस्वी होतात पण त्यांना बाहेर कोणी उभे करत नाही आणि त्या परत त्याच दारात जातात तसेच या लोकांचे होते... त्यांना चांगल्या इंडस्ट्री मध्ये कोणीच उभे करत नाही आणि ते परत नवीन स्टार्टअप च्या शोधात फिरायला लागतात.. मग नवीन कंपनी कशी sustainable आहे हे आपापल्या घरी सांगतात.. पण त्यांना मनात माहित असते की आपण एक-दोन वर्षाने इकडे नसू...

असे कित्येक लोक जॉबलेस झालेले आम्ही पाहिलेत... फुग्याला टाचणी लागल्यावर तो क्षणार्धात फाटतो तसे यांचे होते... ऐन तिशीच्या उंबरठ्यावर हे clueless होऊन इकडेतिकडे फिरत असतात... चकचकीत ऑफिस आणि अंगावर ब्लेझर असले तरी आतली insecurity यांना रात्री स्वस्थ झोपू देत नाही...

लोकांना (employees) आपल्यावर डिपेंडंट बनवून नंतर त्यांना मंद बनवण्यात यांची स्पर्धा आऊटसोर्सिंग कंपन्यांशी आहे. अतिशय फालतू कामासाठी खूप चांगला पगार देऊन हुशार ब्रेन्स कुजवणाऱ्या या इंडस्ट्रीमुळे भारत महासत्ता होण्याचे स्वप्न कधीच सत्यात उतरणार नाही याची आम्हाला खात्री आहे...मग कुणी पेसीमिस्टिक म्हणाले तर आपली त्याला हरकत नाही...

टीप : या क्षेत्रामुळे काय चांगले बदल झाले ते आम्हाला नव्याने सांगायची गरज नाही... आम्हाला या वाया जाणाऱ्या लाखो  लोकांबद्दल काळजी आहे... मूठभर tech savvy लोकांबद्दल नाही...सरकार DIPP च्या माध्यमातून यांच्यावर चांगले नियंत्रण ठेवेल अशी आशा आहे...

Monday, 28 March 2016

पुणे 52..😊

कधी कधी सिनेमा पूर्ण पाहिल्यावरसुद्धा आपल्याला काय आवडले ते लगेच सांगता येत नाही, त्यावर विचार करावा लागतो.. काही माहिती मिळवावी लागते आणि मग आपण एक कलाकृती म्हणून ओपन माईंड ने त्याकडे पाहतो...

पुणे - 52 सिनेमा आला तेव्हा आमची वेगळी लाइफस्टाइल असल्याने आजच्यासारखे वाटेल तेव्हा सिनेमे बघत नव्हतो... पण त्यात सई ताम्हणकरचे काही हॉट सिन्स आहेत असे "रसिक" मित्रांकडून  कळले होते म्हणून बघायचा होता.. पण तेव्हा priorities च्या लिस्ट मध्ये छंद नेहमीच शेवटी येत असल्याने हा सिनेमा पाहायचे राहून गेले...

आज युट्युबवर पाहिला आणि म्हटलं...वाह... बाकी काही सुचले नाही... मग यावर गुगल केले आणि कळले की फिल्म मेकिंगमध्ये noir नावाचा एक जॉनर (genre) आहे... ह्या प्रकारचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे..

देऊळ सिनेमा अजिबात न आवडल्याने गिरीश कुलकर्णीबद्दल एक अढी मनात होती पण ती पूर्ण दूर झाली...स्टोरी पेक्षा यात कलाकारांचे संवाद जास्त लक्षात राहण्यासारखे आहेत...

यातल्या प्रामाणिक पण अयशस्वी डिटेक्टीव अमर आपटे मध्ये बरेचदा आपण स्वतःलाच पाहिले असे वाटले... परस्त्रीचे आकर्षण वाटते पण आपल्या बायकोवर मनापासून प्रेम आहे या टिपिकल साच्यातल्या पुरुषाला त्याने फार सुंदर व्यक्त केले आहे... त्याच्या मनातला आवाज त्याला जसा अस्वस्थ करतो तसाच आपल्यालाही करत असतो पण आपण स्वतःला चकवण्यात व्यस्त असतो...

"कॅमेराचा वापर, सिनेमॅटोग्राफी वगैरे टेक्निकल गोष्टी आपल्या ह्याच्यावर... स्टोरी आवडली पायजेल..." असे आम्ही म्हणायचो.. पण त्यांचे महत्व आता लक्षात आले...
आणि असे म्हणणारे आम्ही "हे" होतो हे सुद्धा... हा हा हा

एक मैत्रीण तेव्हा म्हणाली होती की " पुणे 52 पाहिला नसशील तर नको पाहूस रे..एकदम भंगार आहे.."
तिला आता मेसेज करतो...;) हा हा

Friday, 25 March 2016

फसलेली क्रांती..😊

फसलेली क्रांती... (गानूकाकांच्या पोस्ट वरील कमेंट) #जुने_दिवस #RSM_Boys_Hostel

आमचे बांद्रा ईस्टला गव्हर्नमेंट कॉलनी मध्ये राजर्षी शाहू महाराज बॉयज हॉस्टेल होते... शिकणाऱ्या आणि वर्किंग क्लास मधल्या गरजू मुलांना स्वस्तात राहण्याची सोय तिकडे होती... पवार साहेबांनी 1978 साली ही संस्था चालू केली होती...

तिकडे कोळेकर नावाचे रेक्टर होते..ते हॉस्टेल ला आपले घर समजत आणि विद्यार्थ्यांना आपली मुले... आपुलकीने रागवत पण असत... नंतर नंतर असे झाले की आपले समजणे कमी आणि अपमान+रागावणे जास्त झाले...(माझ्या दुर्दैवाने मी याच फेज मध्ये 4.5 वर्ष काढले)

गरजू असल्याने सगळे अपमान मुले गिळत असत आणि तिकडेच राहत असत... रात्री 11 वाजता गेट बंद, सकाळी 6 पर्यंत जो आत तो आत आणि जो बाहेर तो बाहेर असा स्टेटस को असायचा.. हाफ पॅन्ट अलाऊड नाही, रूमवर इस्त्री वापरणे अलाऊड नाही... दारू सिगरेट तर अजिबातच नाही...सर मॅडमचा मुड खराब असल्यास कोणतेही कारण काढून रूम मध्ये येऊन अपमान होऊ शकतो...

बाहेर रिसेशन, भयंकर त्रासदायक असलेला सेल्स जॉब आणि आत हे...साधारण अशा वातावरणात आमच्यातला विद्रोह आकाराला येत होता..

एक दिवस म्हटलं... याच्या *** **, आज रूम वर बिअर आणायची.. कोण समजतो स्वतःला... 11 नंतर रिचवली आणि desired effect आल्यावर म्हटलं आता या रिकाम्या बाटल्या त्याच्या घरात फेकायच्या...पण ते नको असे ठरले...मग हॉस्टेलच्या entranceलाच एका टेबलवर ठेवायच्या असे ठरले...

त्यांचा एक खबरी आमच्याच फ्लोअरवर राहत असे... तो झोपलाय याची खात्री करून सगळ्या बाटल्या तिकडे ठेवल्या आणि मुद्दाम थोडी बिअर टेबलवर सांडली...

टेबलच्या मागे संस्थापक महोदयांचे चित्र, बाप्पा असे... दिवसा उदबत्ती लावून पवित्र होणार टेबल आज त्या धुरातून मुक्त झाला होता...

सकाळी 5.30 ला सगळ्यात आधी उठून गेट उघडताना ते पहिले जाईल याची खात्री करून आम्ही झोपलो..

पण आमच्या दुर्दैवाने चपराशाला हे कळले आणि त्याने आम्ही गेल्यावर टेबल साफ केला... 󾌹😢😢

कितीही अपमान झाले तरी त्या हॉस्टेल ने आम्हाला मुंबईत परवडेल असे छप्पर आणि स्वस्तात जेवण दिले... त्याबद्दल आपण त्यांचा ऋणी आहे..

मुंबईच्या उन्हाळ्यात रात्री/दुपारी बिना फॅनचे झोपणे, ढेकणाचे औषध मारल्यास भिंती खराब होतात म्हणून भयंकर उकाड्यात हँड gloves, सॉक्स आणि फुल पॅन्ट शर्ट घालून झोपायला आम्ही शिकलो फक्त हॉस्टेल मुळे...हिवाळ्यातही आंघोळीला गरम (कोमट) पाणी मागणे हा गुन्हा आहे हे आम्हाला तेव्हाच कळले..(ज्याने हे मागितले त्याला दुसऱ्या रात्री खोलीतून रस्त्यावर सामान फेकून हाकलले)...

या शिवाय हरयाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड अशा अनेक राज्यातील सुसंस्कृत (!!!) मुलांसोबत राहण्याचा अनुभव (?) आम्हाला दिला आणि आमचे 'कवळे' मन निब्बर झाले...😊 

स्थलांतर...

मराठवाड्यातला माणूस मुंबईला पहिल्यांदा आला की त्याला सगळीकडे समृद्धी आणि विकास दिसतो आणि तो हरखून जातो.. लोकलचा प्रवास त्याला exciting वाटतो, फोर्ट मधल्या DN रोडवर मिळणाऱ्या स्वस्त आणि मस्त गोष्टी पाहून त्याला वाटते हा तर स्वर्गच आहे... फोर्ट, नरिमन पॉईंट किंवा हिरानंदानी मधले ऐश्वर्य पाहून त्याला आपले आयुष्य लहान वाटू लागते..

गावच्या जत्रेतही होणार नाही इतकी गर्दी दादर आणि CST स्टेशनवर तो पाहतो आणि त्यात आपल्याला ही ट्रेन कशीही पकडायचीच आहे हे त्याला जाणवते आणि मग दुनियादारी कळते... या सुंदर शहराचे हिंस्त्र रूप मग हळूहळू उलगडत जाते आणि त्याला आपले ओसाड गाव सुंदर वाटू लागते आणि तिथले लोक सुद्धा अगदी प्रेमळ वाटू लागतात..

अजून काही काळ गेल्यावर (हा move on झाल्यावर) त्याला दोन्हीकडचे बेस्ट हवे असते...मुंबईची सॅलरी, लाईफस्टाईल आणि गावाकडचे निवांत कट्टे... पण होते भलतेच... मुंबईत असला की उपेक्षा आणि गावाकडे गेला की परकेपणा त्याच्या वाट्याला येतो...

अजून काही काळ गेल्यावर आपल्याला काहीतरी एकच निवडावे लागेल हे त्याला कळते पण त्यापासून तो दूर पळत असतो... अजून काही काळ जातो आणि मग मात्र तो शहर आहे तसे स्वीकारून जगायला शिकतो... नको ती comparison बंद होते आणि त्याच्यातले preconceived notions निघून जातात..अर्थात नवीन आत घेण्यासाठीच...

ज्या गोष्टी त्याला वाईट वाटत असतात त्यांची उपयुक्तता त्याला पटते आणि तो चालू लागतो...Stephen Covey म्हणतात तसे त्यानंतर तो जे आयुष्य जगतो ते त्याच्या निर्णयांचे फलित असते...

Sunday, 20 March 2016

आफ्रिदी, सायकोलॉजिस्ट आणि बदल... स्वैर विचार..


माझ्या एका मैत्रिणीच्या अंगावर वाशी ते सानपाडा दरम्यान ट्रेनच्या प्रवासात कोणीतरी पिशवीभर ह्यूमन वेस्ट फेकले. ती इतकी शॉक मध्ये होती की दादरला घरी टॅक्सी ने गेली.. ती पर्स आणि कपडे तिने परत कधीच वापरले नाहीत.. आपल्या अंगाला येणाऱ्या वासामुळे तिला स्वतःचा तिटकारा आला होता..

कांदिवली मध्ये 3 दिवसांपूर्वी एका मुलीच्या अंगावर कोणीतरी ऍसिड ने भरलेला फुगा फेकला..नशिबाने फक्त तिचे कपडे जळाले..
श्रीराम लागुंचा मुलगा ट्रेनच्या खिडकीत बसला असतांना बाहेरून दगड आला आणि त्याच्या कपाळावर लागला..त्यात तो गेला..एक मुलगी खाली पडून अपंग झाली..

प्लॅटफॉर्म वर चालत असतांना moving ट्रेन मधल्या एका मुलाने माझ्या पाठीत खूप जोरात झापड मारली..मी कळवळलो आणि तो माझ्याकडे पाहून हसत हसत गेला..पाण्याचा फुगा डोळ्यावर बसल्यावर अर्धा तास येणारे अंधत्व मी अनुभवले आहे...

काल मॅच नंतर ओवेसी आणि आफ्रिदी ची आयमाय काढणारे लोक मला या सगळ्यांचेच भाऊबंधू वाटतात... यांच्या आयुष्यात प्रचंड निराशा आहे आणि हा संताप ते असा तिसऱ्याच माणसावर व्यक्त करतात.

सायकॉलॉजीस्टची आपल्याला फार गरज आहे असे वाटते. आमच्या जुन्या जॉब मध्ये ही सुविधा होती..तुम्ही त्यांना कॉल करून त्यांच्याशी गप्पा मारू शकता.., ते आपले म्हणणे पूर्ण ऐकून घेतात आणि गरज वाटल्यास भेटायला येतात. आपल्याला मार्ग सुचवतात..यात मार्गदर्शकापेक्षा मित्रासारखा रोल असतो..

ज्या तरुणाईच्या आधाराने आपण महासत्ता वगैरे बनायच्या पोकळ गोष्टी करतो ते असे अन्सटेबल आहेत आणि बहुतांश लोकांना शॉर्टकट हवा आहे.. विशेष झीज न होता आपलेही सहज आयुष्य बदलावे असे खूप जणांना वाटते.

यातूनच मसीहाचा शोध घेतला जात असावा.."तुम्हीच आमचे  तारणहार" असे कोणाला म्हटले की आपली मेहनत वाचते आणि माणसाचा चमत्कारावर विश्वास सुद्धा दृढ होतो..
स्वतःचा नव्याने शोध घेऊन काही बदल घडवण्यापेक्षा आफ्रिदीच्या आईची ** म्हणणे लैच सोपे आहे... हा हा हा

टीप : मी काही गुणांचा पुतळा नाही. सोबतच्या मुलींना बऱ्याच प्रमाणात त्रास मी सुद्धा दिला आहे.. आपल्यालासुद्धा परीसस्पर्श होईल असे आम्हाला अगदी अलीकडे वाटत होते.. कारण काही असो पण एका जातीचा द्वेष सुद्धा आम्ही बराच काळ करायचो..

पण हे चूक आहे हे जाणवले..कदाचित उशीर झाला असला तरी आपण बदलणार हे नक्की..

सरकारी रुग्णालयात समुपदेशन केल्यास फरक पडेल असे वाट्ते.. अर्थात सगळे त्यांनी करायचे तर आम्ही मंदिरात घंटा हलवायची का? हाहाहा

Saturday, 27 February 2016

मनोज वाजपेयी, Homosexuality आणि भिकू म्हात्रे... स्वैर विचार..

मनोज वाजपेयी, Homosexuality आणि भिकू म्हात्रे... स्वैर विचार..

वयाच्या 27व्या वर्षी मनोज वाजपेयीला पहिले व्यवसायिक यश मिळाले ते सत्या मधल्या भिकू म्हात्रेच्या स्वरूपात..त्याआधी तो स्वाभिमान (1994) या सिरियल मध्ये लॉयर (सुनील) होता हे फारसे कोणाला आठवतही नसेल..

तर मुद्दा हा की हा माणूस तेव्हापासून आपला आदर्श राहिला आहे... याने सत्याच्या रोलसाठी ऑडिशन दिली होती आणि निवड होऊनही फक्त दिग्दर्शकाच्या आग्रहाखातर भिकू म्हात्रेचा दुय्यम रोल त्याने accept केला..

"मुंबई का भाई कौन?? भिकु म्हात्रे...." असे समुद्रकाठच्या  दगडावर उभे राहून ओरडणारा भिकू आठवला की अजूनही अंगावर शहारा येतो...लहान गावातल्या माझ्यासारख्या टीनेजरला मुंबईचे पहिल्यांदा आकर्षण वाटले ते फक्त याच्यामुळे..अजूनही भिकू म्हात्रे हा माणूस खोटा आहे हे खरे वाटत नाही..वाटते भेटेल तो कुठे तरी.. एखाद्या अरुंद गल्लीमध्ये...:)  #भिकू_म्हात्रे #EternalCharacter

नंतर शूल राजनीती आरक्षण आणि वासेपूर आले आणि एक कायमचा ठसा उमटवून गेले... आज पाहिलेल्या अलिगड मधला वयस्कर म्हातारा प्रोफेसर त्याने जो रंगवला आहे तो मात्र शब्दात पकडता येत नाही...

अनेक वर्षे एकटेपण अनुभवल्याने स्वभावात आलेला विक्षिप्तपणा, आपले sexual orientation gay ह्या तीन शब्दांपलीकडे आहे किंवा कोणत्याही कवितेचा अर्थ शब्दात नसून तो तिच्या अंतरंगात आहे...पोकळीत आहे असे सांगताना त्याचे एक्सप्रेशन... निव्वळ लाजवाब आहेत...

पोळ्याला दगड मारल्यावर मधमाशा जशा झुंडीने उडतात तसे अनेक विचार हा सिनेमा आपल्या डोक्यात सोडून जातो...

homosexual असणाऱ्या लोकांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नेहमीच हेटाळणी आणि तिरस्कारयुक्त का आहे? आपल्या नामांकित शिक्षण संस्थांमध्ये राजकारणामुळे असे किती चांगले लोक बळी जात असतील? मुळातच दबलेल्या माणसाला अजून दाबण्यात समाजाला कोणता विकृत आनंद मिळत असेल? या सिनेमात दाखवलाय तसे संवेदनशील पत्रकार खरंच किती असतील आणि त्यांची ही संवेदनशीलता किती काळ टिकत असेल? सिनेमातला प्रोफेसर श्रीनिवास सिरस कोर्ट केस जिंकूनही का हरला?

My Brother Nikhil या सिनेमाने #LGBT कम्युनिटीकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला..पण तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला..कदाचित या सिनेमाचे ही हेच भविष्य असावे... कारण critical acclaim ने पोट भरत नाही आणि त्यासाठी लोकांना चिकनी चमेली आणि हनी सिंगूच पाहिजे...

प्रॉफिटची नाही पण हा सिनेमा पाहून #homosexuality बद्दल निदान काही लोकांचे तरी मत बदलेल हीच अपेक्षा आहे...

सिनेमा नक्की पहा... थेटरात पहा... कमी स्क्रीन मिळाल्याने याचे तिकीट महाग आहे.. भलेही 4 सिगरेट कमी प्या पण हा सिनेमा पहा..󾌵

टीप : जे पीत नाहीत त्यांनी मला तसे मला सांगायला येऊ नका.. कारण ही फार काही भूषण वाटावी अशी गोष्ट नाही...तुम्ही 4 ग्लास दुदु कमी प्या.. हा हा हा

#Aligarh #ManojVajpayee #Salute #Movie #Bollywood

Friday, 12 February 2016

एका बुडलेल्या कर्जाची कहाणी...

सामान्य माणसाने सर्व genuine कागदपत्रे जमा केल्यावर होम लोन दिले जाते... फक्त 4 हप्ते चुकले की त्याला बँकेची नोटीस जाते... मग फोनवर आणि घरी छपरी लोक पाठवून अपमान केले जातात... नंतर 60 दिवसांत सुधारणा न झाल्यास 19(2) नोटीस दिली जाते... मग पुढच्या 30 दिवसानंतर 19(4) नोटीस देऊन symbolic पझेशन घेतले जाते... घरावर बँकेची नोटीस चिकटवून खुलेआम त्याची वाजते... मग 45 दिवसांत कोर्टात न गेल्यास घर विकायला काढले जाते... पेपर ला ऍड वगैरे देऊन बोली लावून घर विकले की केस बंद...

हा माणूस पैका जमवून कोर्टात जरी गेला तरी बँकेचे पॅनल lawyer मोठ्या कौन्सेल ला लावतात... त्याच्यासमोर याचा कमी फी वाला वकील उभा राहू शकत नाही आणि हा संपतो...

मोठ्या कंपन्या मात्र दिखाऊ कागदपत्रे जमा करून आणि एकच प्रॉपर्टी 10 बँकांना तारण ठेऊन OD, TL सारख्या 4-5 वेगवेगळ्या facilites असलेले लोन घेतात... मग परत करायचा कोणताच इरादा नसल्याने ते अर्थातच बुडते...

खरा फरक पडतो तो या नंतर... बँका त्यांना विनंती करतात की प्लिज लोन चा हप्ता द्या... हवे तर आम्ही व्याज माफ करून नव्याने हप्ते बनवून देतो... (याला Asset Reconstruction म्हणतात)

मग ते केल्यावर पुन्हा हप्ते अडकतात... असे 2 3 वेळेस झाले की बँकेला हे कर्ज परत येणार नाही हे समजते... पण तसे जाहीर केल्यास या नुकसानीची तरतूद करावी लागते... त्यामुळे प्रॉफिट कमी होतो आणि शेअर price सुद्धा...

मग हे कर्ज (NPA) Asset Reconstruction कंपनीला विकले जाते आणि त्यांचे पॅनल lawyer अग्रेसीवली कोर्टात जातात...ARCIL IARC आणि इतर अनेक कंपन्या हे काम आवडीने करतात... प्रॉपर्टीवर अनेक बँकांचा चार्ज असल्यास त्यांच्याशी भांडतात नाहीतर त्यांच्याकडून हे अकाउंट (कर्ज) विकत घेतात..

या सगळ्यात ती दिखाऊ प्रॉपर्टी विकून कर्जाची रक्कम कधीच मिळत नाही... आणि जे काही मिळते ते मिळायला 10+ वर्षे लागतात...

जिकडे मिळायची शक्यता आहे ते लोक मग BIFR / AIIFR ला रेफरन्स पाठवतात... ह्या सरकारी संस्था रिपोर्ट उशिरा देऊन यांना मदत करतात... इतके सगळे झाले तरी या निर्णयाला DRAT मध्ये आणि त्या नंतर हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अपील करता येते आणि त्यावर निर्णय येईपर्यंत सगळ्यांचे हात बांधलेले असतात...

आम्ही गरीब आहोत / मोठे नुकसान झालेय असे म्हणून बँकेला पैसे न देणारे हे व्यापारी वकिलांना मात्र त्यांच्या योग्यतेनुसार एका अपिअरन्स साठी 5 हजार ते 3 लाख रुपये मोजतात... drafting आणि मिसलेनिअस अप्लिकेशन आणि वरखर्च वेगळा....अशा प्रकारे हे प्रकरण लांबवले जाते...

त्यात कधी डिफॉल्टर व्यक्ती स्वर्गवासी होते... त्यांचे लांबचे नातेवाईक केस मध्ये येतात...मग नव्याने त्यांना वकील नेमून प्रतिज्ञापत्रे (affidavit) द्यावी लागतात... कौन्सेल येऊ न शकल्याने सुद्धा काही महिने डेट घ्याव्या लागतात...

आणि जर एकदम भारी वाला बिझनेसमॅन असेल (जसे की ढेकणेश अंबानी किंवा मल्ल्या सांड) तर डायरेक लगे वरून (मिनिस्टरी) ऑर्डर येते की शांत रहा...

आणि मग वरून फोन आल्याने ज्याने काहीच कागदपत्र न पाहता लोन approve केले त्या मिडल क्लास मॅनेजरच्या कोर्टात वाऱ्या चालू होतात...

15 वर्षांपूर्वी तुम्ही या दिवशी या तारखेला मॅनेजर केबिन मध्ये याला भेटले... सान्गा काय बोललात ते...सही तुमचीच आहे... याचे परिणाम जाणता ना??? वगैरे वगैरे...

समोरचा माणूस हार्टबीट वाढून अस्वस्थ झाला की असे प्रश्न विचारणारा जाणकार वकील विजयी मुद्रेने कोर्टाकडे पाहतो...

आमच्यासारखे शिकाऊ वकील त्याच्याकडे कौतुकाने पाहतात आणि बाहेर येऊन सुट्टा मारत हि स्टोरी आपल्या 'हि'ला सांगतात....

तात्पर्य : वकिलीत लय पैसा आहे... हा हा हा

Thursday, 4 February 2016

निर्वासित आणि उंदीलमामा...

निर्वासित आणि उंदीलमामा...

नेहमीप्रमाणे त्याने ऑफिसला जाणारी लांब पल्ल्याची बेस्ट बस पकडली.. सकाळी कमी गर्दीची वेळ असल्याने आरामात जागा मिळाली आणि त्याने पेपर उघडला... डोक्यात आज दिवसभराचे आणि येणाऱ्या विकेंडचे प्लॅनिंग....

तेवढ्यात त्याची बस थांबली आणि लोक एक एक करून बस मधून खाली उतरू लागले... काही विशेष नसेल आणि थोड्याच वेळात सगळे नीट होईल असा विचार करून ह्याने दुर्लक्ष केले... शेवटी याच्यासहित सर्वलोक खाली उतरले आणि बस नादुरुस्त झाल्याने दुसरी बस घ्या असे सुचवण्यात आले...

इतक्या वेळ आरामात बसलेल्या त्याला आता नवीन बस मध्ये जमेल तसे ऍडजस्ट व्हावे लागते.. पाऊण उभे राहून पाठीला रग लागली आणि पुढे दिवसभर फ्रेश असण्याचा कल्पनेने सुद्धा त्याला थकवा आला..

मग त्याने बेस्ट बस वाल्यांना थोड्याफार शिव्या दिल्या आणि नंतर आपल्या नशिबाला...मग त्याला वाटते की वरवर पाहता साधा वाटणारा हा बदल आपल्याला इतके अस्वस्थ करू शकतो तर काश्मीर किंवा फाळणी वाल्या निर्वासितांचे काय झाले असेल...

सर्व लोक बस मधून उतरत असतांना आपण आळस केला.. हा विचार करून की गोष्टी आपोआप पहिल्यासारख्या होतील .. त्या विचारात आपण पाठची बस सोडली असेल का?

कुठलाही analysis न करता बदलाला (change) सामोरे जाणारे Who moved my Cheese मधले दोन उंदीलमामा आणि ever-aggressive दिल्लीवाले (निर्वासित) यांच्याबद्दल आपुलकी वाटली...

असो... आज फ्रायडे आहे... no more serious thoughts...󾌵

तेज धार...

मोठ्या लोकांची दुखणी आणि फेसबुकचा बेजबाबदारपणा...

लहानपणी मधुमेह हा मोठ्या (श्रीमंत) लोकांना होणार आजार आहे असे ऐकले होते त्यामुळे त्याबद्दल तितका सिरीयस विचार नाही केला..पण आईला डायबेटिस झाल्यावर कळले की हा आजार सामान्य लोकांना ही होतो आणि भयंकर त्रासदायक सुद्धा आहे...

इन जनरल आपण मोठ्या लोकांच्या दुखण्यांकडे फारसे लक्ष देत नाही.. मग त्या रेसिडेंट डॉक्टरांच्या समस्या असोत किंवा शहरातल्या मिडल क्लास वाल्यांच्या...आपली सिम्पथी / empathy आपण गरीब, खेड्यातील लोकांसाठी राखून ठेवलेली असते.. मग भलेही तिची गरज असो अथवा नसो..

फेसबुकवर सुद्धा हेच बघायला मिळते...लाइकच्या स्वरूपात  जास्त प्रतिसाद मिळणाऱ्या लोकांना जो त्रास होतो तो आपण त्यांचे नखरे किंवा अतिशहाणपणा म्हणून इग्नोर करतो...

मग असाच कोणीतरी खोडकर मुलगा येतो आणि आपल्याला म्हणतो की मला तुझ्या लिस्ट मध्ये घे नाहीतर वाट लावेल.. आपण त्याला मजेत घेतो..गोड बाळ वगैरे समजून... मग तो आपण लिहिलेली पोस्ट आपल्या वॉल वरून डिलिट करतो... हो हे शक्य आहे... मग आपले अकाउंट अश्लील म्हणून रिपोर्ट होते.. मग आपले अकाउंट 3 दिवसांसाठी फेसबुक कडून ब्लॉक केले जाते... असे 2-3 वेळेस झाले की फेसबुक आपल्याला अनिश्चित काळासाठी ब्लॉक करते...

आपले अस्तित्व आता फक्त एका अकाउंट पुरते मर्यादित असते... आपल्याला इकडे लाइक, कमेंट, मेसेज काहीच करता येत नाही... ज्या फेसबुकवर आपण एकेकाळी कॉलेज कट्टयासारखा धिंगाणा घातला, खूप छान छान लोकांशी बोललो, बरेच काही शिकलो... तिकडे आता त्यांच्याशी काहीच संपर्क करता येत नाही... त्यांचे मेसेज आल्यावर रिप्लाय करता येत नाही...

फेसबुकने आपल्याला एका झटक्यात परके (की पोरके)  केलेले असते....फेसबुकला कुठेच आणि कसेच आपले म्हणणे ऐकून घ्यायचे नसते... पोलीस मदत करतात पण किती लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात?

आणि या सगळ्यात आपले मित्र आपलीच मजा घेत असतात... तू लै वकिली दाखवत होतास... हिरो बनत होतास... वगैरे बोलून....या सगळ्यात एंटरटेनमेंट value भरगच्च असल्याने त्याला Angry young man type हिरो बनवले जाते...

अर्थात इतर लोकांना हा व्यक्ती गंमतशीर वाटत असल्याने हा त्यांचा दोष नसतोच... कारण काही काळापूर्वी तुम्ही सुद्धा त्या प्राण्याला गोड भूभु समजत असता.. नंतर कळते हा तर नदीतील साप आहे...बोटीतल्या लहान मुलांना विनाकारण त्रास देणारा...

आम्हाला या आजाराचा त्रास फारसा नाही कारण आम्ही फेसबुक, ब्लॉग किंवा website वर लिहून आपले पोट भरत नाही...आमची वट आहे आमच्या कोर्टात...अर्थात तिकडे आपली भेट व्हावी अशी इच्छा नाहीच...

काहीच अपेक्षा नसतांना सुद्धा फेसबुक ने आमच्या पदरात चांगल्या लोकांचे दान घातले आहे...त्याबद्दल फेसबुकचा आभारी आहे पण मला असे कधीही ब्लॉक करायला किंवा बेदखल करायला मी कोणाचा मिंधा नाही...म्हणून हा त्रास होतो आहे...

आणि ज्याने हे केले त्याचा हिशोब तर होणारच आहे... आपल्याला अजिबात घाई नाही...आणि तळतळाट वगैरे देण्याइतके आपण कमजोर नाही.... देव त्याला ही फळे चाखण्याची शक्ती देवो ही इच्छा....

आदरणीय बिल्लाभाई (संजय दत्त) चा डायलॉग खास तुझ्यासाठी...गाणे तेज धार... सिनेमा मुसाफिर...(2004)

जान बच गई तो नींद चली जायेगी
नींद कभी आ भी गई तो चिखता हुआ कांपता हुआ जागेगा तू
बार बार.....
अंहंहंहं... तेज धार....

बोल कहा छुपेगा.... कहाँ छुपेगा बोल...
ऐसी कोई जगह नही जहाँ बचेगा....

 सीनाजोरी चोरी या हरामखोरी.....
इसका तो एक ही जवाब है यार.....

तेज धार......

Wednesday, 27 January 2016

राक्षस... कॉर्पोरेट वर्ल्ड... आणि अधूरे ख्वाब... स्वैर विचार...

राक्षस... कॉर्पोरेट वर्ल्ड... आणि अधूरे ख्वाब... स्वैर विचार...

चांगल्या गोष्टींचे संवर्धन दोन प्रकारे शक्य आहे असे आम्हाला वाटते... पहिला आणि समाजमान्य प्रकार म्हणजे स्वतःच काही चांगले करणे... आणि दुसरा प्रकार म्हणजे वाईट गोष्टींना संपवणे.. राक्षसगणाचे लोक दुसऱ्या प्रकारात मोडत असावेत...

परवा दगडी चाळ सिनेमा पाहिला आणि एक जुनी आठवण ताज़ी झाली.. 2007 साली टाइम्स ऑफ़ इंडिया मध्ये Corporatisation of Crime या विषयावर एक लेख आला होता ज्यात त्यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या क्रिमिनल गँगमध्ये Recruitment आणि Training कसे प्रोफेशनली करतात हे सविस्तर लिहिले होते... त्यांना मिळणारे Compensation & Benefits सुद्धा एखाद्या executive सारखे असतात...




"Best places to work in India" या नावाने अतिशय खोटारडा सर्वे सगळ्या मोठ्या कंपन्या दर वर्षी घेत असतात..तशीच बेस्ट गँग   to work for हा बहुमान अरुण गवळी यांच्या गँगला त्या वर्षी देण्यात आला होता..

त्यांच्या गँग मध्ये फ्रेशर ला फिक्स 20,000 रुपये पगार अधिक Mediclaim, Children Education allowance, राहण्याची सोय अशी व्यवस्था आहे.. गँगचे काम करतांना कोर्टाने शिक्षा दिल्यास किंवा मरण आल्यास आजन्म त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जाते.. शिवाय मोठ्या Assignments साठी Incentives and Perks (बक्षीस) आहेत, घरात लग्नकार्य असल्यास आर्थिक मदत वगैरे सुविधा आहे..
शिवाय समाजात मान मिळतो आणि सेक्यूरिटी मिळते ती वेगळी...

तेव्हा अरुण गवळी गँग मध्ये फ्रेश MBA घेणार अशी बातमी होती.. ज्यांचे काम फ़क्त Management of Resources.. &  liaisoning...शिवाय educated असल्याने त्यांना वेगळे स्टेटस...

हे वाचल्यावर लगेच ठरवले आपण apply करायचेच *** **..... आणि तो प्लान बायकोला (तेव्हाची फ़क्त मैत्रीण) सांगितला... तिने अर्थातच धुड़कावून लावला आणि पुढे डॅडींना कमलाकर जामसांडेकर खटल्यात अटक झाली आणि आमचाही सेल्स जॉब चालु झाला..

आता असे वाटते आहे की हा आतला राक्षस परिस्थितिने (की नशिबाने) कितीही वेळा दाबला असला तरी त्याने वेळोवेळी स्वतःचे अस्तित्व दाखवले आहे...हा जर पुन्हा ठळक स्वरुपात समोर आला तर काय होईल...अजुन एखादा माधव आपटे (डोंबिवली फ़ास्ट) बनून राहील?? की खरच त्याला काही बदल करता येईल...

कुख्यात गुंड बबलू श्रीवास्तव लिखित "अधूरे ख्वाब" हे पुस्तक दहिसर पोलिस स्टेशनला वाचले होते..

असे पुस्तक मी लिहिले तर त्यात आमची दोन अपूर्ण स्वप्ने नक्कीच नोंदवता येतील..

पाहिले IPS ऑफिसर होण्याचे आणि दूसरे सुभाष नागरेंचा चंदर होण्याचे... 󾮖󾮖󾮖
(सुभाष नागरे in सरकार)

#डॅडी #दगडी_चाळ #दगडी #चाळ

आणि हो... आता सिनेमाबद्दल... अंकुश चौधरीने रोमॅंटिक चाळे करून सिनेमाची I घातली आहे... झिरो फिगरच्या नादात करीना बरबाद झाली तसा हा गुणी हीरो सड़पातळ होऊन संपला...

मकरंद देशपांडे यांनी साकारलेला डॅडी अप्रतिम आहे.... #चुकीला_माफ़ी_नाही

त्यांच्याच आवाजातले दोन डायलॉग.. आदरणीय मालिक भाई यांना समर्पित...

1. " उसे नहीं रोक पाया कोई.. उसने क्राइम को बिझनेस बनाया... पॉलिटिक्स को बुरखा पहनाया और अंडरवर्ल्ड को अप्परवर्ल्ड में लाया.." __/__ #Vision

2. " चीलों के बारे में बहोत कम लोग जानते है की उनमे सब्र बहोत होता है... शिकार पर नजर पड़ने के बाद चिल एक एक घंटा नाही.. एक एक हफ्ता..एक एक महीना आसमाँन में उड़ती रहती है..सही वक्त आनेपर शिकार झपटा गया...
फिर वो चाहे पूरा शहर की क्यों ना हो..."

Facebook link : https://www.facebook.com/photo.php?fbid=1194946303855430&set=a.402468613103207.114995.100000202159097&type=3  08.10.2015

आम्ही अभिजन आणि बहुजन सुद्धा....


कट्यार काळजात घुसली सिनेमा फक्त अभिजनांना आवडतो असे ऐकले आहे.... म्हणजे मी स्क्रिनिंग ची दुसरी टेस्ट पास झालोय... (पहिली 30 वर्ष आधीच पास झालोय...कोणती ते नका विचारू) ;)

आता तिसरी टेस्ट... पेशव्यांबद्दल... आपण इतिहास वाचला नाही...आपली प्रायोरिटी फक्त मूलभूत गरजेपुरती मर्यादित होती...आजही आहे... म्हणून आपुन लोकसत्ता वर फुलली डिपेंडंट आहे... for opinion formation...

आता हे चूक आहे हे कळतंय... पण क्या करते... नाही हो वेळ अभ्यासात बुडायला... आणि हे लोकसत्ता वाले जो चूक त्याला हाणतात.. त्यांचा कोणी आपला नाही... आपल्याला असेच लोक आवडत्या...मग विश्वास ठेवायला हरकत नाही... असो...

तर आजचा अग्रलेख वाचून आम्ही भंसालीच्या विरोधात आहोत.. नुकतीच ऑनलाइन पेटीशन sign केलीय... फरक पडणार नाही माहितीय... पण बरे आहे ना... वातावरण निर्मिती साठी...

तर... अशा प्रकारे आम्ही स्क्रिनिंग ची तिसरी परीक्षा हि पास झालो आहोत.... आणि अभिजन हे सर्टिफिकेट साठी पुढच्या प्रोसिजर ची वाट पाहत आहोत...

तोपर्यंत जय परशुराम... शिवाजी महाराज की जय... संभाजी महाराजांचा विजय असो... जय भीम.. जय शाहू महाराज..जय फुले महाराज....

(शाहू महाराजांच्या गरीब मुलांसाठी असलेल्या हॉस्टेल मध्ये आम्ही 5 वर्ष राहिलोय... त्यामुळे बहुजनांत आम्हाला घेतील का??असा विचार डोक्यात आहे) हा हा हा

Facebook link : https://www.facebook.com/shriniketd/posts/1217234784959915 21.11.2015

याहू चॅट in 2000..

याहू चॅट in 2000.. #जुन्या_आठवणी #औरंगाबाद

आता एका मैत्रिणीच्या वॉल वर चॅट करतांना जुने दिवस आठवले...1999-2000 साली इंटरनेट कॅफे वर जाऊन आम्ही वेगवेगळ्या कम्युनिटीज मध्ये जायचो आणि तिकडे मुलींना शोधून चॅट करायचो...

asl हा तेव्हा पहिला प्रश्न असायचा... याचा अर्थ age sex living... मी लिहायचो 21 m Mumbai... मला वाटायचे 21 म्हणजे आपण मोठं वाटतो आणि मुंबईचा आहे असे म्हटले की पोरगी पटणार...हा हा हा

नंतर मैत्रिणीच्या नावाने अकाउंट चालू केले आणि मुलांशी चॅट करू लागलो... एक जण माझ्यासारखाच त्याच्या मैत्रिणीच्या (!!) नावाने चॅट करायचा..

एका मुलीला asl च्या रिप्लाय मध्ये इम्प्रेस करायला म्हणालो कि I am 21 Male Mumbai and salary 15000. (हा तेव्हा मोठा आकडा होता) हा हा हा
मुलगी खरोखर स्मार्ट होती.. म्हणे I dint ask your salary...you loser... आमचा चेहरा तोंडात मारल्यासारखा... हा हा 󾌹󾌹󾌴󾌴󾌴󾌧

एकदा एका मुलाला उगाच शिव्या दिल्या... तो म्हणे are you really interested in chat? why are you talking like a kid? मी अजून शिव्या दिल्यावर मात्र त्याने माझी कह-के-घेतली... त्याची इंग्लिश वर कमांड होती... किबोर्ड वर...आणि शिव्यानवर सुद्धा...
आम्ही चारी मुंड्या चीत... हा हा हा

एकदा एका गे कम्युनिटी मधल्या मुलाशी बोलत होतो...तोही औरंगाबाद चा होता...त्याने विचारले आपण भेटलो तर तू मला तसे काही करशील का? मी घाबरून म्हटलो नाही... म्हणे why not?? हा हा.. मी पळून गेलो...

आता जुने मेल्स काढून वाचले तर आमचे हायफाय इंग्लिश पाहून शरमेने पाणी पाणी होते... हा हा हा

Facebook link : https://www.facebook.com/shriniketd/posts/1246947808655279 01.01.2016

आमचा झेंडा जळाला....


2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी एक 56 इंची माणूस आपकी अदालत मध्ये आला होता...

तो म्हणी..." पाकिस्तान ने हल्ला केला तर अमेरिकेकडे आपण जाऊन रडतो...ओबामा ओबामा...(रडण्याची नक्कल)  मी म्हणतो त्यापेक्षा पाकिस्तान ला जा ना....पाकिस्तान को उसी भाषा मे जवाब देना चाहिये...."

किस भाषा मे असे विचारले की म्हणे... बोल तो दिया.. उसी भाषा में...(अतिशय स्पष्ट उत्तर आहे म्हणे हे) हा हा

लोकांना वाटले हा निवडून आला की आता गोध्रा type धिंगाणा होणार आणि "त्यांचे" लोक नेहमी आपल्यासमोर दबून राहणार....पुढे ह्याच माणसाने महाराष्ट्रात एका "पेज-3 वाघोबा" ला आवरायला ओवैसी ची पापी घेतली... हा हा हा

आजकाल नवाज शरीफ त्याचे खास आहेत म्हणे... चर्चेने शांतता प्रस्थापित होणार म्हणी...

या सगळ्यात आम्ही मात्र आहोत तिथेच आहोत...बांदर्याच्या  देवातला दगड दिसला आणि तो जोरात लागलासुद्धा म्हणून पेगवर पेग रिचवतोय....

Facebook link : https://www.facebook.com/shriniketd/posts/1248858135130913?pnref=story 05012016

विद्यापीठ राजकारण..

रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणात एक जुनी गोष्ट आठवली... आमचा एक मित्र JNEC (औरंगाबादचे फेमस इंजिनीअरिंग कॉलेज) मध्ये General Secretary निवडणुकीसाठी उभा होता... तो अभ्यासात हुशार होताच आणि त्याचा जनसंपर्क सुद्धा चांगला होता..

पण निवडणूकीच्या वेळी त्याला जे जातीय अनुभव आले ते त्याने काही वर्षांनी मला सांगितले.. रोज त्याच्या सोबत मेस मध्ये जेवणारे मित्र त्याच्या जातीमुळे त्याच्या विरुद्ध गोटात गेले... "आपल्याला शिवशाही पाहिजे पेशवाई नको" असा त्याच्या विरुद्ध प्रचार केला गेला... धमक्या, मुले आणणे वगैरे सगळे करून झाले...

आमचा मित्र या सगळ्याला पुरून उरला आणि 2005-06 साली GS झालाच.... नंतर त्याला अनेक राजकीय पक्षांनी सत्कारासाठी बोलावले पण हा हुशार होता..त्याने सर्व आमिष टाळून आपले करिअर बनवले.. आज तो यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे....

रोहित वेमुला सुद्धा दलित चळवळीचा नेता होता असे आता लोकसत्ता मध्ये वाचले..त्याचे आणि संघटनेचे कार्य माहित नसले तरी त्याची कहाणी अर्धवट राहिली... 󾌹
त्याचेही काही निर्णय चुकले असतीलच... पण विद्यापीठ राजकारणाने आणखी एक बळी घेतला....