Sunday, 8 November 2015

प्राधान्यक्रम..

आटपाट नगर होते.. सर्व दिशेने लोक तिकडे शिक्षणासाठी आणि व्यापारासाठी त्या शहरात जात असत..या शहरात कोणीच उपाशी मरत नाही आणि जो मेहनत करतो त्याला हे शहर भरभरून देते असा त्याचा नावलौकिक होता..

अशा या शहरात १७५ वर्षे जुने नामांकित विद्यापीठ होते जिकडे ४ मुले एका प्रोफेशनल कोर्स च्या निमित्ताने एकत्र आली ही त्यांची गोष्ट..

या ४ मधील २ मुले so called उच्च जातीतली होती आणि २ मुले मागास होती... यात एक छोट्या गावाहून आलेला उच्च जातीतला पण गरीब मुलगा होता.. स्वजातीतले लोक त्याला कमी समजत असत आणि इतर जातीय लोकांसाठी तो soft target होता.

एकदा काय झाले, त्या चौघांमधल दुसरा उच्च जातीय मुलगा तिसर्या मुलाला त्याच्या जातीवरून आणि स्कॉलरशिप वरून काही बोलला. मग त्याला चौथा मुलगा आणि त्याचे विद्यार्थी संघटनेमधील काही मित्र..असे सगळे भेटले आणि त्या उच्च जातीय मुलाला कसा धडा शिकवावा हे त्यांनी ठरवले.

राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेल्या त्या टोळक्याने आपण कसे कमजोर आहोत म्हणून आपल्यावर हा अन्याय होतोय अशी सगळीकडे हवा केली आणि चुकून काही बोलून गेलेल्या त्या मुलाला एकटे पाडले... आणि atrocity खाली कारवाई करू अशी धमकी दिली..
हे ऐकून घाबरलेल्या त्या मुलाने बिनशर्त माफी मागितली आणि या समुहाचा विजय झाला... उच्चवर्गीय (?) असेच घाबरट असतात आणि आपण काय भारी धडा शिकवला असे त्यांच्यात बोलणे झाले आणि त्यांनी ते सेलिब्रेट सुद्धा केले..

लहान गावाहून आलेला पहिला मुलगा हे सर्व पहात होता..त्याच्यासाठी बाळासाहेब आणि बाबासाहेब हे दोनच देव असल्याने त्याला कोणतीही बाजू घेता आली नाही..

आज या गोष्टीला १० वर्षे झाली आहेत... त्यांनी घाबरट ठरवलेला मुलगा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सुस्थितीत आहे. ज्या लोकांनी समूह बनवला ते सरकारी नोकरी आणि राजकीय करिअर (!) उपभोगत आहेत.
आणि ज्यावर अन्याय (!) झाला म्हणून हे सगळे एकत्र झाले तो मुलगा एका KPO मध्ये नोकरी करून नोकरी आणि Matrimony च्या Websites धुंडाळत आहे...अजूनही अस्वस्थ आहे..
कदाचित हा सुद्धा त्याच्यावर अन्याय आहे असे त्याला वाटत असावे...

हे सर्व लांबून पाहणारा तो छोट्या गावातला मुलगा आजही त्याच शहरात आहे.. लोकांचे निरीक्षण करण्याचे त्याचे आवडते काम अजूनही तसेच चालू आहे...

टीप : कोणालाही कोणत्याही बाबीवरून कमी लेखणे हा हेतू नाही. काय धरावे आणि काय सोडावे हे ज्याचे त्याने ठरवावे..

आणि ही सत्यघटना असल्याने योगायोग अजिबात नाहीत..  ;)