Sunday, 18 October 2015

Movie Review : राजवाडे & सन्स

प्रत्येकाला आपले स्वतंत्र आयुष्य जगायचा अधिकार असतो..आपले निर्णय स्वतः घेणे सोपे असले तरी त्यांची संपूर्ण जबाबदारी घेण्याची प्रव्रुत्ति मात्र दिसत नाही आणि या जबाबदारी झटकण्यातुन नाती कोमेजतात..

राजवाडे & सन्स ही अशाच एका जॉइंट फॅमिली ची गोष्ट आहे.. मराठी सिनेमातले घर शक्यतो मधमवर्गीय असते आणि व्हिलन महालात असतो.. पण हे राजवाड़े शब्दशः महालात राहणारे कुटुंब आहे जिकडे सर्व भौतिक सूखे पायाशी लोळण घेतात पण प्रत्येकाच्या मनात काही न काही निसटल्याची भावना आहे...

आजोबांची घराला घट्ट बांधून ठेवायची तळमळ असली तरी तिसऱ्या पिढीचा श्वास त्यात गुदमरतो आहे.. मधली पीढ़ी आता आपल्याला काहीच बदल करणे शक्य नाही या वैफल्यात कुठेतरी गोंधळलेली आहे...

अशा या घरात एक माणूस येतो..त्यांच्यातलाच..पण फार पूर्वी घर सोडून पळालेला आणि आता जग पाहुन परत आलेला..त्याच्या येण्याने घरात  सांस्कृतिक उलथापालथ होते आणि कोंडलेले श्वास आणि मने मोकळी होतात.. आपल्याच माणसांची नव्याने ओळख होऊन घराची घडी बसत असतांनाच हा नवीन माणूस परत निघुन जातो..तो परत कधीच न येण्यासाठी...

फार पूर्वी अशोक सराफ यांचा खिचड़ी नावाचा मराठी सिनेमा होता..त्याची आपल्याला आठवण आली तरी हा सिनेमा कोणत्याही फॉरमैट मध्ये बसत नाही इतका हा प्रचंड वेगळा आणि सुंदर आहे..

यातले बोल्ड सीन आपल्याला अश्लील वाटत नाहीत, यातली स्वतंत्र व्यक्तिमत्वे आपल्याला स्वैराचारी वाटत नाहीत, यातला सामान्य माणूस आपल्याला बोरिंग वाटत नाही, यातले कड़क आजोबा आपल्याला खाष्ट वाटत नाहीत.. विशेष म्हणजे यातले डबल स्टैंडर्ड्स ने वागणारे लोक सुद्धा आपल्याला प्रामाणिक वाटतात..

आयुष्यात साध्या साध्या गोष्टी राहून जातात आणि प्रत्येक वेळी आर्थिक परिस्थिती हेच कारण नसते हे या सिनेमाने दाखवून दिले...

डोंबिवली फ़ास्ट मधल्या माधव आपटेला आयुष्यभर लोकल ट्रेन मध्ये विंडो सीट मिळाले नाही म्हणून तो शेवटच्या प्रसंगात गोळी लागल्यावर विंडो सिट वर बसून प्राण सोडतो आणि आपण आवंढा गिळत थेटर सोडतो...

गरीबी दाखवून प्रेक्षकांना रडवणे सोपे आहे असे गृहीत धरल्यास राजवाड़े घरातल्या लोकांबद्दल सुद्धा असेच दाटुन येणे हे या सिनेमाचे यश आहे... बाकी कलकारांबद्दल जितके बोलावे तितके कमी आहे... प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या भूमिकेचे सोने झाले आहे... त्यासाठी दिग्दर्शकाला कड़क सलाम...

हा सिनेमा नक्की थेटर मध्ये पहा... आणि मला सांगा काय वाटले... तुम्हाला आपली माणसे यात नक्की दिसतील...

#राजवाड़े #मराठी #सिनेमा #Rajwade

Thursday, 8 October 2015

#KGMS

आमच्या बाळाचा दुसरा वाढदिवस... :)

शाळा-कॉलेजचा कट्टा ते SMS ग्रुप ते फेसबुक via ऑरकुट & whatsapp  असा प्रवास होऊन आमचा #KGMS हा  ग्रुप आता 2 वर्षांचा झाला आहे.. यात सगळे लोक किमान 15 आणि कमाल 21 वर्षापासून मित्र आहेत...
कोणाला कोणाची नाड़ी कुठे आहे हे नक्की माहित असल्याने एकमेकांच्या टोप्या उड़वणे हा एकमेव कार्यक्रम इकडे दिवासरात्र चालु असतो...
अर्थात या टोपी उडवण्याला आम्ही दुसरा  शब्द वापरतो तो भाग वेगळा..हा हा हा

या ग्रुपचे नामकरण करण्यापासून ते त्याला ऍक्टिव ठेवण्यापर्यन्त सर्व क्रेडिट जाते ते फाउंडर मेम्बर श्री.अभिषेक उर्फ़ कॅमल भाले यांना..राजकीय पक्षाला जसे धोरण आवश्यक असते तसे "KGMS हॉल ऑफ़ फेम" सारखे उपक्रम राबवून त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला आहे..

बरेचदा या ग्रुपवर अवघड प्रसंग आले.. पण हा ग्रुप त्यातून सहिसलामत बाहेर आला...एके काळी एकाच मुलीबद्दल सीरियस असणारे दोघेजण जसे इकडे आहेत तसेच एखादी संधी हुकलेले आणि तिचे सोने करणारे सुद्धा आहेत...
कोणी पैशाने जास्त स्टेबल आहे तर कोणी फॅमिली फ्रंटवर..कोणाची स्वप्ने पूर्ण होताना दिसत आहेत तर कोणाची धूसर होतायत..

पण या भौतिक गोष्टी इकडे कधीच त्रासदायक ठरत नाहीत..एकेकाळी  "आईबापावर जायचे नाही / तूच असशील" असे म्हणणारे गुणी बाळ आता आमच्या दिलु जोशींच्या कृपेने एकमेकांना पाच-सहा अक्षरी भाषेत बोलतात...
यात कुठेच श्लील-अश्लील, पाप-पूण्य हा हिशोब नाही...

मुळात कामानिमित्त मुखवटयांच्या जगात जाणे अपरिहार्य असल्याने इकडे जो मोकळा श्वास घेता येतो तो बहुमोल आहे... आणि त्याचे मोल सर्वांनाच जाणवले आहे...

आमचे या वर्षी औरंगाबादला गेट टुगेदर फूलटॉस या धाब्यावर अति-उत्साहात साजरे झाले हा तेव्हाचा फ़ोटो... काही लोक मिसिंग आहेत...

पण that doesn't matter.............. :)

Movie Review : Talvar

सिनेमा रिलीज व्हायच्या 1 दिवस आधी गुरुवारी संध्याकाळी पेड़ प्रीव्यू होतात ते बघण्याची इच्छा काल अनेक वर्षांनी पूर्ण झाली... इरफ़ान खानचा #तलवार सिनेमा पाहिला आणि एक मागे पडलेले स्वप्न वेगळ्या स्वरुपात समोर आले...

ते स्वप्न होते IPS ऑफिसर होण्याचे... मुजोर माणसाच्या डोळ्यात मरणाचे भय आपण बघावे अशी त्यामागे प्रेरणा होती...  असे वाटणे बालिश (किंवा राक्षसी) होतेच पण प्रामाणिक होते.. लवकर पायावर उभे राहण्याच्या अपरिहार्यतेने ते स्वप्न नंतर मागे पडले ते कायमचे...

काल तलवार पाहिला आणि वाटले जे झाले ते योग्यच झाले का? CBI च्या असिस्टंट डायरेक्टरला एक खुनी जेव्हा म्हणतो की "माझ्या अंगाला हात लावलात तर माझे जातवाले तुम्हाला सोडणार नाहीत..." तेव्हा त्याला काय वाटले असेल...
आणि हाच नीच माणूस कायद्याच्या कचाट्यातुन धूमधड़ाक्यात बाहेर येतो तेव्हा हा पराभव फ़क्त त्या प्रामाणिक IPS ऑफिसरचा होता की संपूर्ण व्यवस्थेचा?? आणि समाजाचा??



इरफ़ान खानने साकारलेला CBI अधिकारी शेवटी थंडपणे झोपलेला आपण पाहतो तेव्हा एक वेदना आपले काळीज चिरत जाते......
अनेक प्रसंगात एकही डायलॉग नाही किंवा संभाषण अर्ध्यात तुटले आहे...आपण मात्र त्यात मुळापासून हादरुन जातो...

आपण सिस्टिमला दोषी धरावे की वैयक्तिक हितसंबंधांना... त्या प्रामाणिक ऑफिसर साठी रडावे की त्या निष्पाप आईबाबांसाठी... तिरस्कार कोणाचा जास्त करावा??? त्या निर्ढावलेल्या गुन्हेगाराचा की प्रमोशनसाठी कोम्प्रोमाईज़ करणाऱ्या अधिकाऱ्याचा??? की भिकार TV channels चा??
या आणि अशा अनेक प्रश्नांनी मन सुन्न झाले....

तलवार नक्की बघा... आणि तुम्हाला काय वाटले ते नक्कीच कळवा.... या सिनेमाचे शेकडो Interpretations होतील आणि त्यासाठी आम्ही ऑफिशियल प्रीव्यू येईपर्यंत वाट पाहतो आहोत...

#Talvar #Hindi #Movies #Bollywood

भोंदुगिरी..

लालबागच्या राजाचे कार्यकर्ते मागच्या वर्षी महिलांना मारहाण करून आमच्यासाठी आदरणीय झाले होते..या वर्षी त्यांनी आणि महिला पोलिसांनी एका मुलीला काल-परवा हाणले.. VIP दर्शनासाठी पैसे का घेतात...  असा तिला राग आला म्हणे.. सो #निष्पाप ऑफ हर...   तुम्हीच त्याला मोठे केले आणि आता म्हणता पैसे नाही देणार..  हा हा हा

ती पोरगी ५ वर्षांची असल्यापासून तिकडे जाते म्हणे..अहो मावशी... हि काय अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का? तुमच्या घरातला गणपती बाप्पा काय खालच्या स्तरावरचा आहे म्हणून इकडे जाऊन १४-१८ तास रांगेत उभे राहून काशी घालता? कि आयुष्यात काही म्हणजे अगदी काहीच काम नाही आणि भयंकर वेळ आहे म्हणून हे करताय???

त्या भिकार #VIP पास साठी पैसे ओतण्याऐवजी किंवा रांगेत वेळ वाया घालवण्याऐवजी आपल्या सोसायटीच्या watchmanला दिवाळी च्या ५ दिवस आधी शेव-चकली-चिवडा-लाडू द्या..जास्त आनंद मिळेल.. मागच्या वर्षी आम्ही स्वतः हे केले आहे म्हणून सांगतोय..
आणि मी उरलेल्या फराळाबद्दल नाही म्हणालो..जो घरी तुम्ही स्वतः खाताल तो त्यांना द्या..नाहीतर असे शिळे अन्न देऊन पुण्य कमावणारे पुण्यात्मे खूप आहेत...

देव माणसात पहावा आणि श्रद्धा मनात असावी हे तुम्हाला कोणी शिकवले की नाही?

टीप : त्या पोलिसांबद्दल सध्यातरी तक्रार नाही.. असलीच तर सहानुभूती आहे... कारणे अनेक आहेत पण सध्या नको.. :)

आणि कोणाच्या भावना दुखावल्या तर त्याच भावना / श्रद्धा माझ्या ह्याच्यावर... :/

पोस्ट का लिहिली असे विचार्ण्याआधी सांगतो.. आमचा विरोध आहे या भोंदुगिरीला...म्हणून...

#लालबागचा #राजा