Thursday, 24 September 2015

डॉक्टर.. शोषक की शोषित.. की दोन्ही??

डॉक्टर.. शोषक की शोषित.. की दोन्ही??

समाजात फ़क्त शोषक आणि शोषित असे दोनच प्रकार असावेत असे आजकाल वाटते आहे... शोषित समाजातल्याची प्रगती होणे म्हणजे त्याने शोषक (भक्षक) होणे हेच अभिप्रेत असावे... आणि ज्याला आपल्या वाट्याला आलेले शोषण सहन होते तो कोडगा समाज म्हणजे मध्यमवर्ग असावा.. कधी शोषकाच्या भूमिकेत तर कधी दुसऱ्या...

आपली रॅगिंग झाली म्हणुन जूनियरला छळणे, कॉर्पोरेट जगात बॉस झाल्यावर सबोर्डिनेट्सचे रक्त जाळून आपल्या बॉसचा वचपा (!) काढणे या आणि अशा गोष्टी जणू प्रत्येक क्षेत्रात नैसर्गिक प्रतिक्रिया झाल्या आहेत..
आपल्या वाट्याला आलेले भोग निदान दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नयेत हा विचार आता नामशेष होणार अशी या ‪#‎Baniyanization‬ झालेल्या समाजाची अवस्था आहे..


Capitalism / Socialism / Marxism कशाला म्हणतात ते आम्हाला माहीत नाही, पण स्पर्धेच्या नावाखाली पैसे फेकून आपण वाट्टेल ते करू शकतो या नीच व्रुत्तिला आम्ही बनियानायझेशन असे म्हणतो... (प्रेरणा McDonaldization)

डॉक्टरांचे सुद्धा शोषक आणि शोषित असे दोनच प्रकार दिसतात..पहिला प्रकार अर्थातच उजव्या बाजूला असलेले शोषक आणि दूसरे शोषित..
शोषकांचा राग नेहमी शोषितांवर निघतो तसे दुर्दैवाने हे रेसीडेंट डॉक्टर दिवसाला 18 तास सलग काम करूनही लोकांच्या शिव्या आणि मार खातात..
पण उच्चशिक्षित असल्याने यांचा आक्रोश कोणीच मनावर घेत नाही..

मुळात लाखो रुपये देऊन डिग्री किंवा पद घेतलेल्या व्यक्तिकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे हा मूर्खपणा आहे असे वाटते..
अशा भांडवलदारांचा राग मध्यम किंवा कनिष्ठ मध्यम वर्गातील लोकांवर काढण्याची नीच मनोव्रुत्ति पालिकेच्या किंवा सरकारी रुग्णालयातील रेसीडेंट डॉक्टरला मारहाण करण्यात दिसून येते..

त्यांची बौद्धिक क्षमता आणि त्या तुलनेत मिळणारा परतावा पाहिला तर भविष्यात कोणी मध्यमवर्गीय व्यक्ति त्या क्षेत्रात जायलासुद्धा धजावणार नाही..
पुण्यात KEM मधल्या तिशीतल्या रेसीडेंट डॉक्टरला सलग 72 तास काम आणि 24 तास ऑफ़ (नो संडे, नो हॉलिडे) केल्यावर 15 हजार रुपये महिन्याला मिळतात..
अहो याच्या दुप्पट पगार आमच्यासोबत कॉलेज कट्यावर बसणारे MR लोक कमवतात..तेहि कमी वयात...आणि वर्क लाइफ बैलेंस मेंटेन करून..अशी अनेक उदाहरणे देता येतील...

 "आपण एकदा समाजसेवेचे व्रत घेतले ना.. मग तक्रार करू नका" असे पाचकळ युक्तिवाद जे करतात त्यांना पोकळ बांबूने पार्श्वभागावर हाणावे वाटते... तुमचे पोट आरामात भरले (भलेही शिक्के मारून का असेना) की तत्वज्ञान शिकवणार तुम्ही लोकांना?
उच्च शिक्षण घेऊन, भयंकर मेहनत करूनही पैसे नसतील तर कसा श्वास अड़कतो याची कल्पना आहे का तुम्हाला? आपल्याला जे मिळते ते मिळवण्याची आपली योग्यता (लायकी) आहे का? असा प्रश्न बापजन्मात विचारलात का स्वतःला....

काल मुंबईच्या KEM हॉस्पिटल मध्ये एका डॉक्टरच्या पाठीत सळई घातली आणि दुसर्याला डोक्यावर मारले असे आता वाचले आणि संताप अनावर झाला...
या हुशार ब्रेन्सच्या जागी डोनेशन सीट वाले मंद लोक वाट्याला येतील आणि त्यांचे बिलं भरायला घरदार विकावे लागेल ना.. तेव्हा अक्कल जागेवर येईल यांची..
---------------- एका मिडल क्लास डॉक्टरचा त्याहुन मिडल क्लास नवरा..

टिप : आपल्या घरात डॉक्टर असला की आपल्याला इतर डॉक्टर लूटत नाहीत असा समज आहे...पण तसे अजिबात काही नाही..
आमची सौ.MBBS, MD सोबत असूनही आम्हाला स्किन आणि ऑर्थो वाल्याने चांगलेच खड्ड्यात टाकले आहे..
हे मुद्दाम सांगितले नाहीतर लोक म्हणायचे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे...घरात डॉक्टर आहे..

मुकुल मंदिर... :)

मुकुल मंदिर... संस्कार.. विरोधाभास... आठवणी.... स्वैर विचार...

काही माणसे काळाच्या पुढे असल्याने सांप्रत काळात लोक त्यांना समजून घेऊ शकत नाहीत आणि त्यांची टर उडवली जाते... पुढे जाऊन त्यांची खरी ओळख पटल्यावर मात्र ही माणसे समाजासाठी आदरणीय ठरतात...

२१ तारखेला आमच्या औरंगाबादच्या मुकुल मंदिर शाळेत गेल्यावर हे प्रकर्षाने जाणवले.. निर्मल दादा बाहेर गावी गेले असल्याने त्यांची भेट झाली नाही..पण त्यांच्या अनेक आठवणींनी मनात गर्दी केली..

मुलांना होमवर्क देऊन आम्ही त्यांचे बालपण दडपणार नाही असे ते पालकांना नेहमी सांगत असत.. जंक फ़ूड त्या काळात नव्हतेच पण मुलांच्या डब्यात फ़क्त भाजीपोळी असावी (चिवड़ा नको) असा त्यांनी नियमच केला होता..
जेवतांना सर्व मुले एकत्र बसुन "वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे" ने सुरवात करत असत..

मुलांना शालेय अभ्यासाव्यतिरिक्त निसर्ग आणि मैदानी खेळांची गोडी लागावी म्हणून शनिवार हा आमचा निसर्ग दिन असायचा..आम्हाला प्रत्येकी एक एक झाड़ दिलेले होते..आम्ही त्याची जातीने काळजी घेणे अपेक्षित असे. जमिनीची धुप, पक्षीनिरिक्षण यासारख्या अनेक विषयांवर त्या दिवशी ते आम्हाला काही नवीन माहिती देत असत..

आमची शाळा 'लो इनकम आणि लो प्रोफाइल' असल्याने वर्गात संमिश्र वातावरणामधुन आलेली मुले होती.. आमच्या वर्गातला डॉक्टरचा मुलगा आणि केळीवाल्याचा मुलगा असे दोघेही सोबत जेवत असत.. आमच्यात जात वगैरे अगदी नावाला अस्तित्वात होती..

अभ्यासाव्यतिरिक्त शाळेत हस्तकला, ओरिगामी यांचे वर्गही होत असत..
थोडक्यात, आज व्यक्तिमत्व विकासाच्या नावाखाली मुलांना जे ५-६ किलोचे दप्तर (स्कुल बॅग) दिले जाते आणि त्यांना विविध हॉबी क्लासला जुंपले जाते त्याची गरज त्यांना २५ वर्षे आधीच जाणवली होती..
म्हणूनच ते सर्व मुलांना कर्नल मोडक यांच्या संस्कार वर्गात आणि वेगवेगळ्या शिबिरात जाण्याचा आग्रह करत असत..

पण विरोधाभास असा की त्या शाळेत असेपर्यंत आम्हाला कधीच तिचे महत्व पटले नाही ना आमच्या आसपासच्या लोकांना..तत्ववादी निर्मल दादांना 'हाफ चड्डीवाला म्हातारा' असे संबोधले गेले आणि आम्हाला त्याचे वैषम्य वाटले नाही..
त्यांनी होमवर्क द्यावा किंवा डब्यात अरबट-चरबट आणु द्यावे म्हणून पालक त्यांच्याशी भांडत असत..शनिवारचा अभ्यासमुक्त निसर्ग दिन त्यांना मूर्खपणा वाटे..

मराठी मीडियम सोबतच आपली शाळा किती गावठी आणि जगाच्या मागे आहे अशा गंडातुन आमच्यासारख्या बऱ्याच मुलांनी ५वी पासून SB (सरस्वती भुवन) किंवा इतर मोठ्या शाळेत प्रवेश घेतला...

नंतर आम्हीच काही काळ त्या शाळेकडे आणि मराठी माध्यमाकडे हेटाळणीच्या किंवा कमीपणाच्या दृष्टिकोनातून पाहिले..आज हे सगळे आठवले तरी मनातून दुःख होते..
माणसांचे ही असेच होत असावे..ती सोबत असतांना त्यांचे महत्व जाणवत नाही आणि गेल्यावर त्यांच्यासाठी आपण झुरत राहतो...

आणखी एक वैयक्तिक विरोधाभास जाणवला तो म्हणजे या गोड शाळेत आमच्यात प्रॉमिनंट असलेला राक्षस पुढे मोठ्या शाळेतल्या मुक्त वातावरणात दबला तो कायमचा..

सी-सॉ वरुन पडलो म्हणून हसणाऱ्या वर्गातल्या मुलीला इलेक्ट्रिक वायर ने उघड्या पायावर मारणारा, चिंचोके चोरले म्हणून मित्राच्या पोटात आणि गुडघ्यावर लाथा घालणारा, धक्का दिला / चिमटे काढले म्हणून मित्राला भिंतीवर डोके आपटून मारणारा निष्ठुर आणि रागीट मुलगा पुढे मोठ्या शाळेत गेल्यावर हुशार आणि गुणी मुलगा झाला..
आपला हात किंवा लाथ लागल्यावर समोरच्याला वेदना होते हे समजल्यामुळे कदाचित त्याचे हात उगारणे सुद्धा आपोआप थांबले..

एका वर्गात 80 मुले असणाऱ्या या नवीन शाळेत तो पर्सनल टच आणि ते संस्कार कुठेच नव्हते पण तरी तिचा मान मोठा होता..
प्रत्यक्ष आयुष्यातही अनेक चांगली माणसे अशी मागे असलेली पाहुन मनातून दुःख होते..

इंग्रजी मीडियमचा हव्यास / उदोउदो चालु झाला तो बहुधा आमच्याच पीढ़ीपासून.. ज्याचे दृश्य परिणाम आता अर्धवट पालकांच्या रुपात दिसू लागले आहेत..अर्थात तो मोठा आणि स्वतंत्र विषय होईल..

आमच्या औरंगाबादच्या शाळेला किंवा इन जनरल मराठवाडी लोकांना आमचा मुंबईत इंटरनॅशनल स्कुल मध्ये शिकणारा पुतण्या हसला की आम्ही त्याला रागवायचो..


पण मुकुल मंदिर मध्ये 21 वर्षांनी गेल्यावर आता आमच्या आवाजातली धार कमी झाली आहे... कायमची... :(

Thursday, 3 September 2015

Adieu FB :)

फेसबुकवर स्वतःला व्यक्त करता करता माणूस आपल्या विचारांसहित एकूणच सगळ्या गोष्टींबाबत लोकांकडून रेकग्निशनची अपेक्षा ठेवतो..ते लाईक्स आणि कमेंट्स च्या रुपात मिळाले कि त्याचा इगो सुखावतो. हे सगळे व्हर्चुअल आहे याची जाणीव असली तरी हा आभास इतका सुखद आहे कि आपण त्यात हरवून जातो..

आमचा मेसेज बॉक्स कोणी पाहिल्यास त्याला हा कोणी महान लेखक आहे असे वाटेल..आणि ही अस्मादिकांना सुखावणारी भावना असली तरी याने पोट भरत नाही हि जाणीव मागच्या आठवड्यात झाली आणि १ आठवडा कोणाला न सांगता फेसबुक बंद केले..

त्या एक आठवड्यात आनंदने दिलेले पिंगळावेळ (GA कुलकर्णी वाचले)..आयुष्यात पहिल्यांदा GA वाचले असल्याने त्या गोष्टींनी झपाटून टाकले..खुंटलेला संवाद चालू झाला..अर्थातच स्वतःशी... न्यूजपेपर पूर्ण वाचले.. श्री ठाणेदार वाचले.. काही bare acts वाचल्या, बायकोशी आणि जुन्या मित्रांशी मोकळ्या आणि चावट गप्पा मारल्या..आयुष्य खूप सुखात गेले आणि २८ तारखेला इकडे परत आलो..असे वाटले कि आपला या व्यसनावर आता कंट्रोल आहे..

पण परत २९ ला लिहिलेल्या तिन्ही पोस्ट १५० लाईक घेऊन गेल्या आजची १००, पर्वाची आरक्षण वाली १००...हे सगळे यश नाही पण भासते मात्र तसेच.... या लाईक च्या गणितात आयुष्याचे गणित पुन्हा हुकायची भीती वाटली...
 
MBA नंतर पहिली ४ वर्षे जे जॉब मध्ये डेडीकेशन होते ते आता नवीन करिअर मध्ये कुठेच दिसले नाही.. उलट दिसला स्वतःबद्दल वृथा (!) अभिमान...गौरवशाली इतिहास...

ज्याचा इतिहास वर्तमानापेक्षा उज्ज्वल असेल त्याचे भविष्य नेहमीच काळवंडलेले असते असे म्हणतात.. आणि आपल्याला "झूठ बर्दाश्त नाही है" (वनराज चा डायलॉग HDDCS) मग ते यश असले तरी..... आणि आपले असले तरी...

सो...या वेळेस निरोप घेऊन जातोय.. कोणाला आठवण आल्यास आमची सौभाग्यवती इकडे आहे मेसेज टाकू शकता..

जायचे तर जाय ना चुपचाप..डांगोरा कशाला पिटला?? असे ज्यांना वाटेल ते सगळे "मेरे इसपे" हा हा हा..

सुयश पटवर्धन आज परत सोनाराची भूमिका बजावल्याबद्दल आभार... भेटू पवईला किंवा फोर्ट मध्ये..:) 

Anand More तुला पण टाईट Hug..सहज :) 

Wednesday, 2 September 2015

एक निर्धार....

वयाच्या पन्नाशीकडून साठी कड़े झुकणाऱ्या स्त्रियांबद्दल एका गोष्टीचं आम्हाला नेहमी वाइट वाटत..त्या हाउस वाइफ असतील तर अजुन जास्त...
यांनी उमेदीच्या काळात त्यांच्या सासु सासऱ्यांची सेवा केलेली असते आणि मुलाबाळांचं, नवरोबाचं सगळं पाहिलेलं असतं.. यातून थोडं बाहेर येऊन मोकळा श्वास घ्यावा म्हटले किंवा स्वतःसाठी वेळ द्यावा असे वाटले की आमच्या करिअर ओरिएंटेड नवीन पीढ़ीच्या कृपेने त्यांना परत घरातच स्वतःला जुंपुन घ्यावे लागते..
नातवांना दिवसभर सांभाळ, नाठाळ पोराला आवडीची भाजी करून दे (कारण बायकोला येत नाही..समानता you see..) पोरीचा नवरा करत नसेल तर तिचे लाड कर..

 शिवाय नवरा रिटायर झाल्यावर वेळ जात नाही म्हणून तुम्हालाच हाणणार... आपलं माणूस आहे ना... काय बोलावे.. हा हा :( 
यावर माझ्यापुरते मी एक ठरवले आहे... निदान इथून पुढे आपल्या आईबापाला घाण्याला जुंपणार नाही.. काही कमी पडले तरी चालेल... त्याशिवाय भागवेन पण that can never be an option...

टिप : ते प्रेमाने करतात, आपल्या माणसासाठी कितीही केले तरी त्याचे श्रम वाटत नाहीत... असली सांस्कृतिक कारणे देऊन मला दगड ठरवू नका..

सत्य कड़वट असले तरी मान्य केले पाहिजे..आईबाप असले तरी माणूस आहेत ते ..देव नाहीत...

माझ्या आईबाबांना या ओझ्यापासून आज मी मुक्त करतो आहे...

आणि हो ज्यांचे असे नसेल (चांगले / वाइट) त्यांनी आपली लाल करू नका.. Be happy.. smile emoticon
 
feeling determined.