Sunday, 8 November 2015

प्राधान्यक्रम..

आटपाट नगर होते.. सर्व दिशेने लोक तिकडे शिक्षणासाठी आणि व्यापारासाठी त्या शहरात जात असत..या शहरात कोणीच उपाशी मरत नाही आणि जो मेहनत करतो त्याला हे शहर भरभरून देते असा त्याचा नावलौकिक होता..

अशा या शहरात १७५ वर्षे जुने नामांकित विद्यापीठ होते जिकडे ४ मुले एका प्रोफेशनल कोर्स च्या निमित्ताने एकत्र आली ही त्यांची गोष्ट..

या ४ मधील २ मुले so called उच्च जातीतली होती आणि २ मुले मागास होती... यात एक छोट्या गावाहून आलेला उच्च जातीतला पण गरीब मुलगा होता.. स्वजातीतले लोक त्याला कमी समजत असत आणि इतर जातीय लोकांसाठी तो soft target होता.

एकदा काय झाले, त्या चौघांमधल दुसरा उच्च जातीय मुलगा तिसर्या मुलाला त्याच्या जातीवरून आणि स्कॉलरशिप वरून काही बोलला. मग त्याला चौथा मुलगा आणि त्याचे विद्यार्थी संघटनेमधील काही मित्र..असे सगळे भेटले आणि त्या उच्च जातीय मुलाला कसा धडा शिकवावा हे त्यांनी ठरवले.

राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेल्या त्या टोळक्याने आपण कसे कमजोर आहोत म्हणून आपल्यावर हा अन्याय होतोय अशी सगळीकडे हवा केली आणि चुकून काही बोलून गेलेल्या त्या मुलाला एकटे पाडले... आणि atrocity खाली कारवाई करू अशी धमकी दिली..
हे ऐकून घाबरलेल्या त्या मुलाने बिनशर्त माफी मागितली आणि या समुहाचा विजय झाला... उच्चवर्गीय (?) असेच घाबरट असतात आणि आपण काय भारी धडा शिकवला असे त्यांच्यात बोलणे झाले आणि त्यांनी ते सेलिब्रेट सुद्धा केले..

लहान गावाहून आलेला पहिला मुलगा हे सर्व पहात होता..त्याच्यासाठी बाळासाहेब आणि बाबासाहेब हे दोनच देव असल्याने त्याला कोणतीही बाजू घेता आली नाही..

आज या गोष्टीला १० वर्षे झाली आहेत... त्यांनी घाबरट ठरवलेला मुलगा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सुस्थितीत आहे. ज्या लोकांनी समूह बनवला ते सरकारी नोकरी आणि राजकीय करिअर (!) उपभोगत आहेत.
आणि ज्यावर अन्याय (!) झाला म्हणून हे सगळे एकत्र झाले तो मुलगा एका KPO मध्ये नोकरी करून नोकरी आणि Matrimony च्या Websites धुंडाळत आहे...अजूनही अस्वस्थ आहे..
कदाचित हा सुद्धा त्याच्यावर अन्याय आहे असे त्याला वाटत असावे...

हे सर्व लांबून पाहणारा तो छोट्या गावातला मुलगा आजही त्याच शहरात आहे.. लोकांचे निरीक्षण करण्याचे त्याचे आवडते काम अजूनही तसेच चालू आहे...

टीप : कोणालाही कोणत्याही बाबीवरून कमी लेखणे हा हेतू नाही. काय धरावे आणि काय सोडावे हे ज्याचे त्याने ठरवावे..

आणि ही सत्यघटना असल्याने योगायोग अजिबात नाहीत..  ;)

Sunday, 18 October 2015

Movie Review : राजवाडे & सन्स

प्रत्येकाला आपले स्वतंत्र आयुष्य जगायचा अधिकार असतो..आपले निर्णय स्वतः घेणे सोपे असले तरी त्यांची संपूर्ण जबाबदारी घेण्याची प्रव्रुत्ति मात्र दिसत नाही आणि या जबाबदारी झटकण्यातुन नाती कोमेजतात..

राजवाडे & सन्स ही अशाच एका जॉइंट फॅमिली ची गोष्ट आहे.. मराठी सिनेमातले घर शक्यतो मधमवर्गीय असते आणि व्हिलन महालात असतो.. पण हे राजवाड़े शब्दशः महालात राहणारे कुटुंब आहे जिकडे सर्व भौतिक सूखे पायाशी लोळण घेतात पण प्रत्येकाच्या मनात काही न काही निसटल्याची भावना आहे...

आजोबांची घराला घट्ट बांधून ठेवायची तळमळ असली तरी तिसऱ्या पिढीचा श्वास त्यात गुदमरतो आहे.. मधली पीढ़ी आता आपल्याला काहीच बदल करणे शक्य नाही या वैफल्यात कुठेतरी गोंधळलेली आहे...

अशा या घरात एक माणूस येतो..त्यांच्यातलाच..पण फार पूर्वी घर सोडून पळालेला आणि आता जग पाहुन परत आलेला..त्याच्या येण्याने घरात  सांस्कृतिक उलथापालथ होते आणि कोंडलेले श्वास आणि मने मोकळी होतात.. आपल्याच माणसांची नव्याने ओळख होऊन घराची घडी बसत असतांनाच हा नवीन माणूस परत निघुन जातो..तो परत कधीच न येण्यासाठी...

फार पूर्वी अशोक सराफ यांचा खिचड़ी नावाचा मराठी सिनेमा होता..त्याची आपल्याला आठवण आली तरी हा सिनेमा कोणत्याही फॉरमैट मध्ये बसत नाही इतका हा प्रचंड वेगळा आणि सुंदर आहे..

यातले बोल्ड सीन आपल्याला अश्लील वाटत नाहीत, यातली स्वतंत्र व्यक्तिमत्वे आपल्याला स्वैराचारी वाटत नाहीत, यातला सामान्य माणूस आपल्याला बोरिंग वाटत नाही, यातले कड़क आजोबा आपल्याला खाष्ट वाटत नाहीत.. विशेष म्हणजे यातले डबल स्टैंडर्ड्स ने वागणारे लोक सुद्धा आपल्याला प्रामाणिक वाटतात..

आयुष्यात साध्या साध्या गोष्टी राहून जातात आणि प्रत्येक वेळी आर्थिक परिस्थिती हेच कारण नसते हे या सिनेमाने दाखवून दिले...

डोंबिवली फ़ास्ट मधल्या माधव आपटेला आयुष्यभर लोकल ट्रेन मध्ये विंडो सीट मिळाले नाही म्हणून तो शेवटच्या प्रसंगात गोळी लागल्यावर विंडो सिट वर बसून प्राण सोडतो आणि आपण आवंढा गिळत थेटर सोडतो...

गरीबी दाखवून प्रेक्षकांना रडवणे सोपे आहे असे गृहीत धरल्यास राजवाड़े घरातल्या लोकांबद्दल सुद्धा असेच दाटुन येणे हे या सिनेमाचे यश आहे... बाकी कलकारांबद्दल जितके बोलावे तितके कमी आहे... प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या भूमिकेचे सोने झाले आहे... त्यासाठी दिग्दर्शकाला कड़क सलाम...

हा सिनेमा नक्की थेटर मध्ये पहा... आणि मला सांगा काय वाटले... तुम्हाला आपली माणसे यात नक्की दिसतील...

#राजवाड़े #मराठी #सिनेमा #Rajwade

Thursday, 8 October 2015

#KGMS

आमच्या बाळाचा दुसरा वाढदिवस... :)

शाळा-कॉलेजचा कट्टा ते SMS ग्रुप ते फेसबुक via ऑरकुट & whatsapp  असा प्रवास होऊन आमचा #KGMS हा  ग्रुप आता 2 वर्षांचा झाला आहे.. यात सगळे लोक किमान 15 आणि कमाल 21 वर्षापासून मित्र आहेत...
कोणाला कोणाची नाड़ी कुठे आहे हे नक्की माहित असल्याने एकमेकांच्या टोप्या उड़वणे हा एकमेव कार्यक्रम इकडे दिवासरात्र चालु असतो...
अर्थात या टोपी उडवण्याला आम्ही दुसरा  शब्द वापरतो तो भाग वेगळा..हा हा हा

या ग्रुपचे नामकरण करण्यापासून ते त्याला ऍक्टिव ठेवण्यापर्यन्त सर्व क्रेडिट जाते ते फाउंडर मेम्बर श्री.अभिषेक उर्फ़ कॅमल भाले यांना..राजकीय पक्षाला जसे धोरण आवश्यक असते तसे "KGMS हॉल ऑफ़ फेम" सारखे उपक्रम राबवून त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला आहे..

बरेचदा या ग्रुपवर अवघड प्रसंग आले.. पण हा ग्रुप त्यातून सहिसलामत बाहेर आला...एके काळी एकाच मुलीबद्दल सीरियस असणारे दोघेजण जसे इकडे आहेत तसेच एखादी संधी हुकलेले आणि तिचे सोने करणारे सुद्धा आहेत...
कोणी पैशाने जास्त स्टेबल आहे तर कोणी फॅमिली फ्रंटवर..कोणाची स्वप्ने पूर्ण होताना दिसत आहेत तर कोणाची धूसर होतायत..

पण या भौतिक गोष्टी इकडे कधीच त्रासदायक ठरत नाहीत..एकेकाळी  "आईबापावर जायचे नाही / तूच असशील" असे म्हणणारे गुणी बाळ आता आमच्या दिलु जोशींच्या कृपेने एकमेकांना पाच-सहा अक्षरी भाषेत बोलतात...
यात कुठेच श्लील-अश्लील, पाप-पूण्य हा हिशोब नाही...

मुळात कामानिमित्त मुखवटयांच्या जगात जाणे अपरिहार्य असल्याने इकडे जो मोकळा श्वास घेता येतो तो बहुमोल आहे... आणि त्याचे मोल सर्वांनाच जाणवले आहे...

आमचे या वर्षी औरंगाबादला गेट टुगेदर फूलटॉस या धाब्यावर अति-उत्साहात साजरे झाले हा तेव्हाचा फ़ोटो... काही लोक मिसिंग आहेत...

पण that doesn't matter.............. :)

Movie Review : Talvar

सिनेमा रिलीज व्हायच्या 1 दिवस आधी गुरुवारी संध्याकाळी पेड़ प्रीव्यू होतात ते बघण्याची इच्छा काल अनेक वर्षांनी पूर्ण झाली... इरफ़ान खानचा #तलवार सिनेमा पाहिला आणि एक मागे पडलेले स्वप्न वेगळ्या स्वरुपात समोर आले...

ते स्वप्न होते IPS ऑफिसर होण्याचे... मुजोर माणसाच्या डोळ्यात मरणाचे भय आपण बघावे अशी त्यामागे प्रेरणा होती...  असे वाटणे बालिश (किंवा राक्षसी) होतेच पण प्रामाणिक होते.. लवकर पायावर उभे राहण्याच्या अपरिहार्यतेने ते स्वप्न नंतर मागे पडले ते कायमचे...

काल तलवार पाहिला आणि वाटले जे झाले ते योग्यच झाले का? CBI च्या असिस्टंट डायरेक्टरला एक खुनी जेव्हा म्हणतो की "माझ्या अंगाला हात लावलात तर माझे जातवाले तुम्हाला सोडणार नाहीत..." तेव्हा त्याला काय वाटले असेल...
आणि हाच नीच माणूस कायद्याच्या कचाट्यातुन धूमधड़ाक्यात बाहेर येतो तेव्हा हा पराभव फ़क्त त्या प्रामाणिक IPS ऑफिसरचा होता की संपूर्ण व्यवस्थेचा?? आणि समाजाचा??



इरफ़ान खानने साकारलेला CBI अधिकारी शेवटी थंडपणे झोपलेला आपण पाहतो तेव्हा एक वेदना आपले काळीज चिरत जाते......
अनेक प्रसंगात एकही डायलॉग नाही किंवा संभाषण अर्ध्यात तुटले आहे...आपण मात्र त्यात मुळापासून हादरुन जातो...

आपण सिस्टिमला दोषी धरावे की वैयक्तिक हितसंबंधांना... त्या प्रामाणिक ऑफिसर साठी रडावे की त्या निष्पाप आईबाबांसाठी... तिरस्कार कोणाचा जास्त करावा??? त्या निर्ढावलेल्या गुन्हेगाराचा की प्रमोशनसाठी कोम्प्रोमाईज़ करणाऱ्या अधिकाऱ्याचा??? की भिकार TV channels चा??
या आणि अशा अनेक प्रश्नांनी मन सुन्न झाले....

तलवार नक्की बघा... आणि तुम्हाला काय वाटले ते नक्कीच कळवा.... या सिनेमाचे शेकडो Interpretations होतील आणि त्यासाठी आम्ही ऑफिशियल प्रीव्यू येईपर्यंत वाट पाहतो आहोत...

#Talvar #Hindi #Movies #Bollywood

भोंदुगिरी..

लालबागच्या राजाचे कार्यकर्ते मागच्या वर्षी महिलांना मारहाण करून आमच्यासाठी आदरणीय झाले होते..या वर्षी त्यांनी आणि महिला पोलिसांनी एका मुलीला काल-परवा हाणले.. VIP दर्शनासाठी पैसे का घेतात...  असा तिला राग आला म्हणे.. सो #निष्पाप ऑफ हर...   तुम्हीच त्याला मोठे केले आणि आता म्हणता पैसे नाही देणार..  हा हा हा

ती पोरगी ५ वर्षांची असल्यापासून तिकडे जाते म्हणे..अहो मावशी... हि काय अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का? तुमच्या घरातला गणपती बाप्पा काय खालच्या स्तरावरचा आहे म्हणून इकडे जाऊन १४-१८ तास रांगेत उभे राहून काशी घालता? कि आयुष्यात काही म्हणजे अगदी काहीच काम नाही आणि भयंकर वेळ आहे म्हणून हे करताय???

त्या भिकार #VIP पास साठी पैसे ओतण्याऐवजी किंवा रांगेत वेळ वाया घालवण्याऐवजी आपल्या सोसायटीच्या watchmanला दिवाळी च्या ५ दिवस आधी शेव-चकली-चिवडा-लाडू द्या..जास्त आनंद मिळेल.. मागच्या वर्षी आम्ही स्वतः हे केले आहे म्हणून सांगतोय..
आणि मी उरलेल्या फराळाबद्दल नाही म्हणालो..जो घरी तुम्ही स्वतः खाताल तो त्यांना द्या..नाहीतर असे शिळे अन्न देऊन पुण्य कमावणारे पुण्यात्मे खूप आहेत...

देव माणसात पहावा आणि श्रद्धा मनात असावी हे तुम्हाला कोणी शिकवले की नाही?

टीप : त्या पोलिसांबद्दल सध्यातरी तक्रार नाही.. असलीच तर सहानुभूती आहे... कारणे अनेक आहेत पण सध्या नको.. :)

आणि कोणाच्या भावना दुखावल्या तर त्याच भावना / श्रद्धा माझ्या ह्याच्यावर... :/

पोस्ट का लिहिली असे विचार्ण्याआधी सांगतो.. आमचा विरोध आहे या भोंदुगिरीला...म्हणून...

#लालबागचा #राजा

Thursday, 24 September 2015

डॉक्टर.. शोषक की शोषित.. की दोन्ही??

डॉक्टर.. शोषक की शोषित.. की दोन्ही??

समाजात फ़क्त शोषक आणि शोषित असे दोनच प्रकार असावेत असे आजकाल वाटते आहे... शोषित समाजातल्याची प्रगती होणे म्हणजे त्याने शोषक (भक्षक) होणे हेच अभिप्रेत असावे... आणि ज्याला आपल्या वाट्याला आलेले शोषण सहन होते तो कोडगा समाज म्हणजे मध्यमवर्ग असावा.. कधी शोषकाच्या भूमिकेत तर कधी दुसऱ्या...

आपली रॅगिंग झाली म्हणुन जूनियरला छळणे, कॉर्पोरेट जगात बॉस झाल्यावर सबोर्डिनेट्सचे रक्त जाळून आपल्या बॉसचा वचपा (!) काढणे या आणि अशा गोष्टी जणू प्रत्येक क्षेत्रात नैसर्गिक प्रतिक्रिया झाल्या आहेत..
आपल्या वाट्याला आलेले भोग निदान दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नयेत हा विचार आता नामशेष होणार अशी या ‪#‎Baniyanization‬ झालेल्या समाजाची अवस्था आहे..


Capitalism / Socialism / Marxism कशाला म्हणतात ते आम्हाला माहीत नाही, पण स्पर्धेच्या नावाखाली पैसे फेकून आपण वाट्टेल ते करू शकतो या नीच व्रुत्तिला आम्ही बनियानायझेशन असे म्हणतो... (प्रेरणा McDonaldization)

डॉक्टरांचे सुद्धा शोषक आणि शोषित असे दोनच प्रकार दिसतात..पहिला प्रकार अर्थातच उजव्या बाजूला असलेले शोषक आणि दूसरे शोषित..
शोषकांचा राग नेहमी शोषितांवर निघतो तसे दुर्दैवाने हे रेसीडेंट डॉक्टर दिवसाला 18 तास सलग काम करूनही लोकांच्या शिव्या आणि मार खातात..
पण उच्चशिक्षित असल्याने यांचा आक्रोश कोणीच मनावर घेत नाही..

मुळात लाखो रुपये देऊन डिग्री किंवा पद घेतलेल्या व्यक्तिकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे हा मूर्खपणा आहे असे वाटते..
अशा भांडवलदारांचा राग मध्यम किंवा कनिष्ठ मध्यम वर्गातील लोकांवर काढण्याची नीच मनोव्रुत्ति पालिकेच्या किंवा सरकारी रुग्णालयातील रेसीडेंट डॉक्टरला मारहाण करण्यात दिसून येते..

त्यांची बौद्धिक क्षमता आणि त्या तुलनेत मिळणारा परतावा पाहिला तर भविष्यात कोणी मध्यमवर्गीय व्यक्ति त्या क्षेत्रात जायलासुद्धा धजावणार नाही..
पुण्यात KEM मधल्या तिशीतल्या रेसीडेंट डॉक्टरला सलग 72 तास काम आणि 24 तास ऑफ़ (नो संडे, नो हॉलिडे) केल्यावर 15 हजार रुपये महिन्याला मिळतात..
अहो याच्या दुप्पट पगार आमच्यासोबत कॉलेज कट्यावर बसणारे MR लोक कमवतात..तेहि कमी वयात...आणि वर्क लाइफ बैलेंस मेंटेन करून..अशी अनेक उदाहरणे देता येतील...

 "आपण एकदा समाजसेवेचे व्रत घेतले ना.. मग तक्रार करू नका" असे पाचकळ युक्तिवाद जे करतात त्यांना पोकळ बांबूने पार्श्वभागावर हाणावे वाटते... तुमचे पोट आरामात भरले (भलेही शिक्के मारून का असेना) की तत्वज्ञान शिकवणार तुम्ही लोकांना?
उच्च शिक्षण घेऊन, भयंकर मेहनत करूनही पैसे नसतील तर कसा श्वास अड़कतो याची कल्पना आहे का तुम्हाला? आपल्याला जे मिळते ते मिळवण्याची आपली योग्यता (लायकी) आहे का? असा प्रश्न बापजन्मात विचारलात का स्वतःला....

काल मुंबईच्या KEM हॉस्पिटल मध्ये एका डॉक्टरच्या पाठीत सळई घातली आणि दुसर्याला डोक्यावर मारले असे आता वाचले आणि संताप अनावर झाला...
या हुशार ब्रेन्सच्या जागी डोनेशन सीट वाले मंद लोक वाट्याला येतील आणि त्यांचे बिलं भरायला घरदार विकावे लागेल ना.. तेव्हा अक्कल जागेवर येईल यांची..
---------------- एका मिडल क्लास डॉक्टरचा त्याहुन मिडल क्लास नवरा..

टिप : आपल्या घरात डॉक्टर असला की आपल्याला इतर डॉक्टर लूटत नाहीत असा समज आहे...पण तसे अजिबात काही नाही..
आमची सौ.MBBS, MD सोबत असूनही आम्हाला स्किन आणि ऑर्थो वाल्याने चांगलेच खड्ड्यात टाकले आहे..
हे मुद्दाम सांगितले नाहीतर लोक म्हणायचे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे...घरात डॉक्टर आहे..

मुकुल मंदिर... :)

मुकुल मंदिर... संस्कार.. विरोधाभास... आठवणी.... स्वैर विचार...

काही माणसे काळाच्या पुढे असल्याने सांप्रत काळात लोक त्यांना समजून घेऊ शकत नाहीत आणि त्यांची टर उडवली जाते... पुढे जाऊन त्यांची खरी ओळख पटल्यावर मात्र ही माणसे समाजासाठी आदरणीय ठरतात...

२१ तारखेला आमच्या औरंगाबादच्या मुकुल मंदिर शाळेत गेल्यावर हे प्रकर्षाने जाणवले.. निर्मल दादा बाहेर गावी गेले असल्याने त्यांची भेट झाली नाही..पण त्यांच्या अनेक आठवणींनी मनात गर्दी केली..

मुलांना होमवर्क देऊन आम्ही त्यांचे बालपण दडपणार नाही असे ते पालकांना नेहमी सांगत असत.. जंक फ़ूड त्या काळात नव्हतेच पण मुलांच्या डब्यात फ़क्त भाजीपोळी असावी (चिवड़ा नको) असा त्यांनी नियमच केला होता..
जेवतांना सर्व मुले एकत्र बसुन "वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे" ने सुरवात करत असत..

मुलांना शालेय अभ्यासाव्यतिरिक्त निसर्ग आणि मैदानी खेळांची गोडी लागावी म्हणून शनिवार हा आमचा निसर्ग दिन असायचा..आम्हाला प्रत्येकी एक एक झाड़ दिलेले होते..आम्ही त्याची जातीने काळजी घेणे अपेक्षित असे. जमिनीची धुप, पक्षीनिरिक्षण यासारख्या अनेक विषयांवर त्या दिवशी ते आम्हाला काही नवीन माहिती देत असत..

आमची शाळा 'लो इनकम आणि लो प्रोफाइल' असल्याने वर्गात संमिश्र वातावरणामधुन आलेली मुले होती.. आमच्या वर्गातला डॉक्टरचा मुलगा आणि केळीवाल्याचा मुलगा असे दोघेही सोबत जेवत असत.. आमच्यात जात वगैरे अगदी नावाला अस्तित्वात होती..

अभ्यासाव्यतिरिक्त शाळेत हस्तकला, ओरिगामी यांचे वर्गही होत असत..
थोडक्यात, आज व्यक्तिमत्व विकासाच्या नावाखाली मुलांना जे ५-६ किलोचे दप्तर (स्कुल बॅग) दिले जाते आणि त्यांना विविध हॉबी क्लासला जुंपले जाते त्याची गरज त्यांना २५ वर्षे आधीच जाणवली होती..
म्हणूनच ते सर्व मुलांना कर्नल मोडक यांच्या संस्कार वर्गात आणि वेगवेगळ्या शिबिरात जाण्याचा आग्रह करत असत..

पण विरोधाभास असा की त्या शाळेत असेपर्यंत आम्हाला कधीच तिचे महत्व पटले नाही ना आमच्या आसपासच्या लोकांना..तत्ववादी निर्मल दादांना 'हाफ चड्डीवाला म्हातारा' असे संबोधले गेले आणि आम्हाला त्याचे वैषम्य वाटले नाही..
त्यांनी होमवर्क द्यावा किंवा डब्यात अरबट-चरबट आणु द्यावे म्हणून पालक त्यांच्याशी भांडत असत..शनिवारचा अभ्यासमुक्त निसर्ग दिन त्यांना मूर्खपणा वाटे..

मराठी मीडियम सोबतच आपली शाळा किती गावठी आणि जगाच्या मागे आहे अशा गंडातुन आमच्यासारख्या बऱ्याच मुलांनी ५वी पासून SB (सरस्वती भुवन) किंवा इतर मोठ्या शाळेत प्रवेश घेतला...

नंतर आम्हीच काही काळ त्या शाळेकडे आणि मराठी माध्यमाकडे हेटाळणीच्या किंवा कमीपणाच्या दृष्टिकोनातून पाहिले..आज हे सगळे आठवले तरी मनातून दुःख होते..
माणसांचे ही असेच होत असावे..ती सोबत असतांना त्यांचे महत्व जाणवत नाही आणि गेल्यावर त्यांच्यासाठी आपण झुरत राहतो...

आणखी एक वैयक्तिक विरोधाभास जाणवला तो म्हणजे या गोड शाळेत आमच्यात प्रॉमिनंट असलेला राक्षस पुढे मोठ्या शाळेतल्या मुक्त वातावरणात दबला तो कायमचा..

सी-सॉ वरुन पडलो म्हणून हसणाऱ्या वर्गातल्या मुलीला इलेक्ट्रिक वायर ने उघड्या पायावर मारणारा, चिंचोके चोरले म्हणून मित्राच्या पोटात आणि गुडघ्यावर लाथा घालणारा, धक्का दिला / चिमटे काढले म्हणून मित्राला भिंतीवर डोके आपटून मारणारा निष्ठुर आणि रागीट मुलगा पुढे मोठ्या शाळेत गेल्यावर हुशार आणि गुणी मुलगा झाला..
आपला हात किंवा लाथ लागल्यावर समोरच्याला वेदना होते हे समजल्यामुळे कदाचित त्याचे हात उगारणे सुद्धा आपोआप थांबले..

एका वर्गात 80 मुले असणाऱ्या या नवीन शाळेत तो पर्सनल टच आणि ते संस्कार कुठेच नव्हते पण तरी तिचा मान मोठा होता..
प्रत्यक्ष आयुष्यातही अनेक चांगली माणसे अशी मागे असलेली पाहुन मनातून दुःख होते..

इंग्रजी मीडियमचा हव्यास / उदोउदो चालु झाला तो बहुधा आमच्याच पीढ़ीपासून.. ज्याचे दृश्य परिणाम आता अर्धवट पालकांच्या रुपात दिसू लागले आहेत..अर्थात तो मोठा आणि स्वतंत्र विषय होईल..

आमच्या औरंगाबादच्या शाळेला किंवा इन जनरल मराठवाडी लोकांना आमचा मुंबईत इंटरनॅशनल स्कुल मध्ये शिकणारा पुतण्या हसला की आम्ही त्याला रागवायचो..


पण मुकुल मंदिर मध्ये 21 वर्षांनी गेल्यावर आता आमच्या आवाजातली धार कमी झाली आहे... कायमची... :(

Thursday, 3 September 2015

Adieu FB :)

फेसबुकवर स्वतःला व्यक्त करता करता माणूस आपल्या विचारांसहित एकूणच सगळ्या गोष्टींबाबत लोकांकडून रेकग्निशनची अपेक्षा ठेवतो..ते लाईक्स आणि कमेंट्स च्या रुपात मिळाले कि त्याचा इगो सुखावतो. हे सगळे व्हर्चुअल आहे याची जाणीव असली तरी हा आभास इतका सुखद आहे कि आपण त्यात हरवून जातो..

आमचा मेसेज बॉक्स कोणी पाहिल्यास त्याला हा कोणी महान लेखक आहे असे वाटेल..आणि ही अस्मादिकांना सुखावणारी भावना असली तरी याने पोट भरत नाही हि जाणीव मागच्या आठवड्यात झाली आणि १ आठवडा कोणाला न सांगता फेसबुक बंद केले..

त्या एक आठवड्यात आनंदने दिलेले पिंगळावेळ (GA कुलकर्णी वाचले)..आयुष्यात पहिल्यांदा GA वाचले असल्याने त्या गोष्टींनी झपाटून टाकले..खुंटलेला संवाद चालू झाला..अर्थातच स्वतःशी... न्यूजपेपर पूर्ण वाचले.. श्री ठाणेदार वाचले.. काही bare acts वाचल्या, बायकोशी आणि जुन्या मित्रांशी मोकळ्या आणि चावट गप्पा मारल्या..आयुष्य खूप सुखात गेले आणि २८ तारखेला इकडे परत आलो..असे वाटले कि आपला या व्यसनावर आता कंट्रोल आहे..

पण परत २९ ला लिहिलेल्या तिन्ही पोस्ट १५० लाईक घेऊन गेल्या आजची १००, पर्वाची आरक्षण वाली १००...हे सगळे यश नाही पण भासते मात्र तसेच.... या लाईक च्या गणितात आयुष्याचे गणित पुन्हा हुकायची भीती वाटली...
 
MBA नंतर पहिली ४ वर्षे जे जॉब मध्ये डेडीकेशन होते ते आता नवीन करिअर मध्ये कुठेच दिसले नाही.. उलट दिसला स्वतःबद्दल वृथा (!) अभिमान...गौरवशाली इतिहास...

ज्याचा इतिहास वर्तमानापेक्षा उज्ज्वल असेल त्याचे भविष्य नेहमीच काळवंडलेले असते असे म्हणतात.. आणि आपल्याला "झूठ बर्दाश्त नाही है" (वनराज चा डायलॉग HDDCS) मग ते यश असले तरी..... आणि आपले असले तरी...

सो...या वेळेस निरोप घेऊन जातोय.. कोणाला आठवण आल्यास आमची सौभाग्यवती इकडे आहे मेसेज टाकू शकता..

जायचे तर जाय ना चुपचाप..डांगोरा कशाला पिटला?? असे ज्यांना वाटेल ते सगळे "मेरे इसपे" हा हा हा..

सुयश पटवर्धन आज परत सोनाराची भूमिका बजावल्याबद्दल आभार... भेटू पवईला किंवा फोर्ट मध्ये..:) 

Anand More तुला पण टाईट Hug..सहज :) 

Wednesday, 2 September 2015

एक निर्धार....

वयाच्या पन्नाशीकडून साठी कड़े झुकणाऱ्या स्त्रियांबद्दल एका गोष्टीचं आम्हाला नेहमी वाइट वाटत..त्या हाउस वाइफ असतील तर अजुन जास्त...
यांनी उमेदीच्या काळात त्यांच्या सासु सासऱ्यांची सेवा केलेली असते आणि मुलाबाळांचं, नवरोबाचं सगळं पाहिलेलं असतं.. यातून थोडं बाहेर येऊन मोकळा श्वास घ्यावा म्हटले किंवा स्वतःसाठी वेळ द्यावा असे वाटले की आमच्या करिअर ओरिएंटेड नवीन पीढ़ीच्या कृपेने त्यांना परत घरातच स्वतःला जुंपुन घ्यावे लागते..
नातवांना दिवसभर सांभाळ, नाठाळ पोराला आवडीची भाजी करून दे (कारण बायकोला येत नाही..समानता you see..) पोरीचा नवरा करत नसेल तर तिचे लाड कर..

 शिवाय नवरा रिटायर झाल्यावर वेळ जात नाही म्हणून तुम्हालाच हाणणार... आपलं माणूस आहे ना... काय बोलावे.. हा हा :( 
यावर माझ्यापुरते मी एक ठरवले आहे... निदान इथून पुढे आपल्या आईबापाला घाण्याला जुंपणार नाही.. काही कमी पडले तरी चालेल... त्याशिवाय भागवेन पण that can never be an option...

टिप : ते प्रेमाने करतात, आपल्या माणसासाठी कितीही केले तरी त्याचे श्रम वाटत नाहीत... असली सांस्कृतिक कारणे देऊन मला दगड ठरवू नका..

सत्य कड़वट असले तरी मान्य केले पाहिजे..आईबाप असले तरी माणूस आहेत ते ..देव नाहीत...

माझ्या आईबाबांना या ओझ्यापासून आज मी मुक्त करतो आहे...

आणि हो ज्यांचे असे नसेल (चांगले / वाइट) त्यांनी आपली लाल करू नका.. Be happy.. smile emoticon
 
feeling determined.

Thursday, 20 August 2015

Linkedin

करिअर मध्ये स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येकाला Linkedin पाहिले की भयंकर फ्रस्ट्रेशन येत असावे... Everyone seems to be sorted with their life and at the end of the day you are still clueless...

लोक आपले सर्टिफिकेशन, कॉलेज बद्दल भरभरुन लिहितात.. फॉरेन क्लाइंट्सचे टेस्टीमोनियल...डिरेक्टर्स ओनली ग्रुप्स... आणि बरेच काय काय असते तिकडे... निदान मी तरी असे पाहुन शेकडो वेळेस डोके धरून बसलो आहे.... की... आपल्याकडे सगळे असून काहीच नाही असे का आहे....

तर.. सांगायचा मुद्दा हा.. काल आणि परवा 138 लोकांना फ्रेंडलिस्ट मधून हाकलुन दिले.. आणि बिग्रेडी लोकांच्या काही रिक्वेस्ट पण ब्लॉक केल्या..
यातून काय मिळालं? खुप समाधान... :)

12 वर्षे सतत लोकांचे रिजेक्शन घेणारा रॉकेटसिंग परवापासून स्वतःच "रिजेक्शन मोड़" वर आलाय... Feeling Happy.. :)

असे वाटण्यात विकृति असेलही.. पण आपल्याला आवडलं हे.. विषय संपला ;)

जब आप खुदसे प्यार करने लगते हो..तो जिंदगी नयी लगने लगती है... - श्रीदेवी (English Vinglish)

Note : I believe in deriving real pleasure (and people) from virtual world.. परत..इषय कट...... हा हा हा

#Rocketsingh

Thursday, 13 August 2015

आत्मचरित्र..

आत्मचरित्र..

प्रत्येकाने योग्य वेळ येताच आपले आत्मचरित्र लिहावे असे आम्हाला वाटते. आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातले Learnings हे लिखित स्वरुपात असल्यास त्याचे अनेक फायदे होऊ शकतात पण आत्मचरित्र फ़क्त यशस्वी व्यक्तीने लिहावे असा संकेत आहे आणि आपला सर्वांचा या बाबतीत इन जनरल भिडस्त स्वभाव असल्याने आपण ते टाळतो..

माझे आजेसासरे (स्व.सखारामपंत मुळे) यांनी आत्मचरित्र लिहिले होते आणि मला ते लग्नाआधीच वाचायला दिले होते..आधी ज़रा विचित्र वाटले की इतकं काय लगे आत्मचरित्र अन काय...त्यात आम्ही मुंबईला असल्याने त्यांच्यासोबत फारसा सहवास आला नाही आणि ते मागच्या वर्षी गेले..
पण या पुस्तकामुळे अजूनही त्यांची आठवण येते.. त्यांच्याबद्दल आत्मीयता आणि आदर वाटतो..त्यांनी हे पुस्तक लिहिले नसते तर त्यांच्याबद्दल कधीच काही फारसे कळले नसते.. कारण आठवणींमधला माणूस हा त्याच्या नातेवाइकांचे फ़क्त परसेप्शन असतो.. त्याच्या खऱ्या रूपाशी ओळख फ़क्त आत्मचरित्रानेच होऊ शकते...

माझ्या बाबांबद्दल या वर्षी 1 मार्चला पोस्ट लिहिली तेव्हा कितीतरी लोकांना त्यांचा प्रवास प्रेरणादायक वाटला..कोणाला ते Unsung hero वाटले..त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन उद्या आमचे किंवा अजुन कोणाचे भले झाले तर हा विजय कोणाचा असेल? अर्थातच त्या हातगाडीवाल्या मुलाचा आणि Bata शो रूम मधल्या सेल्समनचा...

वय वाढेल तसे माणूस विक्षिप्त होऊ लागतो (आम्ही आताच आहोत ते जाउद्या..हा हा हा) अशा वेळेस घरात येणाऱ्या नवीन सूना, जावई यांना हे पुस्तक वाचायला मिळाले तर त्यांना मनाने एकत्र यायला आणि एकमेकांना एक्सेप्ट करायला किती मदत होईल..

आपल्याला उद्ध्वस्त करणारे काही अनुभव जर कोणाला श्रीमंत करून जात असतील तर त्याहुन आनंदाची गोष्ट काय असू शकते?
सहसा आईबाबांशी सुसंवाद नसलेली मुले वाया (!) जातात असे निरिक्षण आहे..मुलांना आपले आईबाबा आजकाल कमी वाटयाला येतात..असे काही वाचून त्यांच्यातला संवाद वाढला तर त्याची किंमत पैशात मोजता येईल का? 6-8 महिन्यांच्या ओळखीवर आयुष्याची गाठ बांधणाऱ्या दोन व्यक्तींना या प्रकारच्या पुस्तकाचा किती फायदा होईल?? कदाचित पैशात न मोजता यावा इतका..

अर्थात यात खरे-खोटे आलेच..पटणे किंवा न पटणे सुद्धा आले..आणि आत्मचरित्र लिहिण्याची योग्य वेळ कोणती हा प्रश्न सुद्धा आला...
पण रिक्तपणाकड़े झुकणाऱ्या नात्यांना याने थोड़ा आधार मिळेल हे नक्की.. :)

Needless to say.. मी स्वतःबद्दल लिहिणार आहे.. पब्लिश होईल याची खात्री नाही.. पण लिहिणार..
निदान जवळच्या लोकांना कळले पायजेले.. पोरगा छपरी असला तरी अगदीच 'हा' नव्हता.. हा हा हा  ;)

Wednesday, 12 August 2015

Whatsapp is Great..;)

Whatsapp उघडले की गुदमरल्यासारखे होते अशी आमच्या महेंद्रभाउंची पोस्ट आता वाचली आणि तिकडे ‪#‎WhatsApp‬ वर भेटलेल्या व्यक्ति आणि वल्लींबद्दल बोलावे वाटले.. त्यांचे विशेष 'फीचर्स' नाव न घेता सांगतो आहे..तुम्ही ही असे मजेशीर लोक कळवा.. आवडती उदाहरणे पोस्ट मधे एडिट करून टाकतो :)

एक अब्राह्मण व्यक्ति स्वतःला "मी 21व्या शतकातील ब्राह्मण" असे संबोधित असे.. अतिशय मोठ्या आणि मलाईदार सरकारी पोस्ट वरुन रिटायर झालेले बाबा आणि ओवरऑल सुशिक्षित असल्याने स्ट्रगल आणि यांचा संबंध शून्य.. मग बळेच हे आपल्या स्ट्रगल आणि सत्शील असण्याच्या स्टोरी बनवून सांगणार..आणि तुम्ही जातीने ब्राह्मण असले तरी वागण्याबोलण्याने नीच आहात असे आम्हाला ऐकवणार..

एक व्यक्ति आपल्या ग्रुप मध्ये आपले वर्चस्व असावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार..त्यासाठी विविध मुखवटे घालणार..आम्ही वरचढ़ होऊ लागलो असे कळले की आमची प्रतिमा मलीन करणार..
काही व्यक्ती सतत आपल्यावर डुख धरून असणार.. कधी चिमटा घ्यायला मिळतोय याची वाट पाहणार.. शिवाय आग भडकली की I was joking...असे म्हणून स्माइली काढणार.. आणि छद्मिपणे दुसर्यांच्या भावना जळतात ते एंजॉय करणार..

काही आदरणीय आणि जवळच्या व्यक्ती अतिशय विकृत वीडियो, मेसेज, इमेजेस आपल्याला must watch म्हणुन देणार..आपण वैतागलो की त्यात आनंद घेणार..
आपल्या भोगाला आलेले निदान दुसर्याला देऊ नए हे यांच्या गावीही नसते..

काही व्यक्ति तुम्ही माझ्या मेसेजला वाचूनही का रिप्लाय देत नाही म्हणून भांडत बसणार..लास्ट सीन, निळे टिक्स हे त्यांच्या पथ्यावर पड़ते..

काही व्यक्ति I am always with you..count me in.. वगैरे सतत बोलणार.. आणि अगदी लहानशी मदत खरच मागितली की कामात बिझी होणार...किंवा त्यावर रिप्लाय न देता जोक पाठवणार..

एका 'आम्ही देशपांडे ' ग्रुप वरच्या पोराने तुमचा पगार काय असे विचारले.. म्हटलं कशाला.. (तेरी भेन से शादी करारा क्या???) असे वाक्य तोंडाशी आले पण गिळले..

काही लोक आलेले मेसेजेस फॉरवर्ड करून आपण तसेच संत आहोत हे लोकांना सांगणार.. त्यावर आमची बी लाल असे काही लोक अनुमोदन देणार..

काही लोक गुड़ मॉर्निंग--गुड़ आफ्टरनुन--शुभसंध्या--गुड़ नाइट--या जेवायला असे अतिशय भावपूर्ण मेसेज टाकायला फ़क्त अवतरणार..जोड़ीला रेडीमेड फ़ॉर्वर्डेड फ़ोटोज पण देणार...

काही ग्रुपचे सदस्य एकेमकांशी पर्सनल चाट करणार आणि ग्रुप मध्ये वेगळे आणि टारगेटेड बोलणार..

एका ब्राह्मण ग्रुप मधून आम्हाला हाकलले.. "मारझोड़ आणि शिव्या ह्या गोष्टी आपण करू नए.. आपल्याकडे विचारांची ताकद आहे.."
या महान सिद्धांताला आम्ही विरोध केला... हा हा हा

आमचे व्हाट्सअप प्रेम व्रुद्धिंगत होण्यात यांचा आणि आशा बऱ्याच लोकांचा हातभार आहे...

टिप : फेसबुक X व्हाट्सअप असा वाद घालायचा नाही.. सगळे वाइट आहेत असे म्हणत नाही..whatsapp चे फायदे आहेतच...पण त्यावर वेगळी पोस्ट बनेल..
आणि या महान व्यक्ती कोण हे विचारू नका..उत्तर इनबॉक्स मध्ये पण मिळणार नाही.. हा हा

'डॉक्टर्स डे'

मृणाल तुला 'डॉक्टर्स डे'च्या शुभेच्छा.. खरं तर हे डेझ वगैरे निमित्त आहे..आपण त्याला मानत नाही..पण तुझी वटसावित्रीची पोस्ट वाचल्यापासून हे लिहायचे ठरवले आहे..

त्या पोस्ट मध्ये आपल्या आईसारखी गृहकृत्यदक्ष बायको आजच्या जनरेशनला मिळणार नाही असे म्हणालीस ना तेव्हाच वाटलं की सावित्रीची व्याख्या बदलेल पण ती संकल्पना तशीच intact राहील..
"तू बिनधास्त जॉब सोड रे..पुढे 2,3 वर्ष घर मी सांभाळते..तुला आवडतय ते कर.." असं तू म्हणालीस त्याला या जून महिन्यात एक वर्ष झाले आहे...
 

माझ्या वाईट काळात तर तू माझ्या सोबत होतीसच पण स्वतःचे घर, 4 व्हीलर,chill वीकेंडस् वाले यशस्वी कॉर्पोरेट आयुष्य या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात येणार असे स्पष्ट दिसत असतांना तू मला हे स्वातंत्र्य दिलेस... सगळे मागे सोडून नव्याने संसार मांडण्याचे..

आपल्या सोबतच्या किती मूली हे करू शकतील? माझ्या जर्नालिझम कोर्सची मोठी फी तू भरलीस..फ़क्त माझी अपूर्ण इच्छा पूर्ण व्हावी म्हणून... आपण आपल्या नवर्याचे स्वप्नं पूर्ण करावे असे किती मुलींना वाटत असेल? त्याग जाउदे कोम्प्रोमाईज़ साठी किती मूली तयार असतील??

लग्नाच्या बाजारात जिकडे इस्टेट आणि डिग्र्यांची मौजदाद होते तिकडे तू माणसावर बेट लावलीस.. तुझा घोडा जिंकणार हे नक्की आहे पण तुझा मोठेपणा कोणी अमान्य करू शकेल का? सावित्री तर दंतकथा आहे.. आपण कोणीच पाहिली नाही.. आता तुझ्याकडे पाहुन मला त्या खोट्या (!) बेंचमार्कची तशीही गरज वाटत नाही..

गेल्या एक वर्षात जगलो ते fearless आणि स्वच्छंद आयुष्य मला दिलेस म्हणून आभार मानु की 100% विश्वास ठेवलास म्हणून....मला स्वतःच्या प्रेमात पाडलस म्हणून आभार मानु की माझ्या चक्रमपणाला सामावून घेतलस म्हणून....

पण नको.. आभार मानून त्या भावनांचा अपमान करत नाही.. आज काही नवीन सुरु होत आहे म्हणून तुझ्या वाढदिवसाची वाट न पाहता आजच पोस्ट टाकतों.. तसेही मला Mr.impatient हा किताब दिला आहेसच.. हा हा

दहावी, मार्च - २०००..

दहावी, मार्च - २००० च्या परीक्षेत सुनीता आघाड़े नावाची मुलगी गुणवत्ता यादीत आली होती..बजाज ऑटो मध्ये तिचे बाबा वर्कर होते आणि ते एक खोलीच्या घरात राहत असत.. माझे बाबा त्यावेळेस बजाज ऑटोच्या Spareparts Marketing विभागाचे क्र.२ इनचार्ज (मोठे अधिकारी) असल्याने नेहमी तिच्याबद्दल सांगत की बघ.. कशी परिस्थिति आहे आणि काय यश मिळाले.. (स्वगत - अन तू पहाय...)
दहावीत बरे मार्क्स होते म्हणून याचा जास्त त्रास झाला नाही..

११-१२वी मध्ये 'लाइफ एन्जॉय' करणे चालु असतांना मात्र त्या पोरीच्या कर्तुत्वाचा त्रास व्हायला लागला.. एक दिवस वैतागुन बाबांना म्हणालोच.. म्हटलं बाबा.. तिला दूसरे काही कामं आहेत का? नुसता अभ्यास तर करते सतत...

बाबा म्हणे होना..तुला किती महत्वाची कामं आहेत.. नवीन घेतलेली मित्राची पुस्तके दाखवून माझ्याकडून पैसे घेणे, गाडीची सतत फुल्ल असलेली टाकी रिकामी करण्यासाठी ट्यूशन आणि practicals बुडवून दौलताबाद-हनुमान टेकड़ीला जाणे, सिनेमे पाहणे, मुलींच्या मागे ट्रिपल सीट फिरणे, मुलींना blank call करणे, त्यांचे पत्ते शोधून काढणे, त्यांच्यावरुन भांडणे....
हे सगळे किती महत्वाचे आहे....बारावीचे काय... होत राहील.... हा हा हा.. बरोबर ना?

आम्ही चुपचाप आमची स्वतंत्र खोली गाठली.. आतून कड़ी लावून लाइफ एन्जॉय करणे चालु झाले..
Feeling : लैच छपरी.. ;)

Movie review : '''"नागरिक""

मराठी माणूस हा मोस्ट्ली बाळबोध असतो असे आमचे निरिक्षण आहे.. म्हणूनच जिथे जिथे स्पर्धा असेल तिथे तिथे तो प्रेम, नातेसंबंध, तत्व, फॅमिली वगैरे कारणे सांगून एकतर स्पर्धेपासून दूर पळतो नाहीतर कारकुनी पत्करतो.. स्पर्धाच नको...

श्रीमंती वाईट आणि गरीबी चांगली हे संस्कार घेऊन आलेल्या त्याला स्पर्धेपासून दूर जाण्याचे अनेक excuses मिळत राहतात.. सांस्कृतिक उत्कर्ष हे त्यापैकीच एक.. खिशात 10 रुपये नाहीत, माणसे सुद्धा फारशी जोडलेली नाहीत पण हा मनाने मात्र श्रीमंत (!) असतो.. कसे ते त्यालाच माहीत.. ;)

हे सर्व आठवण्याचे कारण की.... अशा आजारापेक्षा आजारी पडण्याच्या धसकयाने मरणाऱ्या माणसाला खुश करण्यासाठी..... एक सुप्परडुप्पर हीट मराठी सिनेमा आला आहे.. '''"नागरिक""..

ज्यात पन्नाशीतला बालीश पत्रकार, चाळीशीतला स्मार्ट politician, टिपिकल बिल्डर आणि नेते असा अतिशय जगावेगळा कलाकारांचा ताफा असून storyline तर अगदी नजर लागावी अशी आहे..सिनेमा संपला तरी आपल्याला काहीच कळत नाही हे या सिनेमाचे वैशिष्टय म्हणावे लागेल.. हा हा हा

टिप : मराठी माणूस लय भारी आहे...मराठी भाषा, संस्कृती महान आहे अशी कमेंट करण्याआधी मी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा भक्त आहे हे लक्षात घ्या.. :)
आणि माझ्या 600 रुपयांच्या नुकसानाबद्दल सहानुभूति अपेक्षित आहे..;)
 Feeling : रानगट & रासवट too....

Movie Review : किल्ला

एखादा सिनेमा भयंकर संथ असला की लोकांना विचार करायला वेळ मिळतो आणि there can be various interpretations...it becomes open ended movie...

असे कोणीही काहीही एक्सक्यूज़ दया... पण 'किल्ला' ने काल डोक्याची IB केली हे मात्र खरे...

सिनेमाचे Picturisation छान आहे, प्रत्येक फ्रेम मध्ये हे जाणवते, अजुन काय टेक्नीकल गोष्टी चांगल्या असतीलही.. पण या सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यावर.....
स्टोरी मनाला भिडली नाही......???
बस...खेल ख़तम..दूकान बंद... (सिल्वर मणी in सरकार)


बदलीच्या गावी ट्रांसफर झाल्यावर आई आणि मुलगा कसे एडजस्ट होतात आणि त्यांच्या रटाळ आयुष्यात टिपिकल लोक येतात आणि मग परत बदली होते असे अतिशय हृदयस्पर्शी कथानक आहे.. अमृता सुभाष अतिशय नाटकी आणि सतत रड़की वाटली..तिचा पोरगा तर भयंकर मंद वाटला.. त्याच्या स्लो एक्सप्रेशन साठी एक कानाखाली हाणावी वाटतेय अजूनही..

त्याला टिपिकल जीव लावणारे मित्र भेटतात म्हणे... Bloody hell... अशा पाणचट मुलांची एकच डेस्टिनी / स्टोरी आहे.. फर्स्ट बेंच--एकटेपणा--मेरिट लिस्ट--नोकरी--छोकरी--मुले--पेंशन.. thrill आणि यांचा संबंध फ़क्त सिनेमात येतो...

असले जानवे घालून टवाळया करणारे RANCHOs फ़क्त 3 इडियट्स सारख्या दलिन्दर सिनेमातच असतात...असो...

To the ‪#‎किल्ला‬ team : 300 रुपये परत दे भाड्या... आधीच तंगी चालुए त्यात काशी घातली... हा हा हा

फ्रीडम आणि स्पेस..

फ्रीडम आणि स्पेस..

आज सकाळी एका पोस्टवर या विषयावर चर्चा चालु होती.. नात्यात मोकळीक वगैरे ठीक आहे पण आमच्या मते फ्रीडम आणि स्पेसचा नेमका काय अर्थ घ्यावा हा चिंतनाचा (काळजीचा) विषय होऊ शकतो..

अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये लहान मुलांवर हात उगारायला बंदी आहे म्हणे.. फ्रीडम आणि स्पेस मुबलक असणाऱ्या देशांत मुलांना शिस्त कशी लावत असतील? की त्यांनी कसेही वागले तरी त्यांच्याच कलाने घेत असतील? की त्या विकसित देशातल्या लहान मुलांचा मेंदू सुद्धा जन्मतःच विकसित असेल?

आमच्या MBA च्या दिवसांत एक मुंबईकर मुलगी committed असूनही आम्हाला अप्रोच झाली.. याचे कारण आमचे कॉलेज आठवडयात 6 दिवस रोज 12 तास असायचे.. so she wanted someone to take care of her in college as well.. keeping options open you see..
तिच्या BF ने तिला पूर्ण विश्वास ठेऊन फ्रीडम दिली होती म्हणे.. आता या फ्रीडम आणि स्पेसला काय म्हणावे? मुर्खपणा?

कॉर्पोरेट जगात आमच्या लग्न झालेल्या फीमेल कलीग्स मेल कलीग्सला खेटायच्या..am drunk किंवा am so tensed अशी कारणे देऊन या चांडाळणी भट्टी गरम करणार आणि ऐन वेळेस I am married..you bastard..वगैरे बोलणार...
त्यांच्या नवर्याने पण त्यांना फ्रीडम आणि स्पेस दिलेली असते..ज्याची 3 पेगनंतर त्या आयमाय काढ़तात..

नवी मुंबई पोलिसांच्या रिपोर्ट नुसार MD या लेटेस्ट ड्रगची लागण मुलांना 5वी पासून होते..याचा सततचा वापर दीड वर्षात देवाघरी नेतो इतके हे ड्रग भयंकर आहे.. या वाहयात (!) मुलांना त्यांच्या आई बाबांनी फ्रीडम आणि स्पेस दिलेली असतेच की... ही मुले सुद्धा मिडल आणि लोअर मिडल क्लास मधली आहेत.. श्रीमंत नाही..

 ही सर्व उदाहरणे प्रातिनिधिक असली तरी exceptions नक्कीच नाहीत..डोळे उघडे ठेऊन समाजात वावरणाऱ्या कोणालाही हे दिसेल..स्वातंत्र्य आणि मोकळीक वाहयात व्यक्तीला देणे म्हणजे माकडाच्या हातात जळते लाकुड देण्यासारखे आहे असे आम्हाला वाटते..

छड़ीची भाषा is a must....

संदर्भ :
 MD - Methamphetamine also known as meow meow.. also used largely in BPOs parties

टिप : जे तसे नाहीत त्यांनी हे कृपया प्रूव करू नये..किंवा मला पेसिमिस्टिक म्हणू नये..
आणि मी सुद्धा हे चाळे केले असतील असा convenient विचार करू नये ही नम्र विनंती.. ;) 
वेगवेगळ्या लोकांचा अभ्यास करणे हा माझा छंद आहे.. this is FYI :)

सिगारेट.. :)

आज देवीदासरावांनी एकदम १४ वर्ष मागे नेले..आम्ही नुकतीच सिगारेट नावाची वस्तु अनुभवली होती..तेव्हा औरंगाबाद छोटे गाव होते..16 वर्षाच्या मुलाने स्मोक करणे म्हणजे ज़रा जास्तच होते..तेहि सगळे जग 12वी चे महत्वाचे वर्ष म्हणून अभ्यासात बुडलेले असतांना...

आम्ही बीबी का मकबरा जवळ एका आड़वळणाच्या टपरीवर घाबरत घाबरत 'गोल्ड फ्लॅक' मागितली..तेव्हा साडेतीन रूपयाला मिळायची...मग आम्ही 3 मित्र शहराबाहेर हनुमान टेकड़ीवर गेलो..एक मित्र थोड़ा अनुभवी असल्याने त्याने पेटवून कश घेतला आणि मला दिली.. excitement मध्ये तो कश घेतला आणि आता खोकला येईल असे वाटले पण आलाच नाही..म्हटलं वा आपण आता मोठे झालो.. हा हा..

 मित्रांना उगीच 2,4 शिव्या हासडल्या आणि त्या टेकड़ीच्या पायथ्याशी पळत सुटलो..कशाचा आनंद होता माहीत नाही.. शोएब अख्तर विकेट घेतल्यावर जसा राकट हसत हात पसरुन पळायचा तसा..अर्थात आमचे वजन 50 किलो असल्याने राकटपणा फ़क्त आत होता..

त्या 4,5 महिन्यात ज्या आठवणी आहेत त्याच आयुष्यभर पुरतील असे वाटते..नंतर थोड़े निर्ढावल्यावर घराजवळ कॅनॉट गार्डन ला एक सिगारेट 6 जणांमध्ये वाटून प्यायचो..करिअर, वर्गातल्या मूली, ‪#‎राड़ा‬ आणि ‪#‎भाई_लोक‬ हे आमचे आवडते विषय असायचे..

आता फेसबुकवर "नांदेडची राड़ा करणारी मुले" अशा नावाची प्रोफाइल दिसली की इतके भरून येते की त्या टीनेजर मुलाला एक घट्ट मीठी मारावी वाटते.. पण त्यांच्यासाठी मी आता टिपिकल अंकल झालो हे जाणवते...
नंतर 4,5 महिन्यात ही सवय सुटली आणि पुढे रिझल्ट + बीएसशी एडमिशन (!) असे झटके बसले...

त्यानंतर ना तो जोश अनुभवला ना ती Excitement.. आता एखाद्या वेळेस जुनी आठवण म्हणून दरवर्षी पावसाळयात परत एकटाच टपरीवर जातो.. कट्टयावर बसून 4,5 कश घेतो..आणि टाकून देतो..
उसने अवसान आणणे जमतही नाही आणि पटतही नाही...ओढ़ असते त्या निर्भेळ आनंदाची..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पहिल्यांदा खोकला न येण्याचे कारण नंतर कळले ते म्हणजे आम्ही तेव्हा inhale केलीच नव्हती..एका अनुभवी मित्राने ते 2 महिन्यांनी शिकवले.. हा हा

 खुप लोकांना कमेंट मध्ये मेंशन करावे वाटत आहे.. पण कोणाला अडचणीत टाकायची इच्छा नाही.. ते जे आहेत त्यांना हे वाचून कळेल की I am missing them.. :) नाहीतर फोन आहेच..

उदाहरणार्थ.....

उदाहरणार्थ.....मी पांडुरंग सांगवीकर वगैरे...

"ऐन विशित सगळीकडून फटके खाऊन हुळहुळा झालेला, स्वतःची काहीही कमाई दाखवता येत नाही असा हा निष्प्रभ नायक आपलं आयुष्य फारशी फेररचना न करता वाचकांना भड़ाभड़ा सांगत जातो..
निव्वळ आपल्या भाषेच्या जोरावर तो वाचकाकडून सिद्ध करून घेऊ पाहतो की यशस्वी होणं किती भंपक असतं? निदान इतरांसारखं परिक्षेला बसून पास होणं तरी त्याला जमण्यासारखं होतच..."

'कोसला'च्या प्रस्तावनेमधल्या या ओळी वाचल्या आणि म्हटलं हे आपलं पुस्तक आहे.. हॉस्टेल लाइफ बद्दल बोलतांना लोक हळवे होतात, भरभरुन बोलतात....आम्हाला मात्र मागे वळून पाहिल्यास असे काहीच सापडत नाही...ना हॉस्टेलची वास्तु ना तिथले मित्र..
कारण आमच्यासाठी हॉस्टेल लाइफ म्हणजे अपुरी झोप आणि प्रत्येक गोष्टीसाठी एकतर तोंड वेंगाडणे किंवा कोणाच्या अंगावर धावून जाणे हा एकच पर्याय असलेले दिवस...

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातुन पाहिजे तेव्हा न जाणे हा नरक आहे असे वपु म्हणतात..अशा कित्येक व्यक्ती या बान्द्रयाच्या हॉस्टेलला आम्हाला भेटल्या... हरयाणा, राजस्थान, दिल्ली, यूपी-बिहार आणि मध्य प्रदेश या 6 राज्यातल्या सुसंस्कृत लोकांचे ते निवासस्थान होते.. त्यांच्या उथळ, स्वार्थी, दिखावेबाज, भांडखोर, नीच स्वभावाला तोंड देता देता आपणच त्यांच्यासारखे होऊ ही भीति वाटायची..
सोबत कोकण, नागपुर, बुलडाणा, जळगावची बाळबोध आणि घरचा खाऊ चोरून खाणारी पण माझा खाऊ शेयर करणारी मंद मराठी मुले होतीच.. सगळे अपमान सहन करून त्यांच्यात मिसळणारी ती आणि एकाकी आणि मुर्ख आम्ही.. कन्फ्यूज्ड..वरीड...रिकाम्या खिशाचे...

यावर ताण म्हणजे मैनेजमेंटचे प्रोफेशनल शिक्षण देणारे आमचे सांताक्रूजचे फेमस सरकारी कॉलेज जिथे आडनाव पाहुन मित्र ठरवले जायचे.. आणि जगातल्या पाणचट विनोदावर हसणे हे एक कर्तव्य असायचे...

कोसला मधला पांडुरंग सांगवीकर कोणत्याच मित्राशी जास्त कनेक्ट झाला नाही तसेच आम्हाला तेव्हाच्या एखाद दुसरा अपवाद वगळल्यास कोणत्याच मित्राची आज आठवण येत नाही..

आम्हाला आठवते ते त्यांचे न्यूजपेपरचे 2 रुपये वाचवणे, त्यांचा मराठी/ब्राह्मण द्वेष, त्यांचे मठ्ठ आणि उथळ विचार, थंडीत आमचे पांघरूण ओढून घेणे, आमचे हैंगर तोड़णे, रात्री जागणे, सकाळी बाथरूमला नंबर लावण्यावरुन भांडण, चहाचे 2.5 रुपये वाचवणे ई.ई.

पांडुरंगासारखे आमचे घरचेही आम्हाला फार समजून घेत असत... ते आम्हाला म्हणत... तुझेच नखरे फार आहेत..तुला सगळे आपल्या मनासारखे पाहिजे...थोड़े एडजस्ट करायला शिकावे.. बायको म्हणायची सगळे वाईट लोक तुलाच बरे भेटतात??
औरंगाबादचे मित्र म्हणायचे असे काय प्रेशर आहे तुला? सतत का रडतो? आम्ही जसंकाही जॉब करतच नाही...
ऑफिस मध्ये बॉस म्हणायचा you should enjoy life..

अरे शाटा एन्जॉय करणार?? उदाहरणार्थ ज्याची रात्रीची झोप आणि सकाळची जाग दुसर्याच्या मुड़वर अवलंबून आहे आणि तुम्ही म्हणता enjoy..
रविवारी 20-25 कपडे धुण्याचि काळजी असतांना तुम्ही शनिवारी रात्री दीड वाजता Hard Rock Cafe ला नेऊन रॉक म्युझिक ऐक म्हणणांर..आणि फुकट दारु पाजतो म्हणून उपकारही दाखवणार....पार्टी नको पण उपदेश आवर ही वेळ... वर आम्हीच फ्रस्ट्रेशन की दूकान... हा हा

आपण वर्षभरात पुण्यात अभ्यासाव्यतिरिक्त काय शिकलो हे पांडुरंग सांगवीकरला आपल्या बापाला सांगणे जसे जड़ गेले असेल तसेच सेल्स जॉब 'By choice' करून गाठीशी आलेले असंख्य अनुभव आणि शहाणपण व्यवहारिक जगात काय उपयोगाचे हा प्रश्न बराच काळ आम्हाला सतावत होता.. कारण व्यवहारिक जगात तेच मठ्ठ लोक 'यशस्वी' हा किताब मिरवत असतात..

गेल्या वर्ष-दीड वर्षात फेसबुकवर राजेश मंडलिकांसारखी माणसे भेटली आणि एक लक्षात आले.. आपण विक्षिप्त असलो तरी वाया गेलेलो नाही.. मुख्य म्हणजे ज्यांच्याकडून काही शिकावे अशी माणसे आयुष्यात आली ती फ़क्त या फेसबुकामुळे..

आम्हाला पुस्तकांपेक्षा माणसे वाचण्याची आवड असल्याने यापुढे कितीही माणसे/पुस्तके वाचनात आली तरी हा मोठा भाऊ पांडुरंग सांगवीकर सदैव स्मरणात राहील...

आनंद मोरे - तुझे विशेष आभार... _/\_

चिऊताईचे घरटे.. :)

फायनली....आमच्या गॅलरी मधल्या चिऊताईच्या रेड़ीमेड घरटयात काल एक गोड कपल राहायला आले आहे.

आम्ही गेले 7-8 महीने ते रिकामे घरटे पाहुन आशा सोडली होती...पण काल एक रुबाबदार चिमणा खुप वेळ तिकडे घुटमळत होता..पक्षांमधली Feasibility / Market Study करत असावा...
आम्ही त्या लाकड़ी घरटयात आधीच धान्याचे दाणे टाकून ठेवले होते..तो बऱ्याच वेळेस आत जाऊन बाहेर आला..ते होल इतर कोणत्याही पक्षाला आत येऊ देणार नाही ही खात्री पटल्यावर मग आपल्या गोड बायकोला (चिऊताई) घेऊन आला.. आम्ही हे दार न उघड़ता पडद्याआड़ पाहत होतो..

आज सकाळी परत त्यांची चिवचिव ऐकू आली..
बायकोने गो अहेड दिला आणि बँकेकडून लोन सैंक्शन झाले की हा इकडे शिफ्ट होणार.. मग they will plan their family... हा हा

पण आमचा दूसरा बेबी (काऊ) मात्र यांच्या घरट्याजवळ गेला की मी त्याला हाकलुन दिले..अंडे पळवतो म्हणून... त्या कावळ्याने काल खुप अविश्वासाने माझ्याकडे पाहिले...
रोज आपले फ़क्त लाड करणारे आणि आपल्यासाठी त्या हलकट कबूतराला हाकलणारे बाबा आज मला का रागावले?? असे जणू त्याने रुसुन विचारले...

माझ्या जन्मानंतर असे माझ्या दादाला कितिदा वाटले असेल असा विचार डोक्यात आला..

रादर सगळ्याच मोठ्या दादा आणि ताईला लहान भाऊ/बहिण झाल्यावर असे नक्कीच वाटत असेल..
की आपले आईबाबा आता आपले लाड करत नाहीत... 

एक रिक्शावाला.. :)

काही लोक आपल्या कामावर प्रचंड प्रेम करतात आणि त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक क्षण यादगार करून जातात..

आज सकाळी मुसळधार पावसात भेटलेला रिक्शावाला असाच सुंदर माणूस होता.. त्याच्या रिक्षात उदबत्तीचा मंद सुवास होता..पावसापासून बचाव करणारे पडदे सुद्धा त्याने खुप विचारपूर्वक निवडले आहेत असे त्यांच्या डिझाइन वरुन कळत होते..मागे एक चांगल्या क्वालिटीचा डेक होता ज्यावर मंद आवाजात गाणी चालु होती..
गाण्यांच्या सिलेक्शनवरुन माणूस कसा आहे याचा अंदाज बांधता येतो..धांगड़धिंग्यावाले गाणे ज्यांना आवडतात ते लोक म्हणूनच आम्हाला आवडत नाहीत..

रिक्षात पहला नशा गाणे..बाहेर मुसळधार पाऊस..उदबत्तीचा सुवास..जोडीला बायको... हा 15 मिनिटाचा घरापासून स्टेशनपर्यंतचा प्रवास कसा संपला कळलेच नाही...

कालच्या पावसात भिजलेल्या रवीना टंडनच्या आठवणी जाग्या असतांना आजचाही दिवस असा सुरु व्हावा..गतजन्माची पुण्याई...बाकी काय..

आपल्यालाही पाऊस आवडू शकतो हे दीड वर्षाआधी कोणी म्हणाले असते तर खरे वाटले नसते...

जानव्याचा विद्रोह..

"आमटी, आंबट वरण आणि जानव्याचा विद्रोह.." स्वैर विचार....

आमटी आणि आंबट वरणाची सानेसरांची पोस्ट वाचली आणि विचार आला की सगळ्या जातीतले लोक आम्ही "हे असलो तरी अगदीच तसे (टिपिकल) नाही" असे इतरांना सांगत असतात..
आम्ही चित्पावन असलो तरी तितके कंजुष नाही..आम्ही मराठा असलो तरी ब्रिगेड़ी नाही..आम्ही रिझरवेशन वाले असलो तरी "ढ" नाही.. मारवाड़ी/जैन/बामन असलो तरी तितके हरामी नाही...अशी वाकये आतापर्यंत शेकडो वेळेस ऐकली आहेत...

लहानपणी आमच्या 'सवयींकडे आणि भाषेकडे' पाहुन आमचे जूनियर कॉलेज मधले ब्राह्मणेतर मित्र म्हणायचे की "****द तू बामन वाटत नाही रे मायला" तर आम्हाला तो एक सन्मान वाटायचा... हा हा हा
या सगळ्याच्या मुळाशी आपण वेगळे / बेटर आहोत किंवा आपण त्यातून पुढे आलो आहोत हे जगापुढे ठसवण्याचा प्रयत्न असतो असे दिसते..

पण असे असले तरी खासगीत बहुतांश लोक जातीयवादीच असतात हेही तितकेच खरे..मग शहर असो की छोटे गाव..तीव्रता कमी जास्त होईल पण जात राहतेच..
आदर्श घ्यावा असे शुर लोक 'आमच्यात' दिसत नाहीत त्यामुळे इकडे कव्हर फ़ोटो साठी थेट पुराण काळातुन परशुराम महाराज आणावे लागले.. हा आमच्यातला जातीयवाद..

विचाराने दलित आणि जातीने ब्राह्मण अशी देवाने आमची कुचंबणा केल्यामुळे आम्हाला डोंबिवली फ़ास्ट मधला माधव आपटे आणि कोसला मधला पांडुरंग सांगवीकर तितकेच आपले वाटतात...नगरच्या नितिन आगे किंवा फँड्री मधल्या जब्याची आठवण आली की संताप आणि अश्रु गर्दी करतात ते याचमुळे..

बाळासाहेब नावाचे वादळ येण्याआधी आम्ही हिन्दू आहोत हे सांगण्यात एक प्रकारची अपराधी भावना लोकांच्या मनात होती असे म्हणतात..
तशीच मी ब्राह्मण आहे हे सांगण्यात एक अपराधी भावना आमच्याही मनात होती..ती अशात पुसट होत आहे..
कशीही असली तरी आपली जात म्हणून तिचा आदर आम्ही हल्ली करू लागलो आहोत..

आणि आयुष्यात कधी आत्मचरित्र लिहिलेच तर त्याचे नावसुद्धा ठरवले आहे...

"जानव्याचा विद्रोह" !!

Confession..

काल TV सीरियल मधल्या कलाकारांनी दूसरे काही काम बघावे पण लोकांचे तळतळाट घेऊ नये अशा आशयाची पोस्ट टाकली आणि नंतर स्वतःचाच राग आल्यामुळे डिलीट केली..

आपले पोट आरामात भरले की लोकांना भरभरुन ज्ञान वाटणाऱ्या दांभिक व्हाइट कॉलर लोकांचा मी नेहमीच द्वेष केला आहे..काल आपणही त्याच वर्तुळात जातोय असे वाटून प्रचंड अपराधी वाटले आणि पोस्ट उडवली..
मुळात सीरियल्सशी संबंधित लोकांनासुद्धा याची कल्पना असेलच, की जे ते लिहितात किंवा बोलतात ते तितकेसे चांगले नाही..पण आपले घर चालवण्यासाठी आणि मिळालेले वलय मेंटेन करण्यासाठी त्यांना हे काम करावे लागत असेल.. त्यांनासुद्धा या दिखाव्याचा आणि खोटेपणाचा राग नक्की येत असेल.. खुप बेटर लिहिण्याची आपली कूवत असतांना हे रट्टाळ कार्यक्रम लिहून त्यांना काय समाधान (Work satisfaction) मिळत असेल??

मनाविरुद्ध काम करतांना माणूस रोज कणाकणाने जळतो..संतापाचा उद्रेक झाला तरी तो महिन्याकाठी येणाऱ्या पगारासाठी हे सहन करतो आणि वरवर हसत दिवस काढतो.. आपल्या लायकीचे काम करायला मिळावे म्हणून त्याची जी तड़फड होते ती बराच काळ अनुभवून सुद्धा काल जो शहाजोगपणा आमच्या हातून झाला तो नेहमी लक्षात राहिल...

बाकी सीरियल्स च्या दर्जाबद्दल.. तो काय आहे हे जगाला माहीत आहे.. त्याबद्दल काय करता येईल ते आम्हाला माहीत नाही.. पण TV चे रिमोट हातात असतांना त्यांना "दूसरे काम बघा" यासारखा नीच सल्ला मात्र आम्ही कधीच देणार नाही...

टिप : आमची चूक मान्य आहेच...पण काही मठ्ठ लोक "Yes you are a चुतिया" "I already told u..Use your remote" असे म्हणायला सज्ज व्हायच्या आधीच सांगतो... "शांत रहा...आणि जमिनीवर रहा..."
आम्ही चूक मान्य केली म्हणजे तुम्हाला चढ़ायचे लायसंस मिळाले नाही...
नाहीतर आमची AIB स्टाइल भाषा आहेच.. हा हा हा

छाबड़ा सर.. ___/\___

दुसरा पर्याय नाही म्हणून शिक्षक होणारे आसपास अनेक लोक दिसतात..पण आमचे जसमीतसिंग छाबड़ा सर JBIMS सारख्या मोठ्या कॉलेजमधल्या MBA नंतर वार्षिक 10 लाख पेक्षा जास्त पगार सोडून 2003 साली औरंगाबाद सारख्या छोट्या ठिकाणी IMS मध्ये शिकवायला आले..त्याकाळी CAT बद्दल आणि ओवरऑल मैनेजमेंट बद्दल लोकांमध्ये कमी अवेयरनेस होता..

माझा ख़ास मित्र पराग त्यांचा विद्यार्थी होता..त्याच्यामुळे सरांशी ओळख झाली..आणि मी त्यांचा विद्यार्थी नसुनही ह्या माणसाने खऱ्या अर्थाने Mentor म्हणून भक्कम आधार दिला..

MBA करायचे म्हणजे खर्चिक काम होते..मुळात परीक्षा आणि GDPIला जाणे हेसुद्धा मला अवघड होते.. वेलिंगकर्स, सिम्बायोसिसचे SIMC, दिल्लीचे आणि जोधपुरचे एक असे काही नामांकित कोलेजचे कॉल लेटर्स आले होते..पण जाण्यायेण्याचा खर्च अधिक GDPI साठी वेगळा DD हा खर्च असल्याने मी ते टाळत होतो..सरांना हे मित्राने सांगितले आणि त्यांनी मला तड़क बोलावून घेतले..

माझ्यासमोरच जयपुरच्या मित्राला मोबाइलवर फोन केला आणि माझी राहण्याची सोय केली..जाण्या-येण्याचे तिकीट मी काढतो आणि वरखर्च मी देतो पण तू ही संधी घालवू नको असे म्हणाले..

मी अर्थातच यातले काहीच केले नाही..पुढे महाराष्ट्र CET परिक्षेने ऐन वेळी घात करून गाडी उताराला लागली ती अगदी 2014 पर्यंत..

पण या माणसाने मागेपुढे न बघता जो आधार दिला त्यासाठी आजही भरून येते..फीस भरली की आपला संबंध संपला असे वागणारे **श तांबट सारखे बनिया कुठे आणि हे कुठे..

फ़क्त लढ म्हणा सर..बाकी काही नको... :=

फेसबुकवरची गुरुपौर्णिमा.. __/\__

आपले 'बाय डिफ़ॉल्ट' जे सर्कल असते त्यात आपण फारसा बदल करू शकत नाही..काळानुसार आणि कामानुसार होणारा अपरिहार्य बदल वेगळा पण Conscious effort घेऊन सर्कल बदलणे किंवा त्यात भर घालणे आपल्याला शक्य झाले ते फ़क्त फेसबुक मुळे..

वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसे इकडे सुखाने नांदतात..कोणाची लिहिण्याची पद्धत आपल्याला आवडते तर कोणाची फोटोग्राफी..कोणी जगभर भटकंती करून येणारे विविध अनुभव शब्दबद्ध करतात तर कोणी आपल्या छोट्याशा जगात खोल सुर मारून सूक्ष्म निरिक्षण नोंदवतात..

कोणी एखाद्या कवितेचा भावार्थ सांगते तर कोणी आपल्या सिंपल आयुष्याबद्दल सांगून काही मोठा मेसेज देऊन जाते.. काही लोक बेधड़कपणे व्यक्त होतात तर काही फ़क्त वाचकाच्या रोल मध्ये असतात..
काही लोकांच्या वैचारिक पोस्ट म्हणजे हजारो अनुभव आणि पुस्तके याचे सार असते जे आपल्याला विनामूल्य उपलब्ध असते..

कोणी काही म्हणा.. गुरुशिष्य परंपरा फारशी मानत नसलो तरी इकडे अनेक अनुकरणीय लोक भेटले आणि आमचे कट्टयावरचे आयुष्य अजुन सुंदर झाले असे आम्हाला वाटते..

त्यांचे हे कॉन्ट्रिब्यूशन मान्य करतांना कोणतीच अंधभक्ती नाही किंवा हे सगळे खरच असे असतील का? हा प्रश्न विचारायची इच्छा सुद्धा नाही...कोणाला टॅग करून या व्हर्चुअल जगात ‪#‎हंगामा‬ करायचा नाही..कारण ते जे आहेत त्यांना माहीत आहे की ही पोस्ट त्यांच्यासाठी आहे.. 

ते जसे इकडे समोर येतात तसेच प्रत्यक्ष आयुष्यातही आहेत असे गृहीत धरून त्यांना कालच्या गुरुपौर्णिमेनिमित्त सादर प्रणाम.. __/\__

Movie Review : Drishyam

University of Ajay Devgn.. New Chapter : Drishyam

अजय देवगण या माणसाकडून आपण काय-काय शिकु शकतो याची मोठ्ठी लिस्ट बनवता येईल...'भला माणूस नेहमीच कमजोर नसतो' हा धड़ा कालच्या दृश्यम सिनेमा मधुन आम्ही घेतला..
आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टींचे आणि माणसांचे सूक्ष्म निरिक्षण आणि योग्य तिथे Recall/Reproduce करण्याची क्षमता या जोरावर एक चौथी पास माणूस यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगतो. आलेल्या संकटाला तोे धैर्याने सामोरे जातो आणि आपल्या परिवाराला त्यातून कसे बाहेर काढतो हे पडद्यावर पाहणे अतिशय प्रेरणादायक आहे..

"तू सिनेमा फार सीरियसली पाहतो, आजुबाजूच्या लोकांवर फुकट विचार करतो, सगळे समजत असूनही कधीकधी अंधभक्तासारखे वागतो" या सबबींखाली आमची टिंगल करणार्यांना आमचे कड़क उत्तर म्हणजे हा सिनेमा आणि त्याचा नायक विजय साळगावकर... अर्थात अजय देवगण a.k.a. मालिक भाई... आमचे दैवत.. ____/\____

Logically विचार केल्यास कथानकामधले कच्चे धागे सहज नजरेस पडतात...पण एकदा आपलं माणूस म्हटलं की आपण जसे त्याच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तसेच त्या गोष्टी या सिनेमात क्षुल्लक ठरतात..
आपल्यावर दोन प्रकारचे संस्कार होत असावेत असे आम्हाला वाटते.. एक घरात होणारे आणि दूसरे समाजात होणारे..घरातले संस्कार विचारांचा पाया असले तरी त्यावर कळस मात्र सामाजिक संस्कारांमुळेच उभारता येतो..

प्रेम म्हणजे फ़क्त मिळवणे नव्हे हा संकार रुजवणारा वनराज, घारीसारखा शांत, फोकस्ड पण चित्त्याहून चपळ व्हिजनरी मालिक भाई, देशभक्त भगतसिंग, अपहरण मधला रास्ता चुकलेला तरुण, गंगाजल मधला जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी, राजनीति मधला मैत्रीला आणि खाल्लेल्या मिठाला जागणारा करण.. हे सर्व कैरक्टर्स आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत...रादर आमची प्रेरणा आहेत..

 या सगळ्यांसमोर मालिक भाईंना हजारो गोलमाल आणि हिंमतवाला माफ़ आहेत..ओम शांती ओम सारखे सिनेमे हिट असणाऱ्या या देशात असे कॉम्प्रमाइज प्रत्येकाला करावे लागतेच..

 मालिक भाई... तुम्हाला परत एकदा साष्टांग ____/\____ आणि लहानपणीची क्रश तब्बूला गोग्गोड पापा...

Tuesday, 11 August 2015

Lady Luck and Burner..

Lady Luck and Burner.. स्वैर विचार

आज एका पोस्ट वर कमेंट करतांना 'लेडी लक' या आवडत्या विषयाबद्दल बोलावे वाटले.. प्रत्येक माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायला याची गरज पड़तेच असे आमचे ठाम मत (श्रद्धा) आहे..
एखाद्या स्पर्धा परिक्षेसाठी लाखो लोक झगड़तात..त्यातले हौशेनवशे सोडल्यास 10% लोक पूर्ण झोकुन देऊन प्रयत्न करत असतात..बऱ्याचदा सगळ्यांचा IQ जवळपास सारखा असतो कारण ते स्क्रीनिंग मधून आलेले असतात..
 

अशा वेळेस EQ वगळता अशी काय गोष्ट असेल ज्याने ते एकतर जिंकतात किंवा हरतात..काही हरलेले परत लढायला तयार होतात आणि काही दुसरा मार्ग निवडतात..
आम्हाला वाटते त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या 'लेडी'वर हे ठरत असावे..त्या स्त्रीच्या अगदी हृदयाच्या आतून यांच्यासाठी प्रार्थना असेल तर ती देवही नाकारत नाही..
मैनेजमेंटच्या भाषेत attitude हा फरक सांगता येईल but attitude itself is one of the most misinterpreted word...

शिष्ट मूली दाखवतात तोही attitude असतो आणि हर्षा भोगले सारख्यांचा साधेपणा सुद्धा attitude असतो..
आतापर्यंत भेटलेल्या लोकांकडे पाहुन एक निष्कर्ष आम्ही काढला आहे..ज्यांचा स्ट्रगल आतून असतो (पाण्याविना फड़फडणाऱ्या माशासारखा) आणि ज्यांना अशा समर्पित स्त्रीची साथ असते त्यांना यश मिळायला फारसा उशीर होत नाही..

या रूल नुसार आपल्याकडे काय कमी आहे हे लगेच लक्षात येऊ शकते आणि जे नाही ते मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतो..
अर्थात अशी समर्पित स्त्री आजच्या 'सेल्फ़ी ऍडिक्ट' जमान्यात मिळणे हे कापसाच्या ढिगार्यात सुई शोधण्यासारखे अवघड आहे..
मला मिळाली आहे.. तुम्हाला शुभेच्छा 

 टिप : पाण्यावाचून तड़फड याला मैनेजमेंट मध्ये Burner under your ass असेही म्हणतात.. जनरली ते फ़क्त सेल्सवाल्या लोकांच्या 'खाली' असते.. हा हा हा

Saturday, 23 May 2015

वकील आणि सेल्समन..

आर्ट ऑफ़ लिविंगच्या सेल्समन(!)ला गेले २ दिवस पीड़तो आहे.. शेवटी वैतागुन त्याने काल सीनियरला नंबर दिला..सीनियर आम्हाला शब्दात पकडायला गेला आणि प्राथमिक फेरितच बाद झाला..डिपॉझिट जप्त झालेल्या निवडणुकीतल्या उमेदवारासारखा.. आता फ़क्त आमची मर्जी चालेल..मी ठरवेन तेव्हा भेटणार, कॉल घेणार.. शिबिर मी करणारच, पैसेपण पूर्ण भरणार..पण माझ्या मनाने..त्याच्या नाही..

हे वाचून this is so insensitive असे वाटेल..हा हा.. तसे आहेच म्हणा या केस मध्ये.. एरव्हि आमच्या घरात आलेला सेल्समन थंड पाणी आणि दोन प्रेमळ शब्द ऐकल्याशिवाय जात नाही..अर्थात त्याची इच्छा असल्यास... परवा घरी आलेल्या Blue Dart च्या डिलिवरी बॉयला २००४ साली कसा मी त्याच कंपनीमध्ये त्याच जॉब साठी इंटरव्यू दिला आणि मला त्यांनी घेतले नाही हे सांगितले..भाऊ खुष झाला..म्हणे सर मलापण वेळ लागला हा जॉब मिळायला..तो स्वतःच्या कामावर खुष होऊन गेला.. मला जे हवे ते मिळाले..
पण हे ग्रेट "अगरवाल" साहेब आम्हाला 'तुच्या' समजले..आणि स्वतःसाठी मनस्ताप ओढवून घेतला..

पहिल्यांदा भेटला तर हा भाऊ IT कंपनी मध्ये स्वतःची पोस्ट असिस्टंट मेनेजर सांगत होता..इंग्लिश बिलो एवरेज..नंतर म्हणे where do u work? म्हटलं am a lawyer..
झालं...संभाषण थांबेपर्यंत भाऊचा कॉन्फिडेंस सातवे आसमाँपर.. बॉडी लैंग्वेज मधला आणि भाषेतला चेंज आमच्यातल्या रॉकेटसिंगला बरोबर कळला..

मनात म्हटलं "शाट्या, कॉर्पोरेट मधे सीनियर मेनेजर असतांना तुझ्या दुप्पट पगाराची नोकरी सोडलेल्या माणसाला तुझ्या कॉपी-पेस्ट जॉबची आणि त्या AM पोस्टची अकड़ दाखवतोस होय रे??"  पण तसे काहीच react न होता आम्ही परत आलो..

वकील म्हटलं की लोकांना उज्जवल निकम, जेठमलानी वगैरे सारखी मोठी नावं आठवतात नाहीतर थेट कोर्टाच्या बाहेर उभे असलेले काळा कोट घातलेले नोटरी, ऍफिडेविट वाले दलाल..
अहो मिडल लेवल काही असते की नाही...असो..

अशा ''ढ'' आणि स्टेटस कॉन्शस लोकांना फटके हाणायला लय आनंद होतो.. sadistic pleasure म्हणा हवं तर..

आहे असं आहे.. बाकी निवांत ;) (हे वाक्य spindalकरांचे)

(Feeling लैच Cunning + राक्षसी)

Tuesday, 19 May 2015

शिव्या ते मदर्स डे..स्वैर विचार..


काल काही मैत्रिणी इकडे शिव्या देणे याविषयावर बोलत होत्या.. लोक शिव्या देणाऱ्या माणसाबद्दल कसे जजमेंटल होतात किंवा त्या कशा वर्तणूक बघुन जज करतात न की शिव्या ऐकून हा चर्चेचा विषय होता..
मनात म्हटलं हा तर आपल्या जिव्हाळ्याचा (रादर expertise असलेला) विषय आहे..यावर तर बोलनाच पड़ीन.. ;)

आमची शिवराळ भाषा ऐकून बांद्रा हॉस्टल मधला रुमी म्हणायचा, "तुझ्यावर तर सरस्वती  प्रसन्न आहे रे" हा हा..   आमच्यावर ही सरस्वती आठवीत (१९९७) प्रसन्न झाली..तोपर्यंत आमची आई आम्हाला शाळेत जातांना भांग पाडून द्यायची आणि गालगुच्चा घ्यायची.. रात्रि ७.३० वाजता जेवण करून आम्ही आईजवळच झोपीझोपी--गाईगाई करत असू..

मग आम्हाला mentor भेटला..आमच्यापेक्षा एक वर्ष मोठा..त्याने आम्हाला 'ढिंच्याक ढिंच्याक' शिकवले..मग ज्या मुलींचा फार राग यायचा त्या आवडु लागल्या आणि त्यासोबत शिव्या हे प्रकरण आयुष्यात add झाले..

ज्याने कोणी या शिव्या बनवल्या असतील त्याचे मनापासून कौतुक वाटते.. हिंदी, मराठी, इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा असो.. सगळीकड़े या शिव्यांचा संदर्भ आणि त्यांचे प्रयोजन एकसारखेच..

या बाबतीत लोकांचे प्रकारही सर्वत्र सारखेच.. सभ्य, लबाड आणि छपरी..एक टक्का लोक genuinely सभ्य असतात आणि खरच शिव्या देत नाहीत.. ९०% लोक लबाड़ केटेगरी वाले; यांचे खायचे एक आणि दाखवायचे दूसरे.. आणि बाकी सगळे आमच्या जातीचे.. हा हा

फ़क्त महाराष्ट्रातसुद्धा शिव्यांच्या उच्चाराचे प्रकार वेगवेगळे.. जसजसे वेगवेगळे मित्र भेटत गेले तसतसे आम्ही "मराठवाडी/निजामी, कोकणी ऐराणी, वऱ्हाडी, पश्चिम महाराष्ट्रातली गावठी, हरयाणवी, लखनवी, राजस्थानी, MP स्टाइल, दिल्ली स्टाइल"  हे सर्व accents आत्मसात करत गेलो...एखाद्या विषयात आवड असली की गती आपोआप प्राप्त होते तसे आमचे याबाबतीत झाले...

शिव्यांची acceptability पण वयानुसार बदलत गेली.. लहानपणी "मला गाढव म्हटलीस??" असे म्हणून एका क्लासमेटला जवळ पडलेल्या  इलेक्ट्रिकल वायर ने उघड्या पायावर मारलेले आठवते..मग थोड्या मोठ्या वयात "मला काही म्हण पण आईवडलांवर नको जाऊ" हा डायलॉग फेमस होता.. एका मुलगा मी त्याला भेन** म्हणालो म्हणून संतापाने लाल झाल्याचे ही आठवले.. आता तर जवळच्या मित्रांना अतिशय प्रेमाने ज्या शिव्या देतो त्या पूर्वी हाणामारी होण्यास पात्र असत असे जाणवते.. ;)

या शिव्या देण्यामुळे लोक आम्हाला अगदी नीच आणि चिप समजत; पण, "आपल्या मनाला जे पटेल ते आपण करावे...जग गेले भोकात" हा एप्रोच आम्हाला मिळाला तो फ़क्त शिव्या आणि त्या व्हाईट कॉलर, सभ्य लोकांमुळे..त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करावेत तितके कमी आहेत..

पुढे उशीरा का होईना हे लोक वयात आले आणि आम्ही इतकेही वाईट नाहीत हे त्यांना जाणवले..पण आमच्यासाठी मात्र ते आजही व्हाईट कॉलरच आहेत..डिस्टन्स वाले..

गुन्हेगार हा मोस्ट्ली मोकळ्याढाकळ्या स्वभावाचा नसतो..तो शांत आणि कपटी असतो, तसेच हे लोक आम्हाला वाटतात..यांच्या मनात यशापासून सेक्सपर्यन्त सर्व बाबतीत भयंकर वाईट विचार आणि विकृति असतात पण बाहेरून यांच्यासारखे समंजस, सुशील आणि मुख्य म्हणजे यशस्वी कोणी नसते, म्हणून मग अशा लोकांशी मैत्री ते लग्न अशी सर्व थरांवर नाती मुद्दामहुन जोडली जातात..पण सुरवातच दिखाव्याने झालेल्या नात्याचे भविष्य सांगायला कोणत्याही पोपटवाल्या जोतिषाची गरज नसते, तसेच यांचेही होत असेल.. मग सुरु होते धुसफुस, documentation आणि कचेऱ्या..किंवा आयुष्यभराचे एडजस्टमेंट..

त्यापेक्षा, मनातले ओठावर असा सरळ हिशोब असला तर व्यक्तिगतआयुष्य सोपे होत असेल असा आमचा ठाम विश्वास आहे..अर्थात प्रोफेशनल आयुष्य अवघड होते हे ही तितकेच खरे.. मनाविरुद्ध किंवा मुखवटे घालून जगतांना आत जी तड़फड होते त्याचीच परिणती सध्या वाढलेल्या हार्ट अटैक्स मध्ये दिसते.. बदललेली जीवनशैली हेही कारण आहेच, पण हा मानसिक तणाव आणि उंदीर स्पर्धा (रॅट रेस) दुर्लक्ष करण्यासारखे फॅक्टर्स नक्कीच नाहीत..

असो.. विषय लैच भरकटण्याआधी थांबतो..

टिप : 'शिव्यांचे उदात्तीकरण' हा यामागील हेतु नसुन लोकांना त्यावरून जज करण्याबद्दल संताप व्यक्त करायचा आहे. शिव्या देणारे लोक जास्त निर्मळ आणि रिलाएबल असतात हा आमचा अनुभव आहे.. :)

आणि हो.. त्या मुखवटाधारी लोकांच्या यशाबद्दल आमची अजिबात जळत नाही...आमच्या पैठणच्या (आईचे गाव) संस्कारांमध्ये 'जेलसी' नावालाही नाही..दुसर्याच्या यशावर चरफडण्यापेक्षा आपला पराभव आपण आधी स्वीकारावा ही आमच्या आईची शिकवण आहे. असत्य किंवा अन्यायाची फोडणी असलेल्या यशापेक्षा आम्हाला मिळालेले निर्भेळ आणि absolute अपयश आम्हाला जास्त जवळचे आहे..आजही जे थोड़ेफार मनासारखे होते आहे ते आमच्या आईमुळेच...हेच तिचे आमच्या आयुष्यातले छोटेसे (!) कॉन्ट्रिब्यूशन.. _/\_

च्यायला...हा लेख शिव्यांकडून  आता मदर्स डे कड़े जातोय.. आता थांबावेच लागेल.. :)

काही आवडते कोट्स संदर्भासाठी खाली टाकत आहे :

१. "तुम अपने करोड़ पे मैं अपने रोड पे..मजे करेंगे" - नाना पाटेकर taxi no.9211
२. "मर्दानगी सच्चाई का सामना करने में है" - अजय देवगण HDDCS
३. "Never grudge someone's success..If you grudge their success, they will grudge yours.." Harsha Bhogle at IIM 2005
४." सर ये एक ही तो चीज है मेरे पास.." (ईमानदारी) - Ranbeer Kapoor in Rocketsingh - Salesman of the year

Sunday, 17 May 2015

CEO for मुंबई..

आता कसं वाटतंय......गोड़ गोड़ वाटतंय....!!!

राज ठाकरेंना नाशिकमधल्या 'एनशीपी' समर्थनासाठी किंवा त्यांच्या मोदी विरोधासाठी नावे ठेवणाऱ्या आणि उद्धवला उद्धट म्हणणाऱ्या सर्वांना आज हेच विचारावं वाटतंय...
सभागृहातले "जय विदर्भ" चे नारे.. मुंबईसाठी वेगळा सीईओ... मराठी शाळांमध्ये उर्दूची सक्ति...मुंबईत जागोजागी "मुंबई तुमची भांडी घासा आमची" किंवा "Marathi Manus is Gujarat's slave" अशी संतवचने....
तुम्हाला हेच हवं होतं ना..????!!!!!
मध्यंतरी मोदीना आजच्या काळातले शिवाजी महाराज असे इकनोमिक टाइम्सने फ्रंट पेजवर जाहीर केले.. तुम्हाला आनंद झाला असेल ना याचा..राजे परत आले जणू...
आज मुंबईचे असलेले प्रश्न जणू पुणे नाशिक औरंगाबादवर येणारच नाहीत या भ्रमात रहा आणि त्या बनियाचा (विकासाचा झेंडा) हातात घ्या..

आणि उद्धवसाहेब तुम्हालापण हाच प्रश्न.. भाऊ पड़ला म्हणून "खुष तो बहोत होंगे आप"..आधी त्याने तुमची मारली आता तुम्ही आम्हा सगळ्यांची मारा..आमच्यासाठी किंवा स्व.बाळासाहेबांसाठीसुद्धा आपले इगो बाजूला ठेऊ नका..
आपल्याच घरात भाड़ेकरू झाल्याचा आम्ही फील घेतो अणि तुम्ही मात्र मंत्रीपदे मागा आणि जय श्रीकृष्ण / जय जिनेंद्र म्हणा..
आमच्या अपेक्षा गेल्या **त

पवारसाहेब - तुमच्या बद्दल आज नितांत आदर आहे..आमच्या सोशल मीडिया वाल्या पोकळ पिढीला जुन्या हाडाची ताकद दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे.. ऐसा नेता आमच्या सेनेला किंबहुना महाराष्ट्राला परत मिळो ही मनापासून इच्छा.. यात कुठेही उपहास नाही...

शेवटचा प्रश्न औरंगाबादकरांना - तुमच्या मोदीप्रेमाने ओवैसीचा माणूस जिंकून आला.. गेल्या २० दिवसात शहरात 6 करफ्यू लागले (दंगल सदृश परिस्थितिमुळे)
उद्या हे रझाकार घरावर चालून आल्यास तुम्हाला भाजपचे सावे मदत करतील का?
की डिपॉझिट जप्त झालेले आणि दलित म्यूजिक एल्बम साठी रस्त्यावर नाचणारे दर्डा मदत करतील? की राष्ट्रवादीचे अमानुल्ला मोतीवाला?
की परत आमच्या 'शेने'ची आठवण येईल..
आता हे प्लीझ म्हणू नका की असे होणार नाही..१९८९ आधीचे शहर आठवा आणि मग विचार करा...जमल्यास....

तळटिप : आमच्या पूर्वीच्या मल्टीनेशनल कंपनी मध्ये कोणाला काढून टाकायचे असले की त्याला म्हणायचे आमचे तुमच्याकड़े विशेष लक्ष आहे.. पर्फोरमेंस इम्प्रूवमेंट प्रोग्राम या गोंडस नावाखाली एक महीना घालवला की मग म्हणणार you are extremely talented and you have already achieved a lot here.. we may not be able to offer you more challenging roles so we are okay if you look for better opportunities outside.. we are not stopping you..
बघुया आमच्या मुंबईला किती वेळ मिळतोय सीईओ कडून...
— feeling angry.

Powershift.. ;)

मध्य रेलवेने सध्या कंत्राटी (contract basis) पद्धतीने टीसीज् ठेवले आहेत.. मोस्ट्ली 'फर्स्ट क्लास' वर त्यांचे विशेष लक्ष असते..हे टीसीज् एखाद्या उच्चभ्रू पब मधे रात्री बाउंसर म्हणून काम करतात आणि हा त्यांचा डेटाइम जॉब आहे..ते दिसतात असे की त्यांच्या राजबिंडया रूपावर फर्ष्ट क्लासच्या किमान १० शिष्ट मूली फ़िदा व्हाव्यात..smile emoticon

आज शिवडी स्टेशनवर असेच दोन बाउंसर एका काकांशी हुज्जत घालत होते..काकांकड़े फर्स्ट क्लास पास होता मात्र दुसऱ्या लाइनचा.. पण ते मंत्रालयात रेल्वेशी संबंधित विभागात कक्षाधिकारी असल्याने टीसीने आपल्याला सोडून द्यावे ही त्यांची रास्त (!) अपेक्षा होती.. बायकोला पोहोचायला वेळ असल्याने मीसुद्धा त्यांचे संभाषण लक्ष देऊन ऐकत होतो.. wink emoticon

आधी बाउंसर शांतपणे घेत होते..नंतर त्यांचा राग अनावर झाला आणि त्या काकांना म्हणे "तुम्हारे जो कौन साहब हैना उनको मेरे घर संडास साफ करने भेज दो.."
हे ऐकल्यावर काकांनीपण फॉर्म मधे येऊन एक फ़ोन लावला आणि त्यावर आपल्या वरिष्ठाचे 'मिश्रा टाइप्स' नाव ऐकून इतका वेळ तोर्यात असलेल्या बाउंसर ची गाड़ी उताराला लागली..

काकांचा फ़ोन त्या बाउंसर्सच्या सुदैवाने कट झाला आणि हे ग़जनीचे आतेभाऊ चक्क पुढच्या ट्रेन मधे चढ़ून पळून गेले.. हाहा..
मुद्दा हा की.. सत्ता किंवा शक्ति कधी बाजू बदलतील सांगता येत नाही.. त्यामुळे कोणाला दुखवण्याच्या आधी माणसाने १०० वेळेस विचार करावा..

सांप्रतच्या काळात नागपुरचा चिरका पोपट, जळगावचे गावरान वांगे, गुजराती विकासपुरुष व त्यांचा खासमखास टकलू हैवान या सर्वांची गाडी त्या बाउंसर्स सारखी उतारावर कधी लागेल यावर आमच्यासारखे लाखो लोक डोळे लाऊन बसले आहेत.. हा हा हा

टिप: Powershift नावाच्या एका थोर फिलोसोफेर ने लिहिलेल्या पुस्तकाची प्रस्तावना या निमित्ताने आठवली.. त्या पुढे आमचीच गाडी उताराला लागल्याने अधिक भाष्य करणे अवघड आहे wink emoticon
— feeling amused.

Movie Review : हैप्पी जर्नी

हैप्पी जर्नी... या सिनेमाचे कशाकशासाठी आणि किती कौतुक करावे असा प्रश्न पडला आहे.. 
सिनेमाची अफ़लातून स्टोरीलाइन, अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापटचा अप्रतिम अभिनय, कथानकाची स्पीड आणि ग्रिप, शूटिंग लोकेशन्स, फ्रेश लुकची कैराव्हैन, अतिशय अनपेक्षित पण उत्तम जमुन आलेले विनोद, प्रेक्षकांचे पाणावलेले डोळे आणि भरून आलेला गळा... प्रत्येक गोष्टीबद्दल खुप काही बोलण्यासारखे आहे..

आम्ही दहावीत असतांना नवनीतच्या २१ अपेक्षितची जाहिरात करणारी छोटीशी प्रिया बापट... पुढे मुन्नाभाई मधली यंग डॉक्टर ते काकस्पर्श आणि आजची जानकी.. प्रिया बापटच्या या प्रवासाबद्दल तिचे कौतुक आणि पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा..!!!

बऱ्यापैकी बोल्ड असलेले प्रसंग / संवाद चुकुनही अश्लीलतेकड़े झुकत नाहीत हे या सिनेमाचे यश आहे.. खऱ्या अर्थाने 'आउट ऑफ़ बॉक्स' मराठी सिनेमा कशाला म्हणतात ते हा सिनेमा पाहुन कळते..

कोणताही रिव्यु न वाचता आणि स्टोरी न वाचता हा सिनेमा आपल्या परिवारासह एकदा बघायलाच हवा..आज पहिल्यांदा आपल्यालाही लहान बहिण असावी असे वाटले.. smile emoticon

विशेष गोष्ट - या सिनेमाचा नायक सेल्स प्रोफाइलमधला असून त्याचे फर्स्ट हाफ मधले अनाकलनिय व्यक्तिमत्व आमच्यासारख्यांना नक्कीच भूतकाळात घेऊन जाईल..

स्टार्स : ४.५ / ५

— feeling great.

नाईटलाईफ..

Prince Aditya Thackeray has promised a rocking Nightlife for youth in Mumbai.. today's news in ET..

Bloody hell..how many Martathi guys have a night life in this city? N how often? What is your target segment? Dont forget people from chawls (slums) made you win 10+ seats here.. I agree these poor guys have a night life..but it's for water that comes to their home in night at 2 a.m / 3 a.m..

I hope you are talking about this night life and also that you are concerned about the quality of life of those few (!) voters staying in areas like sewree, lalbag, kalbadevi, cotton green, ray road etc.

तुझ्या आजोबांनी लाही चना आणि १९९५ रूल आणून बांग्लादेशी घुशिंना घर दिले होते..तेही शहरात..बदलापुरला नाही.. त्यांची पुण्याई थोर म्हणून लोक अजूनही तुम्हाला मत देतात.. 

तू असे 'सर्वसमवेशक चाळे' केलेस तर मात्र तुला कवी संदीप खरेंकडे उमेदवारी (juniorship) करण्याखेरिज पर्याय राहणार नाही.. हाहा
— feeling silly.

डॉक्टर्स..

KEM मधील एका वार्डबॉयने एका फीमेल रेसिडेंट डॉक्टर सोबत गैरवर्तन केल्याची बातमी वाचून दुःख झाले.. 
या क्लास 4 लोकांना इतका माज कसा येत असेल? कायदा किंवा वरिष्ठ आपले काही वाकडे करू शकणार नाही हा विश्वास त्यांना नक्कीच त्यांची यूनियन / सेना देत असावी..

'डॉक्टर आजकाल फ़ार लूटतात' असे सहज म्हणणार्यानि एकदा इकडेपण पहावे..
पंचविशितले ७ डॉक्टर गेल्या ३ महिन्यात डेंग्यू सारख्या क्षुल्लक आजारामुळे कायमचे आपल्यातून गेले, डॉ.संजय ओक महापालिकेतल्या राजकारणाला कंटाळून DY PATIL ला निघुन गेले..
एकहि सुट्टी न घेता रोज १२-१५ तास काम करणाऱ्या रेसिडेंट डॉक्टर्स वर पेशंट्सचे नातेवाईक हल्ला करतात..त्यांना सुरक्षा द्यायला पुरेसे पोलिस नाहीत..KEM सारख्या नामांकित हॉस्पिटल ला पूर्णवेळ डीन अजूनही नाहीत असे कळले..
all thanks to politics..

आपल्या बेस्ट ब्रेन्सची अशी दुर्गती होत असल्यास उद्या ते भारत सोडून गेले तर ब्रेन ड्रेनच्या नावाने गळा काढण्यात काहीच अर्थ नाही..

Movie Review : PK

PK....आत्ता सिनेमा पाहुन आलो मात्र अजूनही आमीरकाकांना सत्यमेव जयते सोडून हे नक्की का करावे वाटले हा प्रश्न अनुत्तरितच आहे..धर्माच्या नावाखाली चाललेली बुवाबाजी हे या सिनेमाचे टारगेट आहे असे apparently वाटत असले तरी Oh my God सारख्या दर्जेदार सिनेमाशी याची कुठेही बरोबरि होऊ शकत नाही..

तसे पाहिल्यास हा सिनेमा वाइट नाही..alienच्या नजरेतून आपले जग उलगड़तांना अगदी छोट्या प्रसंगातुन चांगले विनोद जमुन आले आहेत.. अनुष्का शर्मा आणि सुशांतसिंग राजपूत दोघेही suprisingly आवड़ण्यासारख्या रोल मध्ये आहेत.. पण तरी.. something is missing..

बाकी बोमन इराणीला असे गबाळे दाखवून, सौरभ शुक्लाचा (ढोंगी बाबा) सेकंड हाफ मध्ये खेचलेला interview दाखवून, संजुबाबाचे आमीरसोबत गाणे दाखवून आणि नंतर संजुबाबाला ट्रेन ब्लास्ट मध्ये शहीद करून नेमके काय साध्य झाले ते त्या राजू हिरानीलाच ठाऊक..

In short, you can give it a miss.. :(

@आमीरकाका - तुम्ही पार्टनर बदललात आणि आमच्यासाठी तुम्हीच बदललात.. कुठे तुमचे २००४ आधीचे intense पिक्चर आणि कुठे.........जाउद्या.. ज़माने के साथ चलना है यालाच म्हणत असावेत..

आम्हाला मात्र हे जमलं नाही..म्हणूनच लोकल आणि सोसाइटी मधली कॉलेज गोइंग मुलं पण हल्ली आम्हाला काका म्हणायला लागली आहेत आणि तुम्ही मात्र त्यांच्या वयाच्या मुलिसोबत रोमान्स करत आहात..
जहाँपनाह तुस्सी ग्रेट हो.. तौफु कबुल करो.. !!!!!!

कावळेदादा..

एखादी मोठी व्यक्ति आणि आपल्या आवडीमध्ये साधर्म्य जाणवले की स्वतःबद्दल जास्तच पॉझिटिव्ह विचार मनात येतात..भलेही ती एकमेव सिमिलैरिटी का असेना.. wink emoticon
आर.के.लक्ष्मण यांचे कावळ्यावर फार प्रेम होते असे आज वाचले आणि जणू मलाच काही बक्षीस मिळाल्यासारखा आनंद झाला..

तसा कोणालाच फारसा न आवडणारा हा पक्षी मला नेहमीच फार गोड़ वाटतो..आमच्या सीनियर कॉलेज मधल्या कट्ट्यापासून ते आमच्या तिसऱ्या मजल्यावर बाल्कनीत नेहमी पाणी प्यायला येणारे सगळे कावळे मी observe केले आहेत..
त्यांचे काटेरी घरटे, दिसण्याचे प्रकार, companionship, मैत्री, दुश्मनी, सुड असे बरेच काही..

कावळ्याचा सुद्धा आवाज (घसा) बसतो, तो आपल्याकडे तिरप्या नजरेने पाहुन हसतो असे मला नेहमी भासते.. आमच्या पैसेज मध्ये पाण्याची प्लेट नसेल तर ते मला नेहमीपेक्षा वेगळ्या आवाजात कावकाव करून बोलावतात..आणि पाणी पिऊन जातांना समाधानाने वेगळे कावकाव म्हणतात.. कधी नावडीची गोष्ट दिली तर तक्रार करणारे त्यांचे कावकाव पण वेगळेच असते..
आईला बाळाचे रड़णे दुदुसाठी आहे की कड़ेवर घेण्यासाठी हे असेच कळत असावे.. smile emoticon

विशेष टिप : अजय देवगणची सिगरेट पिण्याची स्टाइल आणि बाळासाहेबांची तांब्याच्या ग्लासमध्ये बियर पिण्याची स्टाइल पण आम्हाला अशीच आदर्शस्थानी आहे..;) 

आर आर आबा..

आबा काल गेले..त्यांच्यासंदर्भात काही जुन्या आठवणी आज शेयर कराव्या वाटल्या...

आर.आर.आबा यांनी डांस बार बंदीचा कायदा आणला त्या काळात आमचा Reliance Money मधला बॉस आम्हाला सांगायचा.. you should tap this segment.. these girls earn on an average 20 thousand per night..that too in cash and they are not educated enough to make wise investment decisions..

आता अशा मुलींना भेटायचे म्हणजे खिशात चांगले पैसे पाहिजेत..५० रूपयांपेक्षा जास्त एका जेवणावर खर्च करणे शक्य नसलेल्या आमच्यासारख्या मित्रांनी मग पनवेल, खालापुरला स्वस्तातल्या डांसबार मध्ये जाण्याचे ठरवले..तेहि ४ लोकांनी contri करुन फ़क्त दोघांनीच जायचे आणि आलेला बिझनेस सगळ्यांनी वाटून घ्यायचा..
पुढे तेही आवाक्याच्या आणि संस्कारांच्या (!) बाहेर आहे असे लक्षात आले, तो जॉब सोडला आणि आमचे डांसबार दर्शन राहूनच गेले..

सलमान खान आणि शकीलच्या ऑडियो टेप्स २००२-०३ साली आबांनी पुढील तपासासाठी गोव्याला विशेष lab मध्ये पाठवल्या असे प्रेस कांफरेंस मध्ये सांगितले..तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या धारदार प्रश्नांमुळे घामाघुम झालेले आबा अजुन आठवतात...

तिसरी आठवण आमच्या गावची...औरंगाबादला मुकुंदवाड़ी पोलिस स्टेशनला आबांनी गृहमंत्री असतांना भेट दिली होती..पोलिसांच्या डेली रजिस्टरवर सही करतांना त्यांचा फ़ोटो अजूनही तिथे असेल.. बायकोचा (तेव्हाची मैत्रीण) मोबाइल चोरीला गेल्याची कंप्लेंट करायला गेल्यावर तो आम्ही पाहिला होता..
पुढे काही वर्षांनी पहिल्यांदा दिल्लीला 5 स्टार हॉटेल मध्ये स्टे केला त्या वेळेस स्वतःचा त्याच पोझ मधला पेन हातात घेऊन काढलेला फ़ोटो पाहिला की अजूनही आबा आठवतात... frown emoticon

पक्षाच्या हितासाठी कैंसरसारख्या आजारावर वेळेत उपचार न करणारे आबा आज‪#‎लोकसत्ता‬ मुळे आम्हाला कळले.. जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमात शिकलेल्या त्यांच्या मुलीला पाहुन ठाकरेंच्या "बाबांना डैड म्हणणाऱ्या / इंग्रजी कविता करणाऱ्या / नाईट कल्चर आणु म्हणणाऱ्या" तिसऱ्या पिढीबद्दल राग अनावर झाला.. 😈

आबा तुम्ही फ़क्त ब्राह्मणविरोधक म्हणून मला माहीत होतात..पण तरीही तुमच्या जाण्याचे दुःख आहे.. तुमची पक्षाची निवड चुकली की हे आमचे सर्वांचे (पक्ष, जनता आणि तुम्ही) नशीब हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे..

तुम्हाला परत या म्हणणार नाही कारण आता त्या पक्षाचा पुढे फ़क्त ऱ्हासच होणार हे जवळपास निश्चित आहे..